गुंतता हृदय हे!! (भाग ७)
गुंतता हृदय हे!! (भाग ७)


आर्याला समीरसाठी खूपच वाईट वाटत होते..पण ती काहीही करु शकत नव्हती..
इतक्यात तिचा फोन वाजला..
पण पर्समधून बाहेर काढेपर्यंत तो कट झाला..
तिने फोनच्या स्क्रीनवर चेक केले तर अनिश चे ८ मिस् कॉल्स होते..
तिने लगेच अनिशला फोन केला..
अनिश ने फोन उचलला आणि तो ती काही बोलायच्या आत तिला म्हणाला, "आर्या अग कुठे आहेस तू? तू ठीक आहेस ना? मी किती कॉल केले तुला? एकतर पाऊस पण भरपूर आहे..त्यामध्ये तू फोन पण उचलत नव्हतीस.. Thank God तू फोन उचललास..बरं ते सर्व जाऊ देत, तू सरळ घरी जा आता..आपण उद्या भेटू.."
आर्या त्याचे बोलणे मधेच तोडत म्हणाली, "अरे हो..हो.. श्वास तरी घे बोलताना..मी एकदम ठीक आहे..माझ्या ऑफिसमधल्या एका फ्रेंडने मला स्टेशनला ड्रॉप केले..मी पोहोचेनच घरी..तू कुठे आहेस?"
"मी घरीच आहे, माझे टेन्शन सोड..तू पहिले घरी पोहचल्यावर मला फोन कर ओके..चल बाय..लव्ह यु" समीर म्हणाला..
"लव्ह यु टू" आर्या उत्तरली..
काही वेळातच आर्या घरी पोहोचली..
नेहमीप्रमाणे तिने घराची डोअरबेल वाजवली..आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला कारण दरवाजा चक्क अनिशने उघडला होता..
त्याला पाहून ती खूपच खुश झाली..
आत जाऊन बघते तर अनिशचे आई बाबा सुद्धा आले होते व ते आर्याच्या आई बाबांबरोबर गप्पा मारत चहा पित होते..आर्याच्या आईने भजी पण केली होती..त्याचाही सगळे आस्वाद घेत होते..
आर्याला काहीच कळत नव्हते..नक्की काय चाललंय ते..
आर्याने खुणेने अनिशला विचारले पण तो काहीच बोलला नाही..तेवढयात सगळ्यांची नजर आर्यावर गेली..
आर्या बऱ्यापैकी भिजली होती..
ती सगळ्यांना बघून म्हणाली, "मी पटकन फ्रेश होऊन येते"
थोड्याच वेळात आर्या फ्रेश होऊन आली.
तेव्हा अनिशच्या आईने म्हणजेच गोडबोले काकूंनी तिला जवळ बोलाविले..आणि म्हणाल्या, "आर्या, बेटा मला पहिल्यांदा जेव्हा तू आमच्या घरी आलेलीस ना तेव्हाच आवडलेलीस माझ्या अनिशसाठी..पण मी हे कोणालाच सांगितले नव्हते..तुम्ही आजकालची मुलं आपापल्या पसंतीने लग्न करणारी..मला उगाच माझी आवड अनिशवर लादायची नव्हती..पण देवाने माझं ऐकले आणि आजच अनिशने तुमच्या दोघांबद्दल मला सांगितलं..मला माफ कर बेटा, मला अनिश बोललेला तू अजून घरी काहीच सांगितले नाही पण मला बाई राहावेच ना..म्हणून आजच आली तुला माझ्या अनिशसाठी मागणी घालायला.."
तेवढ्यात आर्याची आई पटकन म्हणाली, "आम्हाला पण तुमचे अचानक येणे थोड चमत्कारिकच वाटलं..पण कारण ऐकल्यावर आनंदच झाला..आम्हाला शोधूनही अनिशसारखा मुलगा आमच्या आर्यासाठी सापडला नसता."
आर्याने एकवार अनिशकडे बघितले आणि मंद हसली..
तेवढ्यात अनिशची आई म्हणाली, "अनिशच्या बाबांनी आणि मी असे ठरवले आहे की, लवकरात लवकर आपण या दोघांचा साखरपुडा उरकून घेऊयात..मला तर वाटतं पुढच्या आठवड्यातच करूयात..तुमचे काय म्हणणं आहे याबद्दल आर्याचे आई-बाबा"
आर्याच्या आई-बाबांना साखरपुडा खूपच लवकर वाटत होता, कारण एका आठवड्यात हॉल बघणे, आमंत्रणे पाठवणे कठीणच वाटत होतं..
पण आर्या आणि अनिशने या सगळ्याची जवाबदारी स्वतःवर घेतली आणि अनिशच्या ओळखीने सर्व व्यवस्था वेळेवर होईल असे अनिश म्हणाला. पण आर्या आणि अनिशची एकच अट होती की, लग्न त्यांना इतक्या लवकर करायचे नव्हते..अटलिस्ट त्यांना ६ महिन्याचा अवधी हवा होता..
यासाठी आर्या आणि अनिश या दोघांनाच्याही घरच्यांनी त्यांना संमती दिली..
मग काय घरातले वातावरण एकदम आनंदी झाले..
आर्या तर मनातल्या मनात अनिशकडे बघून हे शब्द गुणगुणत होती..
ब्यांड बाजा, वरात घोडा
घेउनि या नवरोजी
लगीन घटिका समीप आली
करा हो लगीन घाई
समीर खूप उशिराने घरी पोहोचला आणि काही न खाता त्याच्या खोलीत झोपी गेला..झोपला कसला जागाच होता पण आपले घरच्यांना दाखवण्यासाठी झोपण्याचं नाटक केलं होतं..
रात्रभर तो आर्याच्या आठवणीत रडत होता..
त्याला माहीत होतं की, ह्यात त्याची काहीच चूक नाही..
कारण जर आर्या त्याच्यावर प्रेमच करत नसेल तर तो तरी काय करेल..
त्याने मनाशीच विचार केला,"आता आर्याच्या समोर जाण्यात काहीच अर्थ नाही..मी जितका तिच्यापासून लांब राहीन तितकच खुश राहीन".
म्हणून त्याने ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि Resignation लेटर टाईप करुन त्याची printout काढली आणि ती envelope मध्ये भरून ठेवली व तो सकाळ होण्याची वाट पाहू लागला..
आर्याची रात्र खूपच मस्त होती आणि आता तर नातं सुद्धा officially झाल्यामुळे रात्रीचे फोन पण सुरू झाले होते..
आर्या आणि अनिशला विश्वासच होत नव्हता की, काही दिवसात त्यांचा साखरपुडा आहे म्हणून..
(दुसऱ्या दिवशी सकाळी)
"गुड मॉर्निंग, मुंबई"
मी तुमचा सर्वांचा आवडता RJ अमेय.
तुमच्या सर्वांचे स्वागत आहे "गुंतता हृदय हे" च्या ब्रँड न्यू एपिसोड मध्ये..
सो फ्रेंड्स, मंगेश पाडगांवकरांनी म्हटलेच आहे की,
"प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !"
मित्रांनो हे खरच आहे, काहींना ते मिळत तर काहींना नाही मिळत पण तरीही कुणी कधी प्रेम करन सोडत का?
पण हे पण तितकच खरं आहे की, आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीची जर आपल्याला आयुष्यभर साथ मिळाली तर...........(थोडावेळ थांबून)
तर आयुष्य किती happening होईल..फुल्ल ऑन रोमँटिक..आणि मग हे गाणं नक्कीच गुणगुणावसं वाटेल...
दृष्ट लागण्याजोगे सारे,
गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की
स्वर्ग त्यापुढे फिका पडे!
"How romantic!! काय आवाज आहे यार ह्या RJ अमेयचा, कसा असेल ना तो दिसायला? अनिशला माहीत असेल, पण जाऊ देत उगाच त्याला गैरसमज झाला तर मी का इतकी चौकशी करतेय अमेयची म्हणून..नको रे बाबा मला कसली रिस्क नाही घ्यायची", आर्या म्हणाली.
इतक्यात तिचा फोन वाजला..
अर्थात, तो अनिशचा होता..आर्याने फोन उचला आणि ती अनिश बरोबर बोलू लागली..आर्या अनिशबरोबर बोलत असताना तिला तिच्या फोनवर दुसरा कॉल येत होता..तिने चेक केले तर तो स्निग्धाचा होता..
मग काय, आर्याने अनिशला ऑफिसला निघताना कॉल करते म्हणून फोन ठेवला आणि स्निग्धाचा फोन उचलला..
"अगं, नालायक, कारटे कुठे होतीस इतके दिवस? किती मिस केले मी तुला? आज आठवण आली तुला माझी? बरं ते जाऊ देत येतेएस ना आज ऑफिसला?" आर्या म्हणाली.
"नाही ग. उद्यापासून जॉईन होईन ऑफिसला..पण आज येणार आहे..माझे मेडिकल document, HR ला द्यायला. लंच टाइमला येईन मग आपल्याला थोड्या गप्पा तरी मारता येतील" स्निग्धा उत्तरली.
"फाईन..तुला खूप काही सांगायचं आहे आणि एक surprize सुद्धा आहे तुला", आर्या म्हणाली.
"ए, त्या समीरला कोणी पटवल तर नाही ना? मी नव्हती इतके दिवस म्हणून बोलतेय? फोडून काढेन त्या सटवीला"
स्निग्धा म्हणाली..
आर्या थोडं थांबून मग म्हणाली, "अग बाई तू आधी ये तरी मग सांगते तुला"
काही वेळानंतर आर्या ऑफिसला पोहोचली..तिचं लक्ष रोजच्याप्रमाणे समीरच्या डेस्क वर गेलं..पण समीर अजून आला नव्हता..आर्याने थोडावेळ वाट पाहिली..तिला समीर बरोबर कॉफी प्यायची सवय जी लागली होती..अर्धा तास झाला तरी समीरचा पत्ताच नव्हता..मग आर्याने कॉफीचा विचार सोडूनच दिला..ती तिच्या कामाला लागली..
पण राहून राहून सारखं मनात वाटत होतं की, "समीर ठीक तर असेल ना? कालच्या प्रसंगामुळे कदाचित त्याला खूप जास्त hurt झालं असेल..पण मी काय करणार होती, माझं प्रेम तर अनिशवर आहे..hope समीर ह्यातून लवकरात लवकर बाहेर पडेल..पण ह्या सगळ्यामध्ये मी माझा एक चांगला मित्र गमावला"
आर्याचे डोळे भरून आले..
शेखरला सकाळीच समीरचा मेसेज आला की, तो ही नोकरी सोडतोय आणि त्याबद्दलचा ई-मेल त्याने HR टीम आणि शेखर दोघांनाही सेंड केला आहे..तसेच संध्याकाळपर्यंत त्याचे Resignation Letter सुद्धा ऑफिसमध्ये कुरिअरने पोहोचेल..
शेखरने मेसेज वाचताच समीरला कॉल केला पण समीरचा नंबर स्विच ऑफ येत होता....
त्याने ई-मेल चेक केला तर फॉर पर्सनल रीजन असे कारण लिहिले होते..समीर अस काही न सांगता एकाएकी नोकरी सोडेल असं शेखरला वाटल नव्हतं..
बरं हा पठ्या फोन पण बंद करून बसला होता..
मग काय, शेखरने समीरचे resignation, HR टीम ला सांगून होल्ड वर ठेवायला सांगितले..
कदाचित काही दिवसात त्याचा विचार बदलेल असे शेखरला वाटत होते..
तसेच त्याने HR टीमला ही बातमी कोणाला कळता कामा नये ही तंबी ही दिली..
शेखर विचार करू लागला की, समीरने इतक्या तडकाफडकी नोकरी सोडायचा निर्णय का घेतला असावा..काय कारण असेल? आर्या तर नाही ना??????
(क्रमश:)