"हे मी कधीच नाही समजू शकले"
"हे मी कधीच नाही समजू शकले"
घरातला मोठा मुलगा म्हणून आशिषने आपल्या आई-वडिलांचे रक्षण करण्याबरोबरच मोठ्या बहिणीचे लग्नसुद्धा पार पाड़ून, त्याच बरोबर लहान भावंडांचे शिक्षण पूर्ण करूनच स्वतः ज्योतीसह लग्न केले आणि ते ही आई-वडिलांच्या आवड़ी प्रमाणेच.
ज्योती नोकरी करत होती हो, पण संस्कारी असल्यामुळे घर आणि नोकरीची जबाबदारी आशिषबरोबरच पूर्णपणे निभावत असे. ह्यांचा संसार सुरळीतच चालला होता, काही दिवसांनी फुलांसारखी पोरंसुद्धा झाली आणि भावंडांची लग्नं होऊन त्यांनाही पोरं-बाळं झाली.
आयुष्याचा हा काळ अगदी सुखा-समाधानाने नांदणारा होता पण काय माहिती आशिषच्या आईने वड़ील वारल्यावर मुलांविरूद्ध पैशांसाठी कोर्ट-केस केली.
"हे मी कधीच नाही समजू शकले," असे मला सांगताना ज्योतीचे मन भरून आले.