Amrapali Dhende

Children

4.0  

Amrapali Dhende

Children

गरीब परिस्थितीत वृद्धांचे मानसिक हाल

गरीब परिस्थितीत वृद्धांचे मानसिक हाल

4 mins
275


विमल आणि आदर्श नावाचे एक छान संस्कारी कुटुंब असतं. आई-वडील खूप माणुसकीचे असतात. आदर्शला त्यांनी खूप छान संस्कार दिलेले असतात. पण आदर्श पेक्षा खूपच गुणवान विमल असते. यांची परिस्थिती खूपच हलाखीची असते. विमल कुटुंबाला खूप हातभार लावी. आदर्शच्या प्रत्येक सुख आणि दुःखात ती साथ देई. ती रानात काम करी आदर्शचे आई-वडील देखील शेतातच काम करत. आदर्श एका किराणामालाच्या दुकानात काम करत असत. काही दिवसाने विमल गरोदर राहते . तिला दोन जुळे मुलेच होतात . घरच्यांना खूप खूप आनंद होतो. सगळीकडे आनंदाने पेढे वाटले जातात. सगळे खूपच खुश असतात. आदर्श ची आई आपली सून विमलची खूप खूप काळजी घेते . काही दिवसानंतर विमल पुन्हा शेतात काम करायला लागली असे त्यांचे आनंदात दिवस जातात. विमल च्या घरी कोणी आले तरी चहा पिल्याशिवाय जात नसे. ती पाहुण्यांना तर जेवल्याशिवाय पाठवतच नसे. सगळे पाहुणे तिचे तोंड भरून कौतुक करायचे ती आजारी जरी पडली तरी तिचे आजारपण कोणाला न दाखवता ती घरातील सर्व काम करायची नित्यनेमाने पहाटे उठून आंघोळ करून प्रथम देवाची पूजा करायची नंतर चहा करून सासू-सासरे नवरा, मुले यांना ती देई आणि नंतरच स्वतःला शेवटी घेई .


काही वर्षाने तिला एक मुलगी झाली खूप सुंदर मुलगी होती ती तिचे नाव प्रिया ठेवले अगदी ती विमल सारखीच सुंदर होती कालांतराने दोन्ही मुले मोठे होतात एक डॉक्टर होतो आणि दुसरा इंजिनियर होतो दोन्ही मुले स्वतःच्या पायावर उभे राहतात आई-वडिलांना खूप खूप आनंद होतो ओळखीच्या व्यक्तींना विमल म्हणत असे माझी मुले खूप हुशार आहेत एक डॉक्टर आहे तर एक इंजिनियर आहे दुसरी माणसे म्हणत अहो हे तर तुमच्या कष्टाचे फळ आहे तुमचं खूप चांगलं होईल आत्ता दोन्ही मुलांचे लग्न करा म्हणजे तुम्हाला सुख मिळेल तुम्ही आत्तापर्यंत खूप खूप कष्ट केले आहेत. विमल च्या मनात याच गोष्टींचा विचार घोळत राहिला आत्ता मुलांचं लग्न करायचं हे विमल ने ठरवले विमलने आपल्या सासू सासरे आणि नवऱ्याला सांगते की मुलांच्या पण लग्न करू छान मुली पाहू शिकलेल्या नसतील तरी चालेल पण संस्कारी पाहिजेत आदर्श मानतो हो अगदी तुझं बरोबर आहे मुलांना ही तसं सांगतात दोन छान मुली पाहतात दहावी बारावी असं त्यांचं शिक्षण झालेलं असतं त्यांच्याबरोबर यांची लग्न होतात


लग्न झाल्यानंतर डॉक्टर मुलगा रवी बायकोला घेऊन पुण्याला जातो आणि दुसरा मुलगा इंजिनीयर सुशांत आई-वडिलांना संभाळतो छोट्या सुनेचे नाव असतं श्यामला आणि मोठ्या सुनेचे नाव संगीता असतं श्यामला ही रवी ची बायको असते तर संगीता ही सुशांत ची बायको असते श्यामला काही दिवस सगळ्यांची छान वागते मग विमल च्या मुलीचे लग्न साजन या मुलाशी होतं ती सासरी अगदी आनंदाने राहत असत प्रिया सासरी गेल्यानंतर विमला खूप काम करावं लागत डॉक्टर रवी हा पैसे पण आई-वडिलांना देत नसत इंजिनीयर मुलगा सुशांत हा पण घर खर्च भागवत नसत तो त्याच्या बायकोवर च पैसे खर्च करत विमल आणि आदर्श या परिस्थितीमुळे खूपच दुःखात जगतात शरीराला विश्रांतीची आज गरज आहे पण करणार काय गप्प बसून ते आपलं नेहमीप्रमाणे काम करत आदर्श चे आई वडील खूपच थकलेले होते एक दिवस आदर्शच्या वडिलांना गाडीने उडवले तेव्हा त्यांचे दोन्ही पाय गेले विमल आणि आदर्श ची आई , आदर्श खूप खूप रडले इतरांकडे पैशाची मदत मागू लागले पण कोणीही मदत केली नाही रवी आणि सुशांत पण गप्पच होते फक्त ते पाहत होते पण मदत काहीच करत नव्हते विमल सासर्याची खूप सेवा करायची सासर्‍यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे असे काही दिवस गेले आणि झोपेतच विमल चे सासरे वारले .


सगळीकडे रडारड चालू होती पण शामला आणि संगीताच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंब पण नव्हता उलट्या म्हणत की बरं झालं म्हातारड मेल लय वैताग होता त्यांचा विमला मात्र रडून-रडून चक्कर आली तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले विमल पण आता खूपच थकली होती पण तिला रोज उठून स्वयंपाक करावा लागत सूनही रोज दहा वाजता सकाळची उठत असत तेव्हा विमल सर्व आवरून शेतात कामावर जात व शेतात बायकांना पुढे खूप खूप रडत काम करता करता एक दिवस तिला अचानक अटॅक आला व ती झोपूनच राहिली तिला उठता पण येत नसत . ती डोळ्यातून फक्त अश्रू गाळी तिच्या सूना पण तिच्याकडं लक्ष देत नसे शेवटी मुलीला ते पाहावं लागलं प्रिया मात्र आईची खूप सेवा करत प्रियाला श्यामला आणि संगीता स्वयंपाक करताना म्हणत तुमच्या आईला हे नका चारू ते नका चारू पण मुलीची माया आपली आई एक दिवस नक्कीच बरी होईल त्यामुळे प्रिया शीला आणि संगीताचे बोलणे खाऊन पण आईच्या आवडीचं बनवून मिक्सरमध्ये बारीक करून चारत प्रिया आईसाठी एकांतात खुप खुप रडायची आणि विमला बोलता येत नव्हतं पण डोळ्यातून अश्रू मात्र सतत उघळत राहायचं विमल चे स्वप्न जे पाहिले होते की मुले मोठे होऊन मला खूप प्रेम देऊन संभाळतील ते मातीमोल झाले तिला मरेपर्यंत कष्ट करावे लागले


आदर्श हा विमल जवळ बसून मला बोलला मला माफ कर ना ग तू माझ्या घरात आल्यापासून तुला कधीच सुख मिळाले नाही असं बोलता बोलता विमल च्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि तिने डोळे झाकले तिचा मृत्यू झाला मग मोठ्यामोठ्याने सगळे हंबरडा फोडून रडू लागले विमल विमल..... शेवटी तिचे स्वप्न हे अपुरेच राहिले म्हणूनच मुलांनी सुनांनी आपल्या घरातील वृद्धांची काळजी घ्यावी त्यांचा जीव जाणावा त्यांचे स्वप्न पूर्ण करावे त्यांना मान सन्मान द्यावा मगच घराला घरपण येते तुम्ही कितीही पद प्राप्त केले तरी काही उपयोग नाही देव म्हणून मिळालेल्या आई-वडिलांना सासू-सासर्‍यांना तुम्ही छान जपा कोणाचेही आई वडील , सासू सासरे आपल्या आयुष्याला पुरत नाहीत त्यामुळे त्यांची काळजी घ्या    


Rate this content
Log in

Similar marathi story from Children