Anil Kulkarni

Inspirational

3  

Anil Kulkarni

Inspirational

जिंदगी का सफर...

जिंदगी का सफर...

2 mins
242


जीवनाचा प्रवास कुणाला समजला आहे.सगळेच चालतात आपापल्या गतीने. प्रवास करणाऱ्या मध्येच काही आपल्याला दिशा दाखवतात आणि अचानक अस्तंगत होतात, तेव्हा कामाला येते ती त्यांनी दिलेली शिदोरी . कोणी कासव बनवून तर कोणी ससा बनून शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करतो.

काहीजण जगतच नाहीत, जगण्याच्या आधीच संपून जातात. काहीजण थोडे जरी जगले तरी आयुष्य जगून जातात. दवबिंदू ,इंद्रधनुष्य देतात जगण्याची प्रेरणा,काही क्षण आशा निर्माण करतात

पहाटेच्या दवांने अनेकांची सकाळ सोनेरी झालेली आहेे.

इंद्रधनुष्य आपल्याला रंगांची जाणीव करून देतात रंगाप्रमाणे आयुष्य हे उधळण्यासाठी नसून शिस्तीत जगण्यासाठी आहे याची जाणीव करून देतात. रंग शिस्तीत असल्याशिवाय इंद्रधनुष्य होत नाही आयुष्याचही असंच आहे. रंगाशिवाय इंद्रधनुष्य नाही व शिस्तीशिवाय आयुष्य नाही.

आयुष्यासाठी व प्रवासासाठी ध्येय व प्रेरणा हवीी. जीवनाचा प्रवास एकट्याचा नसतो, आपल्याबरोबर सहप्रकसवासी चांगला असेल तर प्रवास जाणवत नाही.

कंटाळवाणा प्रवास कोणालाही नको असतो. जगणं म्हणजे प्रवास सुसह्य करणारी यंत्रणा.

जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या होगा किसने जाना हे माहीत असूनही लोक आकंठ दुःखात बुडाल्या सारखेच जगतात.

आगे भी जाने ना तू

पीछे भी जाने ना तू

जो भी है बस एक पल है

हे ही माहित असतं.

वृत्ती बदलल्याशिवाय स्वभाव बदलत नाही.

दृष्टी बदलल्याशिवाय सृष्टी बदलत नाही हे ही तितकच खरं, पण माणसे इतकी कधी कधी दगड होऊन जातात आणि जाणीवा हरवून बसतात.

प्रवास हा जाणिवांचा असतो. श्रावणातले हिरवे हिरवे गार गालिचे अनुभवता आले पाहिजेत, सगळ्यांनाच ते जमत नाही. प्रवासाचा सुद्धा आनंद घेता आला पाहिजे.यशोशिखर गाठण्याच्या नादात माणसे समाधानाच्या थांब्यावर थांबतच नाहीत. क्षणभर विश्रांती घेतच नाहीत ,धावत-पळत यशोशिखर गाठतात, व पुन्हा जर नैराश्याच्या गर्तेत उडी मारत असतील तर काय अर्थ आहे. प्रवासात थांबून सिंहावलोकन केलं पाहिज आपण कुठे आहोत अजुन किती टप्पा गाठायचा आहे, कशा रीतीने टप्पा गाठायचा आहे, कुणाबरोबर गाठायचा आहे. कोणी शब्दफेकीत जिंकतं, कोणी भालाफेकीत जिंकतं. हे एका रात्रीतून घडत नाही. प्रत्येकाचा प्रवास वेगळा. प्रत्येकाचा सराव वेगळा. प्रवास मानापमानाच्या असतो , यशापयशाचाअसतो ,तो स्वीकारायला प्रवासात अपयशाचे स्पीड ब्रेकर खूप येतात पण तिथे थांबून त्याला ओलांडून जाता आलं पाहिजे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational