जीवनातील पहिली होळी
जीवनातील पहिली होळी
सुधीर आज ऑफिसमधून लवकर आला माझी लग्नानंतरची पहिली होळी साठी शॉपिंग करणार होतो मीही नटुन थटुन बसलेेे होते सुधिर आल्या नंतर फ्रेश होण्यासाठी गेलो तो पर्यत चहा करण्या सारी गेले मनात सारी स्वप्ने रंगवत होती सासूबाई बाहेर मंदिरात गेल्या होत्या प्रेमाणे सुधिर ने चहा घेतला अन् निघालो शेजारी निरोप ठेवला सासूबाईंना येतांना जेवण करून येवू व तुझ्यासाठी पार्सल घारी काही बनवू नको. मार्केट मधील सर्व दुकाने फिरलो अगदी आतिल कपड्यासह सर्व मॅचिंग साडीसह घेतले सुधीर ने सिग्नल वर आवडीने गाजरा घेवून स्वतः माझ्या वेणीत माळला व रस्त्यावरच गाडीत चक्क किस घेतला स्वारी फार मुडमध्ये होती त्यामुळे रात्र नेहमीपेक्षा फारच सुंदर गेली अगदी पहिल्या रात्री पेक्षाही कारण कोणतेही टेन्सन नाही चिंता नाही असा स्वर्गाहुन सुंदर दृष्ट लागेल असा संसार चालु होता उदया होळी घरात पुरण पोळी करून स्वतः नैवेदय देणार सकाळी नेहमीपेक्षा सुंदर दिवस भासत होता दुपारी अचानक सासूबाई बाथरूममध्ये पडल्या अन् कमरेत फॅक्चर झाले काय करावे हे सुचत नव्हते सुधीरला फोन केला. हॉस्पिटलमध्ये नेले अर्जन्ट ऑपरेशन करावे लागेल रक्त दयावे लागेल. 'दोन लाख अॅडव्हान्स भरा सारे काही क्षणात साऱ्या आनंदाची होळी झाली रात्रभर हॉस्पिटलमध्ये गेली साऱ्या आनंदाची.' विचारांची एका क्षणात होळी झाली ती माझ्या संसाराची पाहिली होळी झाली.

