Jyoti gosavi

Inspirational

4.2  

Jyoti gosavi

Inspirational

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने

2 mins
501


|| श्री गुरुदेव प्रसन्न ||


|| श्री रघुनाथ स्वामी-आनंदमूर्ति प्रसन्न ||


आमचे घराणे हे गुरु घराणे आहे असे म्हणतात की ज्यांचे गुरु घराणे असते त्यांनी दुसरा गुरु करायचा नसतो. 

त्यामुळे "आनंद मूर्ती "आणि त्यांचे गुरु" रघुनाथ स्वामी" हे आमचे गुरु. 

सांगली जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र ब्रम्हनाळ येथे त्यांच्या समाधी आहेत. आणि आमचा गोसावी घराण्याचा मठ देखील आहे. 

"श्री आनंदमूर्ती रघुनाथ स्वामी "यांची महती सांगणारा "श्री आनंदचरीतामृत नावाचा ग्रंथ देखील आहे. 

तेथे रामनवमी गुरुपौर्णिमा महाशिवरात्री या तिथींना मोठा उत्सव होतो. 

जेव्हा आनंद मूर्तींचे गुरु रघुनाथ स्वामी यांचे देहावसान झाले, तेव्हा "ब्रम्हनाळ" या गावी नदीकिनारी जागा विकत घेऊन तेथे दहन विधी केला. आणि समाधी वृंदावन बांधले. 

त्या वृंदावना पुढे आनंदमूर्ती आणि संत मंडळी कीर्तन करीत असत तेव्हा, समाधीचा डोल होत असे. म्हणजे भजनाच्या तालावर समाधी डोलायची. 

एकदा आदिलशाहीच्या  राजवटीत कोणत्यातरी मुस्लिम सरदाराने त्या डोलाची प्रचिती पाहण्यासाठी समाधी वरती भोपळे ठेवले आणि कीर्तन करताना ते भोपळे खाली पडले तेव्हा त्याचा विश्वास बसला आणि तो गुरूंना शरण गेला आणि आजूबाजूची काही शेती इनाम दिली पुढे आनंदमूर्तींचे देहावसान झाल्यानंतर गुरूंच्या समोरच शिष्याचे समाधी वृंदावन बांधलेले आहे. पूर्वी जेव्हा तेथे भजन कीर्तन होत असे तेव्हा गुरु शिष्य दोघांच्याही समाध्या डोल घेत असत पण त्यासाठी तेवढी श्रद्धा आणि भक्ती देखील पाहिजे आजही कृष्णाकाठी अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये तेथे समाधी दर्शन करण्यासाठी गेले असता मनाला अतिशय शांतता मिळते आणि खूप छान वाटते शिवाय तो परिसर बघायला देखील छान वाटतो. 

 

 श्री आनंदमूर्ति हे श्री रामदास स्वामी यांच्या 'रामदास पंचायतन' मधील एक. हे पंचायतन म्हणजे...

१ रामदास स्वामी चाफळकर

२ रंगनाथ स्वामी निगडीकर

३ जयरामस्वामी वडगावकर

४ आनंदमूर्ति ब्रह्मनाळकर

५ केशवस्वामी भागानगरकर

 या सर्व मंडळींचे उत्सवा निमित्त एकमेकांकडे जाणे-येणे होते. श्री रघुनाथ स्वामी हे श्री आनंदमूर्ति यांचे गुरू. श्री आनंद मूर्ती यांनी आयुष्य भर श्रीरामाची उपासना केली व गुरू ची सेवा केली. "तुम्हाला पाहताच सर्वांना 'आनंद' होतो म्हणून तुमचे नाव 'आनंदमूर्ति' " असे श्री. रघुनाथ स्वामी यांनी म्हटले आहे.


आजच्या 'गुरू पौर्णिमे' निमीत्त या गुरू-शिष्यांची ही आठवण.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational