ज्ञान वाटावं...म्हणजे वाढतं...
ज्ञान वाटावं...म्हणजे वाढतं...
आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही न काहीतरी शिकवत असते. आई-वडील तर आपल्यासाठी उच्च स्थानी असतातच पण, आजूबाजूला ही अशी बरीच मंडळी असते मग ,ती लहान असो किंवा मोठी त्यांच्याकडून कळत-नकळत का होईना आपण काही तरी नक्की शिकत असतो.
निसर्ग,प्राणी,पक्षी,लहान-मोठ्या व्यक्ती इतकंच काय तर मित्र आणि शत्रु यांच्याकडूनही आपण खूप काही शिकत असतो.
आपल्या आयुष्यात आपला गुरू हा काय फक्त एकच नसतो.लहानपणापासून अत्ता पर्यंत खूप गुरू असतात आपले, आपल्याच आजूबाजूला.
आपलीच लहान मुले ही आपल्याला खूप काही शिकवत असतात नेहमीच पण ,आपण काय नेहमीच त्यांचं ऐकत नाही. पण ,तरीही ते आपले गुरुच असतात.
मला तर अस वाटतं ज्या व्यक्तीकडून आपल्याला चांगलं काही शिकायला मिळतं तो आपला गुरू. मग ,ती व्यक्ती लहान की मोठी ,आपली की परकी ,ओळखी की अनोळखी हे तितकंसं महत्वाचं नाही.
आपल्या अवती-भवती खूप ज्ञान असतं. आपल्याला ते जेव्हा-जेव्हा ज्यांच्याकडूनही घेता येईल त्यांच्याकडून ते घ्यावं आणि मनातल्या मनांत का होईना त्या गुरूंचे धन्यवाद मानावेत...
आत्तापर्यंत जे काही शिकलोय ते इतरांनाही देता आलं पाहिजे आपल्याला... कारण ,आपल्यालाही ते कोणा दुसऱ्यांकडून आलेल असत ना मग ,आपणंही ते द्यावं स्वच्छ मनानी दुसऱ्यांना....
आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना दिल की त्यात अजून भर पडते... मग ज्ञानाचं ही असचं असत... देत राहील की वाढत जात. नदी नाही का हळूहळू जाऊन समुद्राला मिळते. आपलं ज्ञान ही दुसऱ्यांना दिल की वाढतचं.
प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी चांगलं
घेण्यासारखं असत...जे चांगलं आहे ते नेहमीच घ्यावं,
जे वाईट आहे ते सोडून द्यावं...
