Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Drama Others


5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Drama Others


ही धावपळ कशासाठी?

ही धावपळ कशासाठी?

2 mins 608 2 mins 608

लेकाचा पहिलाच वाढदिवस होता. तरीपण अॉफिसमध्ये यावं लागलं. माहित नाही आज संध्याकाळी घरी वेळेवर पोहचेल की नाही... सुट्टीच घेतली होती, पण कॅन्सल केली. मन्थ एंडची कामे झाली नाही ना... मी मागचे दोन आठवडे फॉलोअप करत होते, 'बाद मे करेंगे', 'बाद मे करेंगे' करत होते... व आज शेवटचा दिवस आहे तर अती महत्वाचं, क्रिटिकल, क्रिटिकल करत नुसते ओरडत आहे.


मी या गृपमध्ये नवीन आहे, त्यामुळे या सिनीअर्सवर अवलंबून राहावं लागतंय.. म्हटले यांच्याकडून शिकायला मिळेल चांगलं म्हणून खूप खुश होते आधी..

पण काय.. काही कळत नाही यांचं वागणं..


हा गृप जॉईन व्हायच्या आधी मी सांगितले होते यांना, माझे छोटे बाळ आहे म्हणून, मला वाटले समजुन घेतील.. वेळेवर घरी जायला मिळेल म्हणून.. पण हे तर उलटच घडत आहे सारे... 


उलट म्हणतात, करीअर करण्यापेक्षा घरी बाळाकडे लक्ष दे.. एक दो साल काम नही किया तो कुछ बिघडता नही, करीअर तो बाद मे भी कर सकते हो..


यांना काय जातं हे सांगायला.. वेळेवर अॉफिसला येऊन आपले काम करायचे सोडून.. बाद मे करेंगे करत संध्याकाळी घरी जायच्या वेळी नेहमी काम सांगता, हे झालं का ते झालं का करत सतराशेसाठ प्रश्न विचारत बसता..


नेहमी कानाला हेडफोन लाऊन गाणी ऐकत असता, व्हिडीओ बघत बसता.. नाही तर.. शेअरच्या गप्पा मारत बसता...


काम नीट सांगत पण नाही, फक्त चुका काढत असता, सुधारणा करायची कुठल्या कामात तर चालत नाही.. छोट्या कामासाठी दहा-पंधरा मेल पाठवा..


सोड हे सगळ आॅफिसचं.. आता आजचा दिवस महत्वाचा आहे. लेकासोबत त्याचा पहिला वाढदिवस साजरा करायचा, असे मनाला बजावत राहीले मी स्वःतालाच..


मलाही समजत नाही एवढी धावपळ कशासाठी करतेय मी?


आज मी तीन वाजताच निघते, नाहीतर रात्रीचे बाराही वाजवतील इथे... 


मेलमध्येच कामाचं स्टेटस अपडेट करते आणि निघते..

बरं झाले सिगरेट ओढायला बाहेर गेले..

आॅफिसच्या मागच्या गेटने पटकन बाहेर पडते व फोन फ्लाईट मोडवर टाकते..

लवकर घरी पोहचते व लेकाचा पहिला वाढदिवस घरीच साजरा करते..


मग आहेच रोजची ही धावपळ..


गुड.. स्वत:वरच खुश होत रिक्शा पकडली व घरी पोहचले.. घरी सासू, सासरे होते पण तेही काय करणार शेवटी पैसातर लागणारच न जगायला.. आज सगळ्या चिंता बाजुला ठेवून मस्त लेकाबरोबर वाढदिवस साजरा केला घरच्या घरीच..


नाहीतरी नवरोबा अॉफिस कामानिमित्त देशाबाहेर गेलेला, माझं जग मलाच सांभाळायचं आहे.. मुलाचं भविष्य घडवायचं तर मलाच पुढाकार घेऊन बदलावं लागेल, माझं मलाच स्वत:चं हे छोटं जग..


मला वाटतंय ही धावपळ माझ्यासारख्या असंख्य मुलींची असेल.. काहींची तर माझ्याहीपेक्षा परीस्थिती वाईट असेल.. नाही का?


Rate this content
Log in

More marathi story from अंजली (Anjali) बुटले (Butley)

Similar marathi story from Drama