ईश्वराचं रूप आई
ईश्वराचं रूप आई
आ म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचा संगमम्हणजे आई. फक्त दोन अक्षरांचा शब्द पण आपल सगळ विश्वच आपली आई असते.माणूस पैशाने सगळ माणूस पैशाने सर्व काही विकत घेऊ शकतो पण आईचे प्रेम कधीच मिळू शकत नाही.म्हणून म्हणतात. " स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी "आईची थोरवी खूप मोठी आहे. आईचा आपल्यापाठीमागे आर्शिवाद आहे म्हणून अशक्य ते शक्य करून दाखवतो. तिच्या प्रेमाची महती शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.आई.... हजार जन्म घेतले तरी एका जन्माचेऋण फिटणार नाही. अस, निस्वार्थीप्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली आई...सगळ्यांच प्रेम काळानुसार बदलत पण आईच मुलांवरील प्रेम कधीच नाही बदलत.आई ही एकच व्यक्ती आहे , जी तुम्हाला इतरांपेक्षा नऊ महीने जास्त ओळखत असते. मरनयातना सहन करूनही आपली जीवनयात्रासुरू करून देते ती आई. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपल बाळ कसही असू देत आईला प्रिय असत. स्वतःला वेदना होत असताना ती म्हणते,' माझ बाळ कस आहे ' ती आई असते.आई...ही एकमेव व्यक्ती आपला चेहरा बघायच्याआधीपासून आपल्यावर प्रेम करते. आईसाठी सगळी लेकर सारखी आणि तिचा जीव की प्राण असतात. आपल्या लेकरांना वाढवताना ती किती कष्ट घेत असते पण ती कधीच थकत नाही. आपल्या मुलांसाठी ती सदैव तत्पर असते. मुलांवर चांगले संस्कार करते.
मुल कितीही मोठ झाल तरी आईसाठी ते लहानच असतात. आपल्याला कितीही टेन्शन, प्रोब्लेम्स असू देत क्षणभर जरी आईच्याकुशीत विसावलो तरी मन हलक होत.आई आपल्याला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवते.आपल्या चेहर्यावरूनती आपल्या मनात काय चाललय, आपल्या लेकराला काय झालय ? हे बरोबर ती ओळखते.आई ही आपली मैत्रिणच असते. आपण बाहेर गेलो तर आपण घरी येईपर्यंत आपली वाट बघत आई जागीच असते. सकाळी आपल्या मुलांसाठी गरम पाणी, नाश्ता, जेवणापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ आईच करत असते. 24 / 7 तसेच वर्षाचे 365 दिवस आई आपल्यासाठी राबत असते. आई नुसती आई नसते प्रसंगी ती वडीलांचीही भुमिकानिभावू शकते.घार फिरते आकाशी परी तिची नजर पिलांपाशी... पक्षिणी चारा आणायला गेल्या तरी त्यांचलक्ष आपल्या पिलांपाशी असत. आईसुध्दाघरच सगळ काम आटोपून कामाला जाते पण तिच लक्ष आपल्या मुलांकडे असत. आपल्याप्रत्येक गोष्टीकडे आईच लक्ष असत. आपल्या लेकराने शिकून मोठ व्हाव , स्वतःच्यापायावर ऊभ राहाव, समाजात एक चांगला माणूस
म्हणून नाव कमवाव हेच प्रत्येकआईला वाटत. म्हणून ती स्वतः दिवसरात्र झटते. कधी काही चूकल तर समजावून सांगते,कधी शिक्षाही करते पण ती आपण सुधराव , आपल्या चांगल्यासाठीच करते, त्याच तिलाचवाईट वाटत म्हणून प्रेमाने लगेच जवळ करते.कधी आपल्याला हरल्यासारख वाटल ना आईचे कष्ट आठवा, आपोआप तुम्हांला तिच्यापासून प्रेरणा मिळेल. दुःखविसरण्यासाठी जगातील सगळ्यात पावरफुल औषध म्हणजे आईला मारलेली मिठी...
आई आपल्यासाठी एवढ करते पण तीआपल्याकडून कधीच काही मागत नाही.या माउलीचे उपकार आपण कधीच फेडुशकत नाही. आपण शिकाव, मोठ व्हावनि आपल्या लेकरांनी छान आयुष्य व्यतीतकराव हेच तिच स्वप्न, यासाठी ती रात्रीचा दिवस करते. खुप कष्ट करते. मेहनत घेते.दोन शब्द प्रेमाने तिच्याशी बोलल तरी तिलाखुप छान वाटत. आपल्या लेकराने आईलामारलेली मिठी हा तिच्यासाठी नेकलेसपेक्षाही मोठा दागीना वाटतो. अशी असते आई...कुठहीली अपेक्षा न ठेवता शेवटपर्यंतआपल्यावर प्रेम करते नि सोबत असते. जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई....काही चुकल तर आई कधीच रागवत नाही.प्रेमाने जवळ घेऊन समजुन सांगते.
आई आपल्या मुलांच्या पाठीमागे नेहमी खंबीरपणे उभी असते.कोणत्याही कठीण प्रसंगात तीच आपली ताकद असते.तिचा मुलांवर खूप विश्वास असतो, तिलाएवढ माहित असत की माझी मुल कधीच हारणार नाही. तिच्यामुळे आपल्याला लढण्याच बळ मिळत.आई शिक्षीत असो किंवा अशिक्षीत जेव्हा तुम्ही जीवनात अपयशी होता तेव्हातिच्यासारखा मार्गदर्शक या पृथ्वीवर दुसरा शोधूनही सापडणार नाही. आपल्या आयुष्यात कोणी सोबत असो किंवा नसो कधी कोणी सोडून जातात , दुरावतात देखील पण आई आपल्यासोबत कायम असते.खरच आई ही थोर व्यक्ती आहे.आयुष्यात आईची जागा कोणीचघेऊ शकत नाही. तिची थोरवी गायलाशब्दही अपुरे पडतील.ठेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्याहृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ट मला माझी आई...
आईसारखे दैवत सार्या जगतामध्ये नाही.आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याहीगोष्टीसाठी आईला सोडू नका. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. कोण म्हणतं प्रेम एका शब्दात सांगता येत नाही." प्रेम सांगता येत एका शब्दात तो शब्द म्हणजे आई. " आईचे आपल्यावर अनंतउपकार असतात म्हणून तिच्यासाठी वेळ काढा. तिला आपण मोठे झाल्यावर सांभाळणहे आपल कर्तव्य प्रत्येकाने पार पाडाव. तीतीच्या कर्तव्यात कधीही कमी पडत नाही.ती आपल्यासाठी एवढ करते तर आपणतिला नेहमी आनंदात ठेवू शकतो.मोठे झाल्यावर आई ही आपली जबाबदारीअसते. आई आहे तर आपल्याजवळ सर्वकाही आहे.म्हणून तिचा आदर केलाच पाहीजे. फक्त आज मातृदिन आहे म्हणुनसेल्फी घेणे, स्टेटस ठेवून आपल प्रेम व्यक्त करणेनाहीतर नेहमी आईसाठी वेळ काढला पाहीजे.तीची काळजी घेतली पाहीजे. कारण आईचीजागा कधीच कुणी घेऊ शकत नाही. काही झालतरी आपली आई नेहमी आपल्या पाठीशी उभीअसते. आपल्या लेकराला साथ देते. खुप मोठी ताकद आहे.
जी आपल्याला कधी हरू देत नाही.काही कमी पडू देत नाही. तिचा आर्शिवाद नेहमीआपल्या पाठीशी असतो. आपल्यावर पहिल्याश्वासापासुन तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यावरनिःस्वार्थ प्रैम करणारी व्यक्ती म्हणजे आई असते.
आई....
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही
जागतिक मातृदिनानिमित्त सर्व मातांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏जगातल्या प्रत्येक आईला जागतिक मातृदिनाच्याहार्दिक शुभेच्छा...
