गुरु ज्ञानाचा मोठा सागर
गुरु ज्ञानाचा मोठा सागर
विद्यार्थ्यांना घडवण्या साठी ...,
गुरु शिकवतात धडे..........
जसे कुंभार माती पासून....,
बनवतात सुंदर घडे ......2
काळा फळा पांढरा खडू
लिहितात त्यावर छान ..........
गुरू साठी विद्यार्ध्यांच्या
मनात असतो मान...........2
लहान असता शिकवत होते,
अक्षर कसे गिरवावे........
मोठे झाल्यावर शिकवतात,
अपयशाला कसे हरवावे..........2
खूप नशीबवान असतात ते ज्यांना,
वेळेवर गुरु घावतात.....
गुरूच असतात जे आपल्याला
आपली चुक सुधरायला लावतात........2
आयुष्य कसे जगावे हे
गुरूच शिकवत असतात........
गुरु ला इज्जत न देणारे
कधीच यशस्वी नसतात............2
गुरूच आपले इश्वर
गुरु ज्ञानाचे मोठे सागर.......
त्यांच्या ज्ञाना पुढे विद्यार्थी,
पाण्याचा एक घागर.........
