Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Ranjana Bagwe

Tragedy Others


3  

Ranjana Bagwe

Tragedy Others


जीवदान

जीवदान

6 mins 323 6 mins 323

राना वनातून काटे तुडवत चाललेल्या बळीला मागून त्याची बायको हाका मारत होती .परंतू आपल्याच तद्रींत असलेल्या बळीला तीची हाक ऐकू येत नव्हती...

हाका मारून थकलेल्या बळीच्या बायकोने अंगात उसने अवसान आणत ती बळीच्या मागून धावली..काही मिनिटात ती बळीच्या अगदी जवळ पोहचली आणि म्हणाली..

""अव्ह,काय झालय तुम्हासनी""

""कुठ काय ""

""अव्ह मग अनवानी पळतासा कूठ!!

""अगं व्हय की ! चप्पल घालाया ईसरलोच बघ!!

""म्या म्हनते तुम्हासनी झालय काय?

""काही नाही गं सितले!!

"""अव्ह हे तुम्ही मला सांगताय स्वताच्या बायकुस, अव्ह म्या या घरात काल आली होय ??आज पतूर वीस वरीस काढली की, तुम्हासगंट,तुम्हासनी काय ओळखीत नाय व्हय"""

""सितले आजकाल कश्यात लक्षच लागत नाही बघ"""

"""लक्ष न लागाया झालय तरी काय ?"""

"""अवंदाच पिक कमीच आलय""

""तवा तुम्ही काळजीत हाय व्हय""

""सितले पूढ खायच काय गं""

""म्या जीती हाय अजून मेले नाही.करू म्हेनत आन भरू पोट की"""

व्हय गं ते तू करशिल गं इश्वास हाय माजा""

""हाय नव्ह इश्वास""

""सितले आजवर तू माझ्या चांगल्या वाईट दीसात साथ दिलीस.ती आता माघारी फीरनार न्हाय ठाव मला""

""एवढ समजतय ना तुम्हासनी""

""व्हय गं"

""मग झाल की!इच्यार कसला करताय!""

""तस नाही गं""

""मग कस आणि म्या म्हनते हा संसार तुम्हा एकट्याचा हाय व्हय,आपल्या दोघांचा ना""

""व्हय तर पर मला वाटतय उद्या पाऊस पडाया लागला की मोल मजूरी मिळण कठीण होवून बसल म्हनजी ,खायच काय आन,तूझ्या लेकरास पैका,कसा पाटवायचा याची काळजी वाटती बघ,"""

""अव्ह,लेकरू आपल समंजस हाय,त्याला काही माहीत नाही व्हय,त्याचा बा,आणी माय,कस दिस काडून पैकाला पैक जमा करूण त्यास पाटवीतो ते""

""कळत की !आपण दोघ बी आपल्या वाटनीस आलेल्या जमनिच्या तुकड्यावर कसतो ते""

""अव्ह,धणी आपल्यपाशी जमीनीता तुकडा हाय नव्ह इतरांकड तो बी न्हाय ,मग त्यानी वो काय करायच?"

""होय ते बी खरच हाय,""

""तुम्ही काय बी काळजी करायची न्हाही.आपून की न्हाय दोघ कष्ट करू,वाटल तर मजूरी बी करू पण यंदाच वरीष कस बी ढकलू पुढ,!ह्या वरीस पिक कमी मिळल तर काय झाल,पुढल्या वरीस ह्यो रूसलेला पावूस पडल की न्हाई बघा,मग आपन माँप कष्ट करू,,पर तुम्हासनी आता काळजी करायची गरज न्हाही समजतय न्हव!!""

""अग व्हय तवाच तर म्या एवढी काळजी करत न्हाइ बघ""

""धणी अव्ह तूमी सुखी तर म्या सुखी ,तुम्हासनी काय झाल तर म्याँ कोणाकड बघू!माझ्या कपाळभर कुकूवाचा थाट तुमच्यावर हाय, काट्याच रान तुडवाया त्यासाठी मी तयार हाय..पर तुमची संगट असली की मला कश्याची भीती व! आणखी काही वरीस,कष्ट कराया लीगतील बघा! एकदा पोरग शिकून शान झाल की,आपल्यास वो कश्याची चिंता !पाहील की पोरग पूढ"

""सितले तू हाय म्हनून म्या हाय,तुझ्या मुळ चांगल्या वाईट दिसात मला बळ मिळत बघ ""

""म्हनून असच येड्या वानी काटे तुडवत अनवानी चालत होता व्हय व!ते बी मला टाकूण,""

""काय बी झाल तरी या पूढ अस करनार न्हाई""

""खरय ना""

""अगदी खर,तुझी आन घेवून सांगतो या पूढे अस काही बी होनार न्हाय,.परस्थी कशी बीअसो लढाया तू हीयस,हे इसरनार न्हाई""

आपल्या नव-याच वचन ऐकूण सितलेला समाधान मिळाल,शेतीवर निर्भर असलेल्या सितलच्या संसारात कमी कशाची नव्हती..पण मुलगा शिकायला बाहेर असल्यान दोघ नवरा बायको कष्ट करूण मुलाला शिकवत तर होते..कसाबसा,संसाराचा गाडा आंनदान ओडत होते..परंतू या वर्षी पाऊसान हजेरी कमी लावल्या मुळ उन्हाने पिक जळून गेल होत...त्या मुळे पिक हव तस मिळाल नाही..

मुलाला शिकता याव म्हनून सितलने सावकारी कर्ज अव्वा सव्वा व्याजान कीडून बी बीयाने आणले होते,पेरणी पर्यंन्त पाऊसही छान झाला,बी पण जमनिच्या कुषीत पडल. आणि पाऊस गायब झाला होता...जमनिच्या पोटी ओल होती. तोवर सितलेन पेरलेल्या बियानाला जपून ठेवल, होत. सुर्याच्या प्रखरतेन तीची तहान भागत , नसल्याने तीच्या पोटातल्या जोमान वाढणा-या पिकाची वाढ खुंटली .आणि व्यायच तेच झाल.. बीयाण्याच्या हीशोबाने अमाप पिक मिळाल नाही.. वरूण सावकार कर्जा वसूलीला दारी आला.त्या पाई सितलचा नवरा फार हळवा होवून त्यान मनाला ह्या गोष्टी लावून तो आज काल वेढ्या सारखा भ्रमात कसाही, फिरायला लागला . तो जसा असेल तसाच बाहेर पडायचा, आजपण तो रानाच्या दिशेने अनवानी चालताना पाहून सितल मागे मागे पळत हाका मारत होती..

सितला, भित्री होती..इतर शेतक-यासारख आपल्या धण्यान जिवाच बर वाईट करूण घ्यायला नको, आणि बळीराज्याच्या संखेत आणखी एका शेतक-याची वाढ होणे नको, परंतू तीचा हा भ्रम हेता..शेवटी कीती जपल तरी तरी बळीने नको तेवढी गोष्ट मनाला लावून होता.. मनाला लागलेला चटका तो विसरत नव्हता..सुकलेल्या भुमीत नागंर फीरवताना हाताला झालेल्या वेदना...आणि दिवस भर रणरणत्या ऊन्हाचे चटके शितल सहन करत त्याच्या पाठीमागे फीरे.हे तो विसरू शकला नाही... आशेच किरण दिसत नसल की मानसाच मन हाय खात, सितलच्या नव-याने हाय खाल्ली ती खाल्ली, त्यावेळी तरी सितलच्या समजवण्यान तो समजल्याच नाटक करत होता..हे सितलच्या ध्यानी आल नव्हत.. आपल आता पूढे बर होईल या वेढ्या आशेवर जगणा-या सितलला वाटल की आपल्या सांगण्याने आपला नवरा समजलाय ,असच ती मानत होती.. परंतू बळी मात्र या जगाचा कायमचा निरोप घ्यायच्या तयारीत होता...

ऊद्याचा सूर्योदय आपल्याला सर्व कटकटीतू मुक्ती मिळवून देईल. असा विचार बळी करत होता याच ठावठीकाण मात्र शितला नसला तरी आपला नवरा अजूनही भ्रमात आहे एवढ ममात्र शितल जानून होती. .

सूर्य मावळतीला गेला...आणि धरेवर त्याची लाल शाई पसरली...तशी शितलने अंगणातली चार सुकी लाकड चुली पाशी टाकली ..

गेट्यातल्या गुरांना वैरण पाणी देवून तीने हात घूवून देवापाशी सांज वात लावली ..तोवर अंधाराच साम्राज्य धरतीवर पसरल..

तीने बळेच नव-याला बरोबर घेवून चुलीपाशी आली...

 चुलीच्या जाळाने काळपट पडलेल्या टोपात दोन कप चहा केला..कपात चुलीतल्या धुराने धुरकट झालेला चहा तीने कपात ओतून बळी पूढे ढकला..

खाली मान घालून बळी निस्तेच पडलेल्या चेह-याने चहा पिला...पूर्वीसारखी तरतरी बळीत शितलेला दिसेना..तीच मन आतून अज्ञात भयान ग्रासल..त्याही स्थीतीत तीन चुलीवर तवा ठेवून दोन चार भाकरी टाकल्या , कांदाकापून त्याला तिखट मिट लावून दोन भाकरी बळीला ताटात खायला दिल्या...पण बळी भान नसल्या प्रमाणे एक भाकरी पाण्याच्या घोटा बरोबर गिळली...काही वेळात बायकोन करून दिलेल्या बिछ्याण्यावर पडला,परंतू डोळे मात्र एक टक छताला पाहत होते..सितलने बळीची मनस्थीती ओळखून ती काही बोलली नाही..

पण मनोमन कसलासा विचार करून दिवसभर श्रमाणे थकलेल तीच शरीर भुमीवर पडताच निद्रेच्या आधीन झाल...

आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेत बळी उठला...दबक्या पावलांनी गुरांच्या गेठ्यातून रस्सी घेवून माघारी आला...घरच्या मधल्या चोकातल्या आड्यावर रस्सीच टोक टाकून तो खाली खेचत असताना त्या अंधूक दिसना-या अंधांरात अजून एक हात मागून आला आणि तोही रस्सी खेचू लागताच बळी भानावर येत म्हणाला ...

""क....कोण...""

""मी हाय धणी ""

"""शितले तू""

""व्हय""

""तू झोपली,होतीस ना""

""माज्या धण्याच्या मनात काही वंगाळ चालय हे माहीत असून बी मला नीज येईल व्हय! पण धनी तुम्ही काय कराया निघालासा एवढ्यान हार मानून बसलाय व्हय...आव एकदा सुदीक माझा ईच्यार करावा न्हाही वाटला...तुमच्या माग माझ काय होईल याच भान नाही ठेवलासा..आपल्या पोरावर काय बितल याचा बी ईच्यार न्हाय व्हय..

एवढ एक वरीस तुम्हास भारी पडल व्हय व!!

दुष्काळात आपूनच होरपळतोय..

पू-या पंचकोशीत समदी मानस होरपळली ती दिसली न्हाई .तुमच दुख दिसल..बाकीच लोकांसनी दुख न्हाई..त्याना बी दुख हाय की!पण तुमच्यावानी समद्या गावान असा वंगाळ ईच्यार करून,घेतला न्हाई ना!! 

""मी ईच्यारते फकस्त तुम्हासनी दुख होतय.

आम्हासनी न्हाई..आम्हासही वाईट वाटत की!!

पण तुमच्यासार घाबरून आम्ही नाही वंगाळ ईच्यार करत..

आम्हास आस असती लढायची..झुंज द्यायची सवय असती. फिरून कष्ट करायता जोम असतूया ...म्हनून आम्ही दुष्काळ बी असला तरी खंबीर कमर कसून ऊभे राहतोय कुणासाठी धणी??

फकस्त तुम्ही हारून धरतीमायला जवळ करू नये म्हनूनच ना""

बोला की आता गप का??

न्हाई तर अस करू दोघ बी जावू संगती पेरास वा-यावर सोडून कस!आणा ती दोरी म्या फास बनवती!

बळीची बायको बोलत होती...बळी ऐकत होता..त्याला शितलेचा शब्दान शब्द खरा वाटत होता..

सितल बाई असून कमर कसून ऊभी आहे..आणि मी पुरूष असून एवढीशी गोष्ट मनावर घेतली...तेही सितल सारखी खंबीर पणे पाठीशी बायको असताना...त्याच मन आत्म ग्लानीने भरूण गेल..आणी सितल ला मिठी मारत म्हणाला 

""शितले तुज्यावानी सोन्यासारी बायको असताना मी वंगाळ ईच्यार केला. मला माफी दे..म्या तुजी आन घेवून सांगते या पूढे कसही दिस असो म्या काय बी वंगाळ मनात आणनार न्हाई...

आणि तो रडू लागला...

शितल आता मात्र खात्री पटली होती की या पूढ आपला धनी कधीच हारनार न्हाई...

तुर्तास सितलेन एका बळीराज्याला बळी जावू न देता जीवदान देवून

दुष्काळाशी लढण्यास सामर्थही दिल्याच समाधानाने तीचा चेहरा खुलला होता...Rate this content
Log in

More marathi story from Ranjana Bagwe

Similar marathi story from Tragedy