मी अनुभवलेला आनंदाचा क्षण
मी अनुभवलेला आनंदाचा क्षण
बाजाराचा दिवस होता माझ्या बाळावर लक्ष देण्यासाठी माझा सात वर्षाचा मुलगा होता त्याला पण समज नव्हती बाळ पाळण्यात ठेवले तर ते वर जात असे पण झोका देऊन माझा लहान मुलगा झोपवत असे मी बाजारातून येईपर्यंत बाळ पडू नये म्हणून मी त्याला पायाला बांधल नेहमीप्रमाणे बाजारात गेली. तेव्हा बाजारात खूप गर्दी होती. एक लहान मुलगा त्याला चालायला येत होते तो दीड वर्षाचा असेल खूप रडत होता. त्याच्या अंगावर खूप मळकी कपडे होती ,नाकातून शेंबूड येत होता खूप मोठ्याने तो जोर-जोरात रडत होता मी इकडे तिकडे पाहीले पण कोणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही याची आई कोठे आहे म्हणून मी त्या मुलाकडे पाहिलं त्याला जवळ घेतलं आणि त्याला लाडाने बोलू लागली पण तो खूप रडत होता मला खूप वाईट वाटत होतं मी तेथे सगळ्यांना विचारलं हा कोणाचा मुलगा आहे पण प्रत्येक जण व्यवस्थित रिप्लाय देत नव्हतं मला माझ्या बाळाची पण आठवण येत होती. ते रडत की काय पण या बाळाला तर मी सोडू शकत नव्हते गरीबाचा लहान मुलगा होता त्याकडे कोणी पाहू शकलं नाही इतका कसा माणूस वाईट असतो हा प्रश्न निर्माण झाला त्याच्या आईचा विचार आणि त्याचा विचार मनात घोळत राहिला मी काहीना बोलले की या लहान मुलाला येथे राहू द्या त्याची आई घेऊन जाईल त्या नक्की येथे येतील पण ते बाजारातील माणसे मला म्हणाली तू थांब आम्हाला काम आहे.
मग मी त्या मुलाला घेऊन एका जागी थांबली थोड्या वेळाने त्या मुलाचे आईवडील आले आणि मुलाला खूप व्याकुळतेने उचलून घेतले त्याच्या दोन्ही गालाची पप्पी घेतली, डोक्यावरून त्या मुलांच्या हात फिरवला त्या मला हात जोडून म्हणाल्या तुमच्यामुळे मला माझा मुलगा मिळाला आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते आणि ते माझ्याकडे खूप आपुलकीच्या नजरेने पाहत होते. आईला तिचे बाळ मिळाले आणि बाळाला त्याची आई हे पाहून मला खूप खूप मोठा आनंद झाला तो मुलगा देखील शांत झाला बाजार तर मी पूर्ण केला नाही दोनच भाज्या घेतल्या घरी जाताना त्या मुलाच्या आई-वडिलांचा चेहरा नजरेसमोर येऊ लागला घरी गेल्यावर मी माझ्या बाळाला घेतलं माझा लहान मुलगा म्हणाला मम्मी तु किती उशीर लावला किती रडली आपली गायु पण माझ्या मनात त्या आईचा आणि मुलाचा विचार येत होता त्यांना आनंद देऊन मला खूप आनंद झाला होता मुलाला आईस भेटवून खूप मोठे समाधान मिळाले होते मला.
माणूस गरीब असला तर त्याला वेदना होत नाही का ? गरिबाच्या ऐवजी श्रीमंत व्यक्ती चा मुलगा असता तर नक्की त्याला बाकीच्यांनी जवळ घेतलं असतं पण त्या मुलाच्या डोळ्यातील अश्रू लोकांना दिसले नाही त्या आईच्या मनाच्या वेदना त्यांना दिसल्या नाही मानव का एवढा वाईट असतो त्याचं मन का एवढं निष्ठुर असतं तेच समजत नाही. मानवा एवढा स्वार्थी या जगात कोण नाही .
पण एकमेकांचा जीव जाणा, एकमेकांचा विचार करा, गरीब असो अथवा श्रीमंत त्यांना मदत करा हीच ईश्वराची पूजा असते. त्यातूनच देव प्राप्ती होत असते...
