The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

krishnakant khare

Tragedy

4.5  

krishnakant khare

Tragedy

जेव्हा तुम्हाला कळाले आपण प्रे

जेव्हा तुम्हाला कळाले आपण प्रे

10 mins
1.1K


जगात स्मितहास्याशिवाय काहीच नाही. जगात किडामुंगी जन्माला आल्यानंतर त्याला असं वाटायला लागतं कि आता आपण जग पाहायला लागलो, तेव्हापासून आपण सगळे सुरुवातीला एकमेकाशी स्मित हास्य करूनच आपल्या दैनंदिन जीवनाला सुरुवात करतो. आणि कुठेतरी म्हटलंच आहे नाही पेक्षा सिनेमातलं गाणं आहे “दुनिया मे रहना है, तो काम कर प्यारे, हात जोड कर सलाम कर प्यारे, वरना दुनिया तुझे जीने नही देंगे जीने नही देंगे, हसना नही देंगे दुनिया मे रहना है तो काम कर प्यारे हात जोड कर सलाम करे प्यारे” ज्यावेळी आपण सामर्थ्यवान नसतो त्यावेळी आपण सर्वांशी सहकार्याने वागतो बोलतो चालतो त्यावेळी आपण स्मितहस्याचाच उपयोग करतो पण आपल्या लहान बाळा मध्ये कोणताही असो , कुठचाही असो आपल्याला त्याबद्दल कौतुक वाटते. आणि तो स्मितहास्य आपल्याबरोबर खेळत राहतो, हसत राहतो, आपल्याला पण त्याचा लळा लागतो. हीच त्याची हळुवार प्रेमाची नैसर्गिक क्रिया असते आपणही  आपसूकच त्याच्याही प्रेमात पडतो, निसर्गातल्या पशू, पक्षाचे, मानवाचे लहान बाळ बघितल्यावर लळा लागतोच कारण ती त्यांची प्रेमाने प्रतिक्रिया देण्याची नैसर्गिक क्रिया असते, लहानपणीचे त्यात कुठलेच हेवेदावे असत नाहीत. जगात कुठेही कितीही उलथापालथ झाली तरी एकामेकांना स्मित हस्याशिवाय पर्यायच नाही हेच खरं.


   जेव्हा बाळाला समजायला लागतं त्या दिवसापासून ते बाळ सगळ्यांबरोबर आपला चेहरा नेहमी हसरा ठेवतो. पण त्याला सारं काही कळत असते अशातला काही भाग नसतो. पण ती एक मानवाला स्मितहास्य म्हणून नेसर्गिक ऊर्जा दिली असते. जसजसे आपण मोठे होतो वयाने ,शरीराने आणि मनाने सुद्धा तेव्हा मात्र आपल्या स्मित हास्य चेहऱ्यावरचं कमी कमी होत जातं म्हणजेच येथे आपण आपल्या नैसर्गिक क्रिया स्वतःहून कमी करण्याचा प्रयत्न करीत असतो किंवा आपल्याकडून सभोवतालचा वातावरणाचा परिणाम म्हणून असं होत असेलच म्हणजे स्मित हास्य म्हणजे सुरुवातीचे हळूवार प्रेम आणि हेच सुरुवातीचे हळूवार प्रेम म्हणजेच प्रेमळ चेहरा प्रत्येकाला हवाहवास वाटणार असतं, स्मितहास्य म्हणजे सुरवातीचा हळूवार प्रेम ह्याचा परिणाम फारच चांगले होणारा असतो. आपण म्हणू ते कसे काय बुवा कारण फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन ह्यात तत्वाने हे सर्व घडत असते उदाहरण द्यायचं असेल तर आपण पण बस मध्ये असो किंवा रेल्वेमध्ये असो किंवा मग कुठेही अनोळखी ठिकाणी असो तुम्हाला किंवा आपल्या चेहऱ्यावर सुरुवातीचं स्मितहास्य म्हणजे हळूवार प्रेमाचे म्हणजे स्मित हास्य हेच पाहिजे असते आपण एक प्रयोग म्हणून जरी केला तरी अनुभव चांगला दांडगा येऊ शकतो.

बसमध्ये आपण चेहऱ्यावर प्रसन्नता,प्रेमळ चेहरा म्हणजे स्मितहास्य न घेता रागीटपणा घेतला तर समोरच्याला वेगळा परिणाम होतो मग तोही रागाने आपल्याबरोबर व्यवहार करतो मग तो बस कंडक्टर असो कि मग तो आपला सहप्रवासी असो कि मग तो रेल्वे मधला प्रवासी असो, किंवा विमाना मधला प्रवासी असो मग तो अनोळखी ठिकाणांमध्ये आपल्या रागीट स्वभाव दाखवल्यामुळे तेथे आपला नकारात्मक परिणाम घडतो मग ती व्यक्ती कितीही मोठी बॅरिस्टर असली, कितीही मोठे मंत्रीसंत्री असली तरीही त्या व्यक्तीशी इतर जण रागानेच, तुसडेपणाने व्यवहार करणार. हळूवार प्रेमळ चेहरा किंवा प्रसन्न चेहऱ्यावर असलं म्हणजे स्मित हास्य असलं तर चांगल्या गोष्टी आपल्या बरोबर चागल्याच घडतात.

 

    मोठमोठ्या तज्ञांचे एकच मत आहे माणसाच्या आयुष्यात एकदाच प्रेम होतं मग ते लहानपणीच्या प्रसंगात असो वा तरुणवयामध्ये किंवा म्हातारपणी आपण सर्व वाचक मंडळी लहानपणीच्या प्रेमाला निस्वार्थी प्रेम म्हणू शकतो आणि तरुणपणाच्या प्रेमाला सावध प्रेम म्हणू शकतो आणि म्हातारपणाच्या प्रेमाला शहाणपणाचा प्रेम म्हणू शकतो , लहानपणी अर्थात तरुणपणाच्या आधी जे प्रेम उमगायला लागतं ते प्रेम शारीरिक वासनेचा नसतं ते प्रेम आत्मिक असतं कारण आपल्या शारिरीक वासना नसतातच पण जर का अशाच वयामध्ये वाईट संबंध बाहेरच्या वाईट सवयी लागल्या तर त्या लहान वयातच त्याचा आयुष्य कोलमोडतो, शारीरिक-मानसिक वाढ न होता, वाढ खुंटते ,म्हणून अशाच वेळी म्हणजे त्याच्या लहानपणापासून आपल्या पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला हव म्हणजे संभाव्य धोक्यापासून आपण सुरक्षित राहू शकतो. तरुणपणातल प्रेम म्हणजे शारीरिक मानसिक गरज म्हणून विरुद्ध लिंग विरुद्ध प्रेम वाढीस लागतं आणि तशीच व्यक्ती योग्यतेची भेटली मग बघायलाच नको मग ही मजल साताजन्माची होते म्हणजेच “हम तेरे बिन रह नही जाते तुम नही आते हम मर जाते है ” अशा काही गोष्टी होऊन जातात आणि म्हातारपणाचे प्रेम म्हणजे शहाणपणाचा प्रेम म्हणतो. प्रेमात कधीकधी स्वार्थीपणा पण आलेला असतो कारण लहानपणा पासून ते म्हातारपण पर्यंत प्रेमाचे अनेक चांगले अनुभव आलेले असतात. म्हणजे काही जण जे काही आंबटशौकीन असतात ते वयस्कर तरुणा तरुणींना वेगळाच पेचात पकडून प्रेमाच्या आणाभाका करून त्यांच्या भावनांचा खेळ करून स्वार्थीपणाचा आव आणून आपल्या शारीरिक सुखासाठी आपला स्वार्थ साधू शकतात पण आपण असेही पाहतो एक सुंदर तरुणी फार वय झालेल्या माणसाबरोबर प्रेम करून बसते. कधीकधी आशा विवाहगाठी योगायोगाने झालेल्या आहेत , इतिहासात पण तर ह्याच तर काही मोठ्या शोकांतीका झालेल्या आहेत . काही वर्षांपूर्वी विचित्र विश्व हे मासिक पुस्तक फार वाचला जाई कारण त्यात चांगल्या मनोरंजन करणाऱ्या ज्ञानसंवर्धन करणारं ते पुस्तक फार आवडीने वाचले जायी, इतिहासात काही घडून गेलेल्या गोष्टी, काही गुपिते बरोबर विचित्र विश्वात म्हणजे" विचित्र विश्व "या मासिक मासिकात वाचायला मिळायचे. त्यात मी वाचले होते की औरंगजेबाला मावशीच आवडली होती आणि तिच्याबरोबर लग्नासाठी भरपूर आटापिटा त्याने केला होता.

 म्हणजेच त्याला कळलं की नाही ते माहीत नाही पण तो प्रेमात पडला होता हे मात्र नक्की.        

 

मी त्यावेळी क्राइम डायरी करायचो त्यात जास्तकरून मुख्य भूमिका न करता छोटे-मोठे रोल करायचा कारण त्यात मला रोज मला काम मिळावं या हेतूने मी कधी हवालदाराच्या तर कधी मी स्वतःच्या इन्स्पेक्टरच्या तर कधी तर कधी डॉक्टरच्या एखादी  कंपाऊंडरच्या छोटे-मोठे भूमिका करत असे एकदा काय झालं असंच वसईला एका आर्टिस्टने योगेश लोकमानेने एका बाईला म्हणजे सज्ञा साळवीला सिरीयल मध्ये कामासाठी आणलं आणि त्याने माझ्याबरोबर त्या बाईशी ओळख करून दिली मी तिचा फोन नंबर घेतला व तीने माझा नंबर घेतला. त्या आर्टिस्ट ने माझ्या बरोबर ओळख करताना तिला सांगितले “ह्यांचं पिक्चरमध्ये, टीव्ही सिरीयल मध्ये बरेच काम असतात, ते करत असतात” तितक्यात ती साधी सरळ दिसणारी बाई सज्ञा साळवी त्याला म्हणाली “ हो ओळखते ना त्यांना कधी मध्ये सिरीयल मध्ये दिसतात” हे ऐकून मला हसायला आलं योगेश लोकमाने व संज्ञा साळवी ते दोघे सुद्धा माझ्याबरोबर हसले. तिला सज्ञा साळवेला घरी पाठवून मला योगेश लोकमाने म्हणतो कसा “मुलगी सॉलिड हाय मी तिला रिसॉर्टवर घेऊन गेलो तिकडे भरपूर मजा केली. तिच्याबद्दल अजुन काहीतरी घाणेरडे शब्द बोलत होता त्याचे बोलणे ऐकून मी सुन्न झालो होतो पण मी त्याला माझी काही प्रतिक्रिया दिली नाही पण मला एक दुःख झालं चित्रपटसृष्टीचा नाव अशीच लोक बदनाम करतात आणि चित्रपट सृष्टी मायाजाळ ही मायाजाळ असते म्हणून येथे वावरताना मुली जातीच्या बाईला सांभाळावे लागते कारण कधी कधी मुली घरातून पळून हिरोइन बनायला,आर्टिस्ट बनायला येतात आणि कुठेतरी योगेश लोकमानेसारख्या दलालाच्या जवळ जाऊन हीरोइन बनण्याच्या ईर्षेने आपलं सर्वस्वी स्त्रीधन लुटून बसतात.पैसा, इज्जत, मानमरताब सर्वकाही. आणि मग कॉलगर्ल म्हणून तर कुठे कोठ्यावर तर कुठे बियर बार मध्ये नाचताना दिसतात. किंवा घरी तोंड दाखवू नको मग शेवटचा पर्याय काही आत्महत्या करून बसतात. स्त्रीसंघटने संस्थेने यावर जातीने लक्ष घालायला हवं. 


सज्ञा साळवी तशी उंचीला मध्यम गोरीपान सडसडीत बांधा तशी ती सुंदर आकर्षक होती. मला ती एका शूटिंगला भेटली माझं तिच्याबरोबर बोलणं झालं मला ती तशी साधी भोळी वाटले तिच्याबद्दल योगेश लोकमाने कडून जरी वाईट साईट ऐकलं होतं तरीपण जे समोर दिसतं त्यावर विश्वास ठेवणारा मी माणूस होतो. मी तिला आदराने विश्वासाने घेऊन विचारपुस केली, मित्रत्वाच्या नात्याने बोललो मी तुम्हाला कधी प्रोडक्शन कडून लेडीज आर्टिस्टची रिक्वायरमेंट लागली तर जरूर बोलवीन

याआधी योगेश लोकमाने चार-पाच फिल्म प्रोडक्शन शूटिंग ला गेल्यावर इथल्या प्रोडक्शन माणसांचा वाईट नजरेचा कि चांगले नजरेचा हे त्याच्या वागण्याची कशी दृष्टी असेल त्यावर अवलंबून होती पण माझ्याकडून एका आदराचं वागणं बघून ती अजून मला आदराने बोलत होती तिचा तो नम्र स्वभाव मला आवडला होता काही दिवसांनी मला कळलं होतं कि ती लग्न झालेली बाई आहे तिला दोन तीन मुलं,नवरा मिळून एक ते कुटुंब आहे पण तरीही मला तिच्याबद्दल आदर होता एक स्त्री म्हणून तिने सुद्धा माझ्याबरोबर व्यवहारात वागताना बोलताना नम्र स्वभाव ठेवला होता भलेही योगेश लोकमान्य माने हा वाईट साईट तिच्याबद्दल माझ्याकडे बोलायचा पण मला योगेश लोकमानेचे ते बोलणे खोटे वाटत होते. मी विचार करायचो अरे ती लग्नाची बायको तिला दोन-तीन मुले नवरा कुठे सर्विसला जात असेल, ती आवड म्हणून ती चित्रपट सिरीयल मध्ये कलाकार म्हणून प्रयत्न करतेय म्हणून काय त्याच्या कमजोरीचा आपण फायदा घ्यायला पाहिजे का? हेच योगेश लोकमाने सारखे लोक आपल्या स्वार्थासाठी अशा अबलेचा गैरफायदा घेतात फिल्म इंडस्ट्री ला बदनाम करतात एकदा काय झालं मला सज्ञा साळवेचा फोन आला म्हणाली “ प्रियान तुम्हीऑडिशन ला येणार का? मी पण तेथे असणार आहे” मी म्हणालो" ठीक आहे मी येईन ऑडिशनला”

      

मी ठरल्यावेळी चांगलं नटून-थटून ऑडिशनला गेलो होतो मला सज्ञा साळवीचे आठवण येत होती वाटलं ही सज्ञा साळवे तिथे काय करत असेल? आम्हाला ज्यांनी ऑडिशनला बोलवलं होतं त्याने ऑडिशन घेता सगळ्यांना एकत्र बसवलं आणि

स्क्रिप्टमधल्या पात्रतेचा पात्रांचा परिचय त्या भूमिकेचा आढावा घेतला कोण कशात त्या पात्रात फिट बसतो ते त्यांनी पाहिलं मी दुरूनच सज्ञा साळवीला पाहत होतो ती सुद्धा नटून थटून आली होती. ती छान वाटत होती. पण कोणी तिला फसवु नये असं सारखं मला वाटत होतं, आणि मी तिचे चांगले चिंतित होतो कि ती तिला यातून चांगला मार्ग मिळावा आणि माझ्या काही ओळखीच्या प्रोडक्शन हाऊसला मी फोन करून तसं सांगितलं कारण जिथे जिथे चरित्र कलाकार म्हणून मी काम केलं होतं तिथे सगळ्यांचा माझ्यावर विश्वास होता मी भूमिकेची कंटिन्यूटी कधी सोडली नाही भले माझं नुकसान झालं तरी म्हणून अशा प्रोडक्शन वाल्यांना मी फोन करून तिच्याबद्दल चांगलं सांगत होतो माझा उद्देश होता तीला चांगलं काम मिळावं एक-दोन सिरीयल ,डोक्युमेंटरी मध्ये तिला कामे मिळाली पण नाटकाचा किंवा अभिनयाचा पाहिजे तसा तिला जास्त अनुभव नव्हता तिने निश्चय केला आपण आता प्रोडक्शनला जूनियर सीनियर आर्टिस्ट पुरवायचे. एकदा तिचा परत फोन मला आला मला म्हणाली खरे मी तुम्हाला कामाला बोलवीन तुम्ही याल ना हे ऐकून मला आश्चर्य वाटलं कारण कोठे साधीसुधी दिसणारी ही बाई कलाकार बनायला आली होती आणि आता कलाकारांना कामाला बोलवणार आहे मला तिचं आश्चर्य आणि कौतुकही वाटलं.मी आर्टिस्ट म्हणून ज्या आर्टिस्ट सप्लायरकडे काम करत होतो. तिथे प्रोडक्शन मध्ये माझी क्रेडीट मी चांगली ठेवली होती. त्यामुळे माझ्यामुळे त्या आर्टिस्ट सप्लायरला प्रोडक्शन कडून मी आर्टिस्ट म्हणून लागायचो ती कारण कंटिन्युटी असली कि ती मी कधीच तोडत नसल्याने त्यामुळे तो विश्वास वाढला होता पण आता सज्ञा साळवी पण आर्टिस्ट सप्लायरचं काम करायला सुरुवात केली होती. आता संज्ञा साळवी ही आर्टिस्ट सप्लायर च्या कामात हुशार झाली होती पण आता ती भल्याभल्यांना पाणी पाजत होती. तिचा माझ्या बद्दलचा आदर वाढत होता आणि मलाही तिच्याबद्दलचा आदर वाढत होता एकदा तिने नाईटला पिक्चरसाठी मला शुटिंगला बोलावलं होतं मी गेलो  इतर आर्टिस्ट पण होते ते तिने ज्युनियर आर्टिस्टसाठी बोलवले होते पण मला तिने कॅरेक्टर साठी बोलवले होते. त्या तीच्या गोतावळ्यात काही नवीन आर्टिस्ट सुद्धा आले होते. त्या आर्टिस्ट मधले काही धुतलेले अर्ध्या तांदळासारखे आर्टिस्ट होते ते असे शायनिंग मारायचे जसे त्या लोकेशनवर तेच शाहरुख खान ,ममता कुलकर्णी आहेत असे त्यांचा नखरा होता पण नंतर गोष्ट घडली वेगळी सज्ञा साळवीचाचा असिस्टंट आर्टिस्टचीमर्याद्याक्षबाहेर मस्करी करत होता आणि त्या लेडीज आर्टिस्टला ते पटलं नाही म्हणून ती लेडीज आर्टिस्ट संज्ञा साळवीच्या असिस्टंट बद्दल माझ्याबरोबर बोलत होती हेच बोलणे सज्ञा साळवीला पटत नव्हतं. पाहिल्यावर सज्ञा साळवी मला पाहून भडकून बोलली "खरे मला अशी अपेक्षा नव्हती किती वेळ तरी तिच्याबरोबर  बोलत बसाल "मी तिला समजून सांगितलं" मॅडम तुम्ही विचार करता तशी ती गोष्ट नाही तुमच्या असिस्टंटने तिच्याबरोबर वेगळी हरकत केली आहे. तेच मला ती बाई सांगत आहे आता मी ते भांडण वाढायला नको म्हणून ते मी प्रयत्न करीत होतो तुम्हाला आवडत नाही तर ठीक आहे मी जाऊन बसतो त्या कोपर्याच्या खुर्चीत नंतर सज्ञा साळवी मला कोपऱ्यात येऊन सांगितलं "खरे त्या सगळ्यासमोर मी तुम्हाला बोलले मला माफ करा पण काही बोलले नसते तर ते सगळे आर्टिस्ट माझ्यावर हवी झाले असते म्हणून तुम्ही चांगले समजदार म्हणून मी तुम्हाला बोलले, राग आला असेल तर मला माफ करा!" आता एवढ्या समजूतदारपणे साळवी मॅडम मला समजून घेऊन बोलत होती तर मी तरी कशाला रागावू पण ती सगळ्यांसमोर माझ्याबद्दल आदराने माझी माहिती द्यायची आणि सांगायची त्याने ज्युनियर पासून तर कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून चांगलं काम केलेलं आहे पण त्याने त्याचा कधी इगो केला नाही, भाव खाल्ले पणा केला नाही त्यांचं लेडीज बद्दलच व्यवहार फार चांगले आहेत हे बोलणे ऐकून मला ती साधी भोळी वाटणारी सज्ञा साळवी तीच का? असं वाटायला लागलं होतं कारण ती आता पूर्णपणे बदलून गेली होती पण आता जसजसी तिचं काम वाढत गेलं तसतशी ती मला सिरीयल मध्ये कामाला जरूर बोलवत असे मी आता तिच्या या कामाच्या प्रेमातच पडलो होतो कारण तिने आपला पाय घसरून दिला नव्हता तिला मी सुरुवातीला काही गोष्टी फिल्मइंडस्ट्री बद्दल कशात धोक्याचे असतात बाईच्या जातीला हे समजावून सांगितलं होतं आणि तिला आता तरी सावध केल्यामुळे ती चांगल्या पद्धतीने आपल्यासह आपली कामे पण हाताळत होती आता माझ्यात अनुभवाचा काय तिला गरज पडत नव्हती आता तिच्या सीनियर कडून कडून कामाचा अनुभव घेत होती तिने मात्र माझा तर माझा आदर कायम चांगला ठेवला होता मला तिच्याबद्दल आत्मीयता वाटत होती.एकदा तीचं आणि नवरार्यचं घरात कोणत्या तरी विषयी वादविवाद झाला ती मुलांनबरोबर राहत होती,नवरा कुठेतरी वेगळा राहत होता.


मला ही गोष्ट कुठुन तरी कळली, एक कुटुंब कुठुन तरी असं तुटल्यावर जे काही दु:ख असते जे ज्यानी अनुभवलय ते त्यालाच माहित की ते दु:ख काय असते ते.एकदा तीने शुटिंगला बोलावल होतं. मला तिचा नवरा कुठेतरी भेटला होता,त्याने घरातली सगळी स्टोरी मला सांगितली. मला दया वाटली होती,मनोमन हे कुटुंब पुन्हा एकत्र येवो असं मी देवाला विनवत होतो.म्हणून मी आता संज्ञा साळवीला ईकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्यावर मी तिच्या नवर्याविषयी गोष्ट काढली,काही मदत लागली तर तसं सांगा,पण संज्ञा साळवी म्हणाली "प्रियान भाऊ,तुम्ही नका टेन्शन घेऊ, जर असं काही वाट तर नक्की फोन करेन"आणि स्वतः संज्ञा अशी बोलल्यावर मी पण विचार केला संसार तिचा तिचा आहे आपण नको उगाचाच कोणत्या गोष्टी ला कारणीभूत व्हायला. पण मीच मला समजावत होतो की लग्न झालेल्या बायकांवर ती संकटात असेल तर कोणी परक्यांनी पवित्र भावनेने प्रेम केलं तर ते का नकोय? कारण यात तो तिच्या नवर्या मुलासकट आदर करू पाहतोय,तिचं भलं पाहतय आणि कोणतीच तो स्वार्थ बुद्धी ठेवत नाही. तीच्या कुटुंबा बद्दल, तिच्याबद्दल जो काही आदरभाव आहे मग याला काय म्हणावं हे मला मला उमजेना..... कोणी सांगितलं तेव्हा मला कळलं आहे कि मी तीच्या कोणत्या असं प्रेमात आहे जे तिच्या नवर्यामुलासकट मला आदराने बघतात,आणि कुठेतरी एका स्त्री चा आदर म्हणून असा वागलो त्याच गोष्टीला माझा बायको मुलांना सुद्धा बरं वाटतेय," इथं कुठे माझा नवराचा,आमच्या पप्पांचा अशा कोणत्या प्रलोभनांना पाय नाही ना घसरला हेच बघून तर सुखी संसाराला अजुन काय महत्त्वाचे असते,सगळं काही मर्यादेत राहुन होत होतं, प्रेम होतं यात काही शारीरिक ओढ नव्हती फक्त तिचं भलं व्हावं एक निर्मळ पवित्र ओढ होती. 


जेव्हा मला कळलं तेव्हा

वाटलं आपण एका वेगळ्याच प्रेमात आहोत.पण सगळं कसं कोणालाच टेन्शन नसणारं होतं. 


Rate this content
Log in