जीवाचा खेळ
जीवाचा खेळ
उद्या रविवार, सुट्टी चा दिवसं.. बाबांधाही आँफिस ला सुट्टी असते. म्हणून आम्ही खासं लोणावला सहलीचा बेतं आखला.. ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे सकाळी लवकरचं निघालो.. गाडीमधून जाताना ते पावसामुळे दाटलेले धुके, तो बेधुंद करणारा गारवा हलकेचं माझ्या कविमनालां सादं घालून जायचा आणि मनातं काव्य गुंजन घालायचे..
धुंद हा गारवा,
ओला हा पाऊस,
मनात गाजे नवी,
एकं चाहूलं....
काव्यांचा थवांचं जणू मनामधे विहरत होता. एकीकडे मन त्या वातावरणात रमले होते आणि दुसरे मन लोणावला पाहण्यासाठी आतुरं झालेल्या वेड्या स्वप्नांतं रमले होते. स्वतःमध्ये मी ईतकी गुंग होऊन गेली होते की कधी प्रवासाचां मैल सारून लोणावला आले हे मला कळाले चं नाही. स्वप्नांच्या दुनियेतं हरवलेल्या मला बाबांच्या एका हाकेने जागं आली आणि मी पटकनं गाडीतून उतरून रस्त्यावर उभे राहून ते नयनरम्य दृश्य पाहू लागले.
खरंच पावसाळा किती सुंदर असतो ना!! ते हिरवेगारं सौंदर्य, तो गारवा, ती ओली माती आणि या सगळ्यासोबतं निसर्गाच्या नयनरम्य देखावा पाहणे किती सुंदर असते ना । खरचं पृथ्वी वरचां स्वर्ग पहायचा असेल तर पावसाळ्यात एकदा तरी थंड हवेच्या ठिकाणी, किंवा किल्ले, धरण यांना भेटी द्यावा. एक लोणावला माझ्या कवी मनाला खूप सार्या गोष्टींची आठवण करून देतं होतां. जवळपास लोणावला फिरून आता आम्ही भूशी धरणाकडे जातं होतो. धरण हा माझा जिव्हाळ्याचा विषय. धरणाकडे जायच्या आधीचं मी आणि माझी बहीण पाण्यामध्ये किती भिजायचे, किती फोटो काढायचे यावर चर्चा करतं होतो आणि आमच्या या गप्पा मधे अखेर आम्ही धरणावर येऊन पोहचलो.
धरण आणि ते पाणी पाहून मन उड्या मारतं होते. आज सुट्टी मुळे जरा जास्तचं गर्दी जाणवतं होती. आमच्या सारखेच कित्येक जण कुटुंबासोबत, काही जणं मित्रांसमवेत आले होते. सगळे लोकं मजा करतं होते. मी आणि माझी बहिण अजून पाणयातं उतरणार ईतक्यातं आई बाबां च्या सुचना सुरू झाल्या, मुलींनो पाण्यात जरा सांभाळून, जास्तं कडेला जाऊ नका, असेचं चालू होते, आम्हाला खरे तर हे नको वाटंतं होते, आम्ही कायं लहान आहोतं का? पाण्यात आल्यावर मजा करायची आई बाबा असेचं करतात नेहमी असे मी आणि माझी बहिण बडबडतं होतो. आम्ही मात्र फार काही आई बाबांकडे लक्ष न देता मनमुराद पणे पाण्याचा आणि फोटो काढण्याचा आनंद घेतं होतो.
या धरणावरं एक चार पाच मुलांचा गृप आला होता. महाविद्यालयाची असतीलं ती मुले. माझे सहजं लक्षं गेले. ते खूप मस्ती करतं होते. आणि फोटो काढतं होते. आता ते खासं फोटो काढण्यासाठी धरणाच्या कडेच्या टोकावरं गेले तरी तेथील एक आजोबा जाऊ नका असे म्हटले, पण या मुलांनी त्यांचे काहीही ऐकले नाही आणि हे गेले आणि फोटो काढायला लागले. मी ही आता माझ्या बहिणीसोबतं पाणयातं खेळत होते, मजा करतं होते. अचानक वाचवा वाचवा असा आवाजं आला आणि मी आवाजं कुठून येतोय हे पाहू लागले.
क्षणिक त्या फोटो काढण्यासाठी गेलेल्या मुलांकडे माझे लक्ष गेले आणि तिचं मुले वाचवा वाचवा असे ओरडत होती, हे जाणवले मला. बघता बघता सारी लोक त्या मुलांकडे धावं घेतं होती, मी, माझी बहिण ऐवढयातं आवाजं ऐकून आई बाबा ही तेथे आले. मगं आम्ही सारे तिथे गेलो आणि गेल्यावर समजले की, फोटो काढतं असताना अचानक त्या गृप मधील एका मुलाचा पायं घसरला आणि तो खाली कोसळला. त्याचे सारे मित्र त्याला वाचवण्यासाठी वाचवा वाचवा असा आरडाओरडा करतं होते, पण आता उशीरं झाला होता खूप..
हा प्रकार पाहून आई बाबा तर लगेचं आम्हाला गाडीमधे घालून आपण घरी जाऊ असे म्हटले आणि आम्ही गाडीमधून पुण्याकडे रवाना होऊ लागलो.
गाडीमधून आम्ही घराकडे निघालो खरे पण या प्रकाराने मी सगळ्यातं जास्त अस्वस्थ झाले होते. माझ्या मनात विचारांचे वादळं घोंघावत होते. खरचं त्यांचा एका क्षणाचा आनंद कसा दुःखामधे रुपांतरीत झाला खरचं या घटनेमध्ये चूक कोणाची याचा अंदाज लावतं माझं मन विचारांमधे तल्लीन होते. खरचं जर त्या मुलांनी त्या आजोबांचे ऐकले असते तर आज ते सर्वजण सुखरूप असते. त्या मुलांचा उत्साहं, मजा करने स्वाभाविक चं होते आणि ठीक आहे आम्ही ही मजा करतं होतो, पण म्हणतात ना अती उत्साह कधी कधी घातंकं ठरतो. अगदी तसेचं काहीसे माझ्या त्या मुलांच्या बाबतीत झाले होते, त्यांचा तो क्षणाचा उत्साहाने त्यांच्या मित्रा च्या जीवासाठी घातक ठरला होता. कदाचित मला आता आई बाबा जे सुचना सांगतं होते, त्याचे महत्त्व कळतं होते, आणि त्यांची काळजी. तो मुलगा जो गेला त्याचेही आई बाबा असतील ना, त्यांना कायं वाटेल हे कळेल तेव्हा या विचारांनीचं अंगावरं शहारा उभारी घेतं होती. खरचं आजची सहल मला खूप काही शिकवून गेली. आयुष्यामध्ये काही गोष्टी या मर्यादा ठेवून केल्या तर चांगले असते जेव्हा आपण कुठल्यां ही गोष्टीची मर्यादा ओलांडतो तेव्हा ती गोष्ट घातकचं ठरते.
केवळ त्या मुलांचा एक फोटो काढण्याचा हट्टचं त्यांच्या मित्राच्या मृत्यूचे कारण ठरले होते. कसा 'क्षणाचा आनंद जीवाचा खेळ' होऊन बसला होता. आजच्या या घटनेने माझ्या आयुष्याला, माझ्या कवी मनाला, लेखकाला एक नवी कलाटणी दिली होती जणू. मी आजं खरचं खूप काही कमावले होते, आयुष्यभरासाठी.
मी माझ्या विचारांना पटकन आळा घातला आणि आई बाबा तूमच्या सुचना नाही ऐकल्या, दुर्लक्ष केले यासाठी माफी मागितली. कदाचित आज आई बाबा होते, त्यांच्या सुचना होत्या म्हणून चं आम्ही वाचलो होतो. नाहीतर कदाचित त्या मुलांच्या जागी आम्ही ही असतो,आमचा उतसाह कदाचित जीवावर बेतलां असतां.
इथून पुढे मात्र मी कुठलीही गोष्ट करण्याआधी माझ्या आई बाबांचा विचार करायचा हे मनाशी पक्के केले आणि एक नवे विचारं, नवी दृष्टी घेऊन मी गाडीमधून निसर्गाचे रूप पाहण्यातं पुन्हा गुंग होऊन गेले...
