Sangieta Devkar

Romance Others

3  

Sangieta Devkar

Romance Others

इश्क का रंग - भाग 1 # रंग बरसे

इश्क का रंग - भाग 1 # रंग बरसे

4 mins
234


अरे मनु आज ही इतकी सिपंल का आलीस ग. पार्टी आहे ही. असू दे ग नीता मला नाही आवडत मी अशीच ठीक आहे. हो तू तर आता हिमालयात जा आणि संन्यास घे इतकंच बाकी आहे. हम्मम मनवा इतकंच बोलली. आज त्याच्या ऑफिस ची पार्टी होती. सगळ्या जणी छान नटून थटून आल्या होत्या. त्यांचा बॉस आदित्यचा आज वाढदिवस होता. आदित्य बत्तीस वर्षाचा बॅचलर एकदम हॅन्डसम हंक जॉली आणि नेहमी हसत खेळत असणारा. ऑफिस सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागणारा. सगळ्याना आवडणारा असा होता. आधी शिक्षण मग करियर मग सेटल यात लग्नाचं वय निघून गेले पण आज ही एकदम खतरनाक दिसायचा ऑफिस मधील नीता,नेहा मीना विद्या आणि लग्न झालेल्या वनिता,मनीषा ही आदित्य ला लाईक करायच्या पण हा पठया हासून सगळ्याना गप्प करायचा. मनवा मात्र या गोष्टी पासून लांबच होती. आदित्य आवडत नवहता असे नाही पण जे शक्य नाही ती गोष्ट करून काय उपयोग असा ती विचार करत होती. मनवा ही दिसायला छान होती. स्वभाव शान्त होता तिचा. व्वाव सर किती हँडसम दिसत आहेत आज . मीना बोलली तसे सगळे जण आदित्य कडे बघू लागले. ब्लू लाईन चा शर्ट आणि ऑफ व्हाईट कॉटन जीन्स मध्ये आदित्य मस्तच दिसत होता. केक कापला सगळ्यानी त्याला विश केले. त्याच्या सोबत फोटो काढले. पण मनु मात्र ऐकटीच बसली होती.


हॅलो मनवा कशी आहेस ओहह सर मी मजेत . सर मेनी मेनी हॅपी रिटर्नस ऑफ द डे मनु ने आदित्य ला विश केले. थँक्स मनवा पण तू का ऐकटी बसली आहेस जा बाकीच्या सोबत एन्जॉय कर ना. नको सर मी इथेच बरी आहे. मनु ने हलक्या पिवळ्या रंगाची साडी घातली होती. केसांची सैल वेणी घातली होती. बाकी काही ही मेकअप नवहता तरी ही ती सुंदर दिसत होती. आदित्य ने नकळतपणे तिला न्याहाळले. एक विचारू का मनवा हो बोला ना सर. तू नेहमी असे फिक्कट रंगाचे कपडे का वापरतेस? डार्क रंग तुला अजून छान दिसेल. नाही सर मला नाही आवडत. मनू सॉरी मनवा सर चालेल मला मनुच म्हणा. तुझे वय पण नाही झाले इतके मग का अशी राहतेस. रंगाची अँलर्गी आहे का तुला? सर आहे अशी मी साधीच बरी आहे नाहीतर आपल्या समाजातील लोक तुम्हाला माहीतच आहे कसे आहेत. एकटी बाई म्हणजे त्याचीच मालमत्ता अस समजतात ते . मी सजले नटले तर उगाच लोकांच्या नजरेत येणार त्या पेक्षा आहे अशी ओके. मनु चल ना जेवायचे नाही का? नीता तिच्या जवळ येत म्हणाली. सर यु आर लुकिंग किलर आदित्य ला पाहून नीता बोलली. ओहह थँक्स नीता. आता जा तुम्ही डिनर एन्जॉय करा. नीता मनु ला घेऊन निघाली. काय ग सर काय बोलत होते तुज्याशी . काही नाही ग एकटी का बसलीस विचारत होते. ओह म्हणून तुला कंपनी द्यायला बसले होय. नीता तस काही नाही. पण आज आदित्य भारीच रुबाबदार दिसतोय ना. हम्मम नीता चल जेवू. मनु ने विषयच कट केला.


सकाळी मनु ऑफिस ला आली . आदित्य ही आला होता. काही ना काही कामाचं निमित्त काढुन तो मनु ला केबिन मधये बोलवत राहिला. त्याला मनवा ऑफिसमध्ये जाईन झाली तेंव्हा पासूनच आवडत होती. आता तो आपल्या फिलिंग्ज अजून लपवून नाही ठेवू शकणार होता सो मनु शी लवकरात लवकर या वर बोलले पाहिजे असे त्याने ठरवले.दुपारी लंच ब्रेक मध्ये त्याने मनू ला ऑफिस सुटल्यावर थांबायला सांगितले. सगळे जण निघून गेले. मनु चल मी सोडतो तुला घरी त्या आधी आपण कॉफी घेऊयात. इथेच ऑफिस मध्ये निवांत बोलता येईल असे आदित्य ला वाटले. त्याने पियून ला कॉफी आणायला सांगितली आणि मनवा जवळ चेयर वर बसला. मनु आज मुद्दाम मी तुला थांबवले कारण मला थोडं बोलायचे आहे तुझ्याशी. काय सर माझे काम चुकते आहे का काही. नो नो कामा बद्दल नाही. हे बघ मला कोड्यात बोलता येत नाही जे आहे ते मी स्पष्ट बोलतो. पीयून कॉफी घेऊन आला. कॉफी घे मनु तो बोलला. कॉफी संपल्या वर आदित्य म्हणाला,मनु तुला पहिल्यादा या ऑफिस मध्ये पाहिले ना तेव्हाच पासून तू मला आवडतेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आपली धारदार नजर तिच्यावर रोखत आदी बोलला. सर काय बोलता आहात तुम्ही ? खर तेच बोलत आहे. आय रियली लव यु मनु म्हणत त्याने तिचा हात हातात घेतला. नाही सर म्हणत तिने हात बाजूला घेतला. सर मी असला विचार ही करत नाही रादर मला लग्नच करायचे नाही आहे.का नाही करायचे आहे लग्न मनु? एकदा विषाची परीक्षा घेतली सर पुन्हा नको आहे मला तो अनुभव. पण सगळे पुरुष सारखेच असतात हे तू का ठरवतेस? माझं मन नाही तयार सर आता मी दुसरं लग्न नाही.


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance