Lata Rathi

Inspirational

2  

Lata Rathi

Inspirational

ईमोजी-अलक

ईमोजी-अलक

2 mins
266


आपली जीवनशैली आपण किती व्यस्त करून ठेवलीय ना. असं वाटतंय की येणाऱ्या काळात आपण सर्व मुके होऊन जाऊ, आणि सर्व कारभार ईमोजीचा वापर करूनच करू.... जसे 👍🙏👆😊


खरंय ना. दोन शब्द लिहायला थोडासुद्धा वेळ नाही आपल्याजवळ... "संवाद" काय असतो हे येणाऱ्या पिढीला काळणारसुद्धा नाही... हो ना. शाॅर्टकट लाइफस्टाईल आणखी काय? पूर्वीच्या काळात जे शिकले नव्हते,त्यांचा पूर्ण कारभार, म्हणजे महत्वाच्या कागदपत्रांवर अंगठा दिला की काम फत्ते... कारण सही करताच येत नव्हती. कागदावर के लिहिलंय हेसुद्धा कळत नव्हतं...


कालमानानुसार आपल्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाला, देश साक्षर होऊ लागला, नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झाले. त्यातलाच एक म्हणजे आपल्या रोजच्या वापरातला आपला लाडका भ्रमणध्वनी...  मला कळतंय तो जर थोडा वेळ जरी दिसला नाही ना तर आपण कासावीस होतो. सकाळी उठल्या उठल्या  "कराग्रे वसते लक्ष्मी" म्हणायच्या आधी डोळे चोळत चोळतच आपण सर्वच हं, (मी सुद्धा अपवाद नाही) मोबाइलला हाती घेतो...


काल सहजच मेसेजेसचे रिप्लाय बघत होते, तर त्यात ईमोजीचाच वापर जास्त दिसला... आणि मला काहीतरी लिहायला सहज एक विषय मिळाला... आधी ज्यांना लिहिता-वाचता येत नव्हते, आपण त्यांना अंगठाबहाद्दर म्हणायचो... पण आज आपण नाही का आपले सर्व व्यवहार आपल्या लाडक्या भ्रमणध्वनीवर अंगठ्याच्या साहाय्यानेच करतो... चला काही हरकत नाही, पण रिप्लायसुद्धा 🙏👌🙌😊💃😦❤️ असो...


काही का असेना मनात एक खंत, हुरहूर निर्माण झाली, संवाद हा असायलाच हवा... त्यात दुरावा, शॉर्टकट नको, बोलणं कसं ना भरभरून असावं... कमीतकमी एकमेकांची सुख-दुःख तरी कळतील... मला सहज सुचलं, म्हणून लिहिलं... मी काही मोठी लेखिका नाहीये... पण छोट्या छोट्या गोष्टीतून सहज सुचलंच तर लिहायचा छोटासा प्रयत्न... तर माझ्या मित्र-मैत्रिणींनो करूयात ना संवाद वाढवायचा प्रयत्न.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational