Preeti Sawant

Tragedy Others

3  

Preeti Sawant

Tragedy Others

गुंतता हृदय हे!! (भाग ९)

गुंतता हृदय हे!! (भाग ९)

3 mins
378


अनिशने आर्याबरोबर अमेयची ओळख करून देत असताना तो तिला म्हणाला, 'आर्या हा आमच्या रेडिओ स्टेशनचा सुपरस्टार "RJ अमेय" म्हणजेच समीर पटवर्धन..

तुला आश्चर्य वाटलं असेल ना! पण हे खरं आहे की, सगळी मुंबई ह्याला RJ अमेय च्या नावाने ओळखते..पण ह्याचं खरं नाव समीर..'

तो पुढे बोलू लागला, 'समीर, meet my wife आर्या जोशी आणि बरं का, मला ही हे आताच कळलं की ती पण तुझी फॅन आहे..but buddy ur late, कारण तुझ्या ह्या सुंदर फॅनला मी आधीच पटवलं आहे" आणि त्याने समीरच्या हातावर जोरात टाळी दिली व तो आणि समीर दोघेही हसू लागले..


आर्याला काय आणि कसं रिऍक्ट व्हावं हेच कळत नव्हतं.. तिने ही दोघांनकडे बघून smile केली आणि समीरला हात मिळविला..स्निग्धा ही समीरला पाहून खूप खुश झाली. पण जेव्हा तिला कळलं की, समीर हाच RJ अमेय आहे..तेव्हा ती थोडी दुःखी झाली. 


शेवटी अनपेक्षितपणे का होईना पण समीर हाच आर्याचं पहिलं प्रेम होतं पण ते अमेय ह्या RJ च्या रुपात.

समीरने त्याला महत्वाचं काम आहे हे सांगून त्या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. कारण अजून काहीवेळ खोटं हसू चेहऱ्यावर आणणं त्याला कठीण जात होतं. त्याने एकवार आर्याकडे पाहिलं आणि मनातल्या मनात तिला तिच्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. आर्यालाही कळतनकळत त्याच्या मनातल्या भावना समजल्या. तिने ही त्याला नजरेने निरोप दिला..


आज आभाळ खूपच दाटून आलं होतं..पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि त्या पाण्यामध्ये समीरचे अश्रूही मिसळून गेले. तो मनातल्या मनात देवाला हेच सांगत होता..


अगर मिले खुदा तो

      पूछूंगा खुदाया

      जिस्म मुझे देके मिट्टी का

      शीशे सा दिल क्यों बनाया


साखरपुडा खूप छान पार पडला. पण पूर्ण साखरपुड्यात RJ अमेयचाच बोलबाला होता. दिवसभराच्या लगबगीने सगळे थकून गेलेले. म्हणून सर्व झोपी गेले. पण आर्याला मात्र झोप येत नव्हती.

ती आज घडलेला प्रसंग सारखा आठवत होती. ती मनात सारखी हाच विचार करत होती, "RJ अमेय आणि तो पण समीर. विश्वासच होत नाहीये. ज्याच्या आवाजाची मी इतकी मोठी फॅन होते. तो सतत माझ्या डोळ्यासमोर होता आणि मला हे कळलच नाही. समीरने मला प्रपोज सुद्धा केलं होतं. पण तो समीर होता. आणि माझं प्रेम तर अनिशवर होतं, मग मी समीरला कशी हो म्हटली असती. पण जर मला आधी कळलं असतं की, समीरचं RJ अमेय आहे, मग काय झालं असतं. काय चाललय काही कळत नाहीये. पण खरं हेच आहे की, माझं अनिशवर खूप प्रेम आहे."


इतक्यात अनिशचा फोन येतो. तशी आर्या पटकन भानावर येते. अनिशची बोलल्यावर आर्याचा मूड फ्रेश होतो. ती स्वतःशीच पुटपुटते, "तसे पण समीर हा माझा खूप चांगला मित्र आहे, तो कधीच माझी निवड नव्हता". असे बोलूंती झोपी जाते.


दुसऱ्या दिवशी सकाळी,

एव्हाना सगळ्या ऑफिसमध्ये ही बातमी पसरते की, समीर हाच RJ अमेय आहे म्हणून. शेखरला ही आता कळून चुकते की, समीर पुन्हा ऑफिसमध्ये येणार नाही. म्हणून तो सगळ्या ऑफिस स्टाफला समीरच्या जॉब सोडण्याबद्दल सांगतो आणि लवकरच कोणीतरी नवीन व्यक्ती त्याच्या जागी नियुक्त केली जाईल हे ही सांगतो. सगळ्यांचे आनंदी चेहरे ही बातमी ऐकल्यावर पडतात. स्निग्धाला ही फार दुःख होते. ती लगेच आर्याला फोन करून सर्व काही सांगते. आर्या सुद्धा हे सगळे एकूण चकित होते. ती समीरला फोन लावण्याचा खूप प्रयत्न करते पण त्याचा फोन स्विच ऑफ येत असतो. राहून राहून ती स्वतःलाच ह्या सगळ्याला कारणीभूत मानत असते. पण ती हे कोणाला सांगूही शकत नसते. 


इथे समीर एक नव्या शहरात एक नवीन ओळख बनवायला निघतो. आता त्याला कोणाला काही सांगायची गरज नसते की लपवायची पण. त्याला अमेयला मागे टाकून समीर म्हणून जगायचे असते. तो ट्रेनमध्ये चढतो..पण अजूनही त्याच्या डोळ्यासमोर फक्त आर्याचाच चेहरा दिसत असतो. अचानक कुठेतरी गाणं वाजत असतं..


तुझको मैं रख लूँ वहाँ

     जहाँ पे कहीं है मेरा यकीं

     मैं जो तेरा ना हुआ

     किसी का नही..किसी का नहीं

     ले जायें जाने कहाँ हवाएँ, हवाएँ

क्रमश:


(ह्या कथेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व वाचकांचे आभार)


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy