हितगूज
हितगूज


एक आठवडा झाला ती आयसीयू वॉर्डमध्ये बेडवर निपचित पडून होती. डाॅक्टर रोज कसल्या कसल्या टेस्ट घेत होते तिच्या. अंगाला भारंभार सुया टोचल्या जात होत्या. कधी चांगला तर कधी काहीच रिस्पॉन्स ती देत नव्हती. कोणाला काही कळायला मार्ग नव्हता. डाॅक्टर जे सांगतील ते करत होते सगळे.
आज निलला खूप काही बोलायचं होतं किमयाशी पण ती ना त्याच्याकडे पाहात होती ना काही प्रतिक्रिया देत होती. त्याला किमयाकडे पाहून भरून आलं आणि तो तिथेे खाटेेेजवळ बसून ओक्साबोक्सी रडू लागला.
तिच्याकडे पाहताना त्याला सगळं आठवू लागले, मुलं लहानाची मोठी झाली. सुख-दुःख सोबतीने सोसली अन् आता कुठं एकमेकांना वेळ द्यायची सोबत करायची गरज असताना अचानक दुखणं सामोरे आलं. त्याचेे डोळे डबडबलेले जणू काही तिच्याशी हितगूजच करत होते.