Neelima Deshpande

Inspirational Children

2  

Neelima Deshpande

Inspirational Children

गट्टी गणिताशी!

गट्टी गणिताशी!

4 mins
123


"माधवी, मला ना माझ्या अथर्वच्या अभ्यासाची थोडी काळजी वाटतेय. आता तो दूसरीत आहे आणि आत्ताचेच गणित त्याला खूप अवघड वाटते आहे.अनेकदा त्याच्याकडून छोट्या छोट्या चुका होतात आणि त्याचा मूड जातो मग. वर्गात सतत सगळे हसतात त्याच्यावर.अशाने त्याची ह्या विषयातली कमी झालेली आवड व कमी झालेला आत्मविश्वास कधी आणि कसा परत येईल हे मला समजेनासे झाले आहे.गणित हा विषय पुन्हा एकदा त्याच्या आवडीचा कसा होईल ह्यासाठी मार्ग सुचव ना मला काही..."


नंदिनीच्या मुलाचेही नाव योगायोगाने अथर्वच होते.  


"तू तुझ्या अथर्वसाठी  तो लहान असताना काय प्रयत्न केले होते ज्यामुळे गणित हा नेहमीच त्याचा आवडता विषय तर राहिलाच पण ते त्याला सोपे देखील वाटले?" असा प्रश्न विचारल्यावर नंदिनीला धीर देत माधवीने मैत्रिणीशी संवाद साधला....


"काही दिवस वेळ काढून अथर्व सोबत बस. त्याची नेमकी अडचण काय आहे हे नीट समजून घे. खूपदा एखादा विषय कुणाच्याही आवडीचा होतो जेंव्हा त्या विषयाचा दैनंदिन जीवनात आपल्याला काय उपयोग आहे, कुठे आणि कसे ह्या विषयातले ज्ञान आपल्या कामी येईल हे समजले की ती गोष्ट शिकण्यातला रस वाढतो. त्यांनतर शिकताना मग कधी काही अवघड वाटले तरी आपण प्रयत्न करुन ते शिकतो कारण त्याचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे हे मनात बिंबवले गेलेले असते. मोठ्यांनाही शिकण्याकरतां एखाद्या गोष्टीचे महत्व पटवून द्यावे लागते तर मग ही तर लहान मुले आहेत.

ती वेगळी कशी असतील. त्यांना तर वारंवार समजवावे लागते. आपण जेंव्हा त्यांच्या सोबत असतो तेंव्हा सहज चालता बोलता अशा गोष्टी मुलांशी बोलल्या की त्यांचा शिकण्याचा हुरुप वाढतो.


या सोबतच नेहमी बोलताना शिकवलेल्या गोष्टींना आपण कुठे वापरतो याचे कधी नकळत तर कधी प्रत्यक्षात उदाहरण देत जा. त्यामूळे मग त्यांच्या अभ्यासातल्या गोष्टी शिकण्यासाठी नेहमी वहीपेन घेवून बसण्याची गरज पडत नाही. ते न घेताही मुलांची खेळणी, घरातल्या वस्तू, झाडे,पाने - फुले हे वापरून आपण त्यांना दृष्यरुपात अंकांची ओळख करुन नीट समजावू शकतो. जसे की बेरीज वजाबाकी करताना त्याच्या डोळ्यांना वजा केल्यावर वस्तूंचे कमी होणे आणि अंकाची बेरीज करताना वस्तूंचे वाढलले प्रमाण पाहून त्याला ह्या प्रक्रिया कशा होतात किंवा यात नेमके काय करायचे असते हे समजले की तो अंक गणिता सोबत शाब्दिक गणितेही सहजच सोडवेल.


एखादा अंक हा बाकी किती अनेक अंकाची वेगवेगळी संगत करून बनतो. त्याला बनवण्यासाठी किती अंक मित्र बनून एकत्र येतात हे त्याला समजावे यासाठी कागदावर लिहून आणि वस्तू वापरून शिकव. जसे...


1 हा अंक ....

1 0 = 1

0 1 = 1

ह्याप्रमाणे कसाही लिहिला तरी बनतो. हे जितके सोपे आहे तितकेच सोपे बाकी अंक आहेत आणि त्यांना बनवण्यात अनेक अंक मदत करतात जसे...


2 हा अंक ....

1 1 0 = 2

0 1 1 = 2

1 1=2

2 0=2

0 2=2

   

या पद्धतीने तू त्याला पुढच्या अंकासाठी कोणते इतर अंक लागतील/मदत करतील हे वि चारत आणि त्याला विचार करायला लावून एक ते दहा या अंकाचे सगळे मदत करणारे मित्र कोण आहेत ते शोधून लिहून दाखव. अधून मधून हे शिकवलेले पुन्हा विचारत जा...त्याचा खेळ म्हणून तूम्हा दोघात किंवा त्याच्या मित्रांसोबत तुम्ही हे करु शकता.


स्वयंपाक घरात काम करताना तू त्याच्याशी बोलत बोलत कामे करू शकली तर त्याला तू जो पदार्थ बनवत आहेस तो करताना वापरत असलेल्या गोष्टींचे प्रमाण सांगत जा. त्यातून नकळत पदार्थांची नावे, गुणधर्म, प्रमाण, रंग रुप, चव आणि त्यापासून काही योग्य प्रमाणात एकत्र करुन कसे बनवायचे हे त्यांच्या कानावर पडत जाते. आपल्याला काम करताना पाहून मुले अनेक गोष्टी शंका म्हणून विचारतात त्याची उत्तरं दिली की चौकस राहिल्याने त्यांच्या मेंदूला चालना मिळत जाते. 


भांडी लावताना किंवा डबे रचताना त्यांचा आकार, आकारमान यावर तू त्याला मदत करायला सांगू शकते किंवा स्वत: करताना ते बोलू शकते. यातून तो लहान- मोठे, उभे-आडवे, गोल-चौकोन असे कितीतरी आकार व आकारमानातील कंसेप्ट तो सहज हसत खेळत

शिकेल. 


कपड्यांच्या घड्या घालत असताना वर्गीकरण करणे हे तू त्याला कपडे रंगानुसार, घरातील कोणत्या व्यक्तीचे ते कपडे आहेत त्यानुसार तसेच त्यांच्या आकारमाना प्रमाणे लहान मोठे कपडे वेगळे करायला लावून गणितातील संकल्पना समजावून देत गप्पा मारत त्याला गणित शिकवू शकते. कपड्यांची घडी घालताना तीच मोठी वस्तू घडी घालताना कशी विभागली जाते व जितकी जास्त वेळा आपण तिची विभागणी करू तितकी ती कशी लहान होते हे प्रत्यक्ष पाहून समजले की गणितातील 'फ्रैक्शन' हा नंतर मोठ्या वर्गात शिकवली जाणारी गणितातील संकल्पनेची तू त्याची आधीच तयारी करुन ठेवलेली असेल.


त्याच्या मनाला उभारी देण्यासाठी तू त्याला त्याच्या 'अथर्व' ह्या नावाचा अर्थ व 'अथर्ववेद व अथर्वशीर्ष' ह्या गोष्टींशी सांगड घालून त्याचे महत्व काय आहे ते सांगून 'ते' नाव असलेला तो प्रयत्न करुन गणित शिकू शकतो व त्याला त्यात हमखास यश मिळेल हे समजव जेणेकरून त्याचा आत्मविश्वास परत वाढेल...."


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational