The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Mina Shelke

Inspirational

2.8  

Mina Shelke

Inspirational

हळदीकुंकू आणि आधुनिक विचार

हळदीकुंकू आणि आधुनिक विचार

4 mins
15.7K


नकोच फरक ,गरीब,श्रीमंत

सधवा ,की विधवा...

स्त्रीकर्तव्याचे ठेवून, भान

एक नवा विचार जागवा ...

संक्रांत नववर्षाचा पहिलाच सण .सूर्याचे उत्तरायण सुरू होते .... आपण तो पारंपारिक पध्दतीने साजरा करतो. आदल्या दिवशी भोगी...या दिवशी या ऋतूत येणाऱ्या सर्व फळमाज्या , पालेभाज्या, रानभाज्या एकत्र करून भाजी करायची ,तिळ लाऊन बाजरीची भाकरी ...असा सुंदर बेत असतो ... यामागील कारणं आपल्या शरीराला सर्व पोषक घटक मिळावी व येणाऱ्या ऋतू बदलासाठी तनमन सुसज्ज व्हावे हा ऊद्देश....हे सर्व विविध पदार्थ एकत्र सामावून जर सुदंर व्यजंन तयार होते . आपण ते आवडीने , आनंदाने सेवन करतो ....

तर माणसामाणसामधे वेगळेपणा का बर...

आपल्यामध्ये ही एकत्रीपणा आला तर आनंदाची ऊधळण होईल की नाही... आणी आपुलकीचा स्वादही वाढीस लागेल. बरोबर ना ...

दुसऱ्या दिवशी संक्रांत ... या दिवशी शिवारी गर्भी आलेले धान्यांची कोवळी कोवळी बीजे मातीतचं जन्माला आलेली .... मातीच्याचं सुगडात ( गाडगे) पुजन करण्याची प्रथा ... ही पूजा करण्यासाठी बाई सवाष्णचं हवी .... हे कुठे लिहीलेले .? असेलही तरी सवाष्णचं हवी हा आग्रह कशासाठी.?

या दिवसापासून रथसप्तमी पर्यंत हळदीकुंकू हा कार्यक्रम सुरू होतो .त्यासाठी सुहासिनी एकमेकींना आमंत्रित करतात ... पण ती विधवा असेल तर.... तिला टाळले जाते....का? तिचा नवरा मरण पावला म्हणून ! मला हे पटत नाही ......कारण जर विधवा झालेल्या बाईच्या हातचे बनवलेले जेवण, शेतात केलेल्या कष्टानी पिकवलेली धान्य पूजेसाठी चालते , बाकी कुठल्याही कामासाठी ती चालते ......तेव्हा ती सधवा की विधवा हा प्रश्न उपस्थित होतो का ? फक्त हळदीकुंकू , मंगलकार्य पूजापाठ या कार्यात का नाकारली जाते ......नव-यामाघारी समर्थपणे कुटुंब चालवणारी स्रीला तुम्ही माणूस म्हणून कसे नाकारू शकता .? फक्त कपाळवरचे कुंकू एवढीचं तिची ओळख असते का ? अन नवरा मरण पावलेला म्हणून तीला निषिध्द मानायचे का ? सर्व क्षेत्रात स्वतःला सिध्द करूनही .!..... बायको वारली अन नवरा मागे राहीला तर त्या पुरुषाला आपण काय नाव द्यायचे .... त्याच्याबरोबर हा निकष लावला जातो का ? नाही न ... मग बाईला का लावायचा बरं...सर्व कार्यात त्याला तर सामावून घेतले जाते... मग स्रीसाठी हा भेदभाव कशासाठी हो .... हा भेदभाव एका स्रीनेचं एका स्री साठी करावा किती खेदजनक गोष्ट ना...

हळदीकुंकू निमित्त फक्त .हळदीकुंकू हा विचार संकुचित नको तर प्रगल्भ करुया ...

त्यामागील दृष्टीकोन लक्षात घ्यायला हवा ... भेटीगाठीतून स्नेह वृद्धिंगत व्हावा ,जिव्हाळा निर्माण व्हावा हा हेतू... मग तिथे स्री विधवा की सधवा हा विचार का असावा... बदलूया ही रुढी ... बोलवा सन्मानाने त्या स्रीलाही अन द्या हळदीकुंकू अन वाण...खंबीरपणे रहा ऊभे तिच्या पाठीशी , अन जाणीव करून द्या , फक्त नवरा नाही म्हणून तुझे बाईपण , माणूसपण नाही संपलेलं .... तु ही आमच्यातलीचं एक आहेस ... हळदीकुंकू सोहळ्यात करून घ्या सामिल .... नसेल होत तर तिची मानसिकता बदला ... नव्या विचारांच्या प्रवाहात आणा ... कुठलीही भिती , दहशत असेल तिच्या मनावर तर काढून टाका ... उदा. देऊन ... काही अमंगल होत नाही .... हे पटवून द्या ...विधवा झाली म्हणजे काही अपराधी होत नसते.... जन्ममरण कधी कुणाला कळले ,..टळले का....

आणि कुणी कुणाच्या मरणाचे कारण ही होऊ शकत नाही .सारे विधिलिखित ....

विधवांनीही हा बदल खंबीरपणे स्विकारायला हवा आणि आपले अस्तित्व दाखवून द्यायला हवे निसंकोचपणे....... पोकळ रुढी बदलायला हव्यात , माणूस म्हणून स्वतःला जपायला हवे .स्वतः हाकडे बघायला हवे .

सकारात्मक बदल हा दोन्ही बाजूंनी झाला तरचं

समाजासाठी एक चांगला विचार ....

दिशादर्शक व प्रेरणादायी ठरतो ...व सर्वाच्या भल्यासाठी आहे ... हे समाजमान्य होतो.... कायमस्वरूपी.

अजून एक उद्देश काहीतरी वस्तुरुपात दान करायचे ...तर द्या ना गरीब महिलांना गरजेची एखादी वस्तू , आपल्याकडे घरकामाला येणाऱ्या बायका भरा तिची साडीचोळीने ओटी किंवा करा तिच्या मुलासाठी शालेय आर्थिक वा वस्तुरुपात दान .... वर्षभर आपल्यासाठी ती मेहनत करत असतेचं ना... जरी पगार देत असलो तरी तिच्या कष्ट फक्त मोलातचं तोलायचे का? ... तिचा प्रामाणिक पणाही महत्त्वाचा नाही का . यापुढे हायफाय मैत्रिणी बोलवून भारी किमती वस्तू देण्याऐवजी कामवालीलाचं मदत करूया. करा संकल्प....बघा किती आशिर्वाद अन तुमचा मान वाढतो ते ....

दारावर येणारी भाजीवाली , कचरा वेचणारी महिला , घरकाम करणारी महिला अशा अनेक स्रीया ज्यांना खरचं कशाची तरी गरज आहे .... बोलवा त्यांना अन करा मदत .... घाला पोटभर जेवण , लावा हळदीकुंकू बघा कीती आनंदी होतील .त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुमचाही चेहरा नक्कीच खुलून येईल. एक आगळेच समाधान लाभेल मनाला ...करुन तर पहा एकदा बदल .... चालवाल वसा जन्मभर...

तिरस्करणीय कटाक्ष ही आपोआप सौम्य होतील

पटेल त्यांनाही एक दिवस तुम्ही योग्य परंपरा सुरू केली ते. अन तुमच्यामुळे प्रेरित होऊन बदलतील.

आणि शुभ अशुभाच्या बेड्या हळूहळू गळून जातील .सर्व भगिनींना एक मुक्त ,स्वछंदी अंगण मिळेल. निरभ्र होईल आकाश रुढीपंरपराच्या जोखडात .... झाकाळलेले मन घेईल पुन्हा नवी भरारी सर्वासोबत...

हळदीकुंकवाच्या निमित्ताने अनेक उपयुक्त व परिवर्तन करू शकतो आपण .... निराधार स्रीया , मुले , वृद्धाश्रम ,गरीब ,गरजूंना मदत केली तर नक्कीच सत्पात्री दान लागेल .

नाही मनभर तर क्षणभर आनंदाचे भागिदार होऊया ....

तर चला बदलूया विचार .... करू सा-या मिळून आचार.....

विधवा असो की सधवा असो परित्यक्ता असो गरीब , असो श्रीमंत भेदभाव मुळीच नाही ...

सर्व समान मनी रुजवू भाव .....सत्पात्री लाऊ दान ... हाच वसा घेऊ वाण ...देऊ वाण....


Rate this content
Log in

More marathi story from Mina Shelke

Similar marathi story from Inspirational