गर्दी
गर्दी


ति वेळ गर्दीची होती .संध्याकाळचा घरी जाण्याची वेळ प्रवासाची झुंड प्लँटफार्म वर दिसत होती. प्रत्येकजण लोकल पकडण्यासाठी आससुरले होते. प्रत्येकाला घाई होती गर्दी आता शिगेला पोचली होती. रष वाडत होती .कसारा गाडी तुडूंब भरुन आली होती .घाटकोपरला थांबते गाडी डबल फास्ट असल्याने डोबंवली कल्यान ठाणे वालेकरांची ओढातान ,ओघ आत शिरताना दिसत होती.
एक प्रवासी कसा बसा आत शिरतो.एका मागुन एक धक्का बुक्की रेटा रेटी चालु होती.
"आगे चलो" ची रेट पाठी मागुन कानी ऐकु येत होती.
"थोडा सरको आगे भाय,
थोडा जगा दो भाय, आगे खिसको भाय, असे शब्द कानावर फेकले जात होते. हे शब्द रोजच्या रुटीनमध्येल होते.रोजच कनाला ह्याची प्रचिती होते.सर्रास हे कानावर रेंगाळतात ट्रेनमध्ये.
"अरे भाय क्या कर रहे हो,
ईतना क्युं दबा रहे हो,
ईतना चिपको मत, सांस रुख रही है, थोडा सांस को तो लेने दो.
"मुझे मजा नही आ रहा भाय, तुन्हे दबाने में."एक प्रवासी मध्येच बोलतो.
आगे वाला ढकेल रहा है,उसको रोको पहिले.
उसको बोले खिसकने के लिये आगे,
आरे भाय, तुमको आगे जाने केलिये जगा दे रहा हुं,
"भाय जगा दे रहा है, या दबा रहा है....
...तुम जैसे समजो......
एक माणुस ह्या फुफाट्यातुन कसा तरी जागा करीत पुढे पुढे रेटत जागा करतो.आणि सिटपर्यंत पोचतो. सिटच्या मोकळी जागाही प्रवासांनी आदिच हस्तक्षेप केली होती तरीसुध्दा त्यातल्या त्याच जागा करीत तो पुढे सरकतो.आणि सिटच्या मोकल्या जागेत पायांच्या बोटावर उभी राहान्याईतकी जागा त्याला मिळते.
तो पायांच्या बोटांवर उभा होता. ट्रेन गचके खात होती.त्याला निट पकडता येत नव्हते.खुप प्रर्यंत केल्यावर त्याला सेप्टीग्रिलला दोन मध्यल्या बोटाने पकडन्याईतकी जागा मिळते. तिथे पण आधीच हाजार बोटे बाहेर पकडन्यासाठी गच्च वळवळत होती मातीतिल किड्याप्रमाने वळवळत.पकडन्यासाठी हँडक्लच किंवा हातकडे सेप्टी म्हनुन लटकले होते.पण ते किती जनांना पुरनार. त्याने कसेबसे एक बोट त्या जाळीत घुसवले व बोटानेच स्वताचा बँलंस करत होता.एकमेकांच्या सपोर्टने बँलंस कव्हर करीत होता.आता ट्रेन पार्सीबोगद्यातुन पुढे आली होती.डोंबवळीची गँग उतरायला उभे राहीले पण आजुन सिएसटी प्रवासी उठायचेे मनावर घेत नव्हते ठाणे आले तरी.ट्रेनने गती पकडली होती .खुप स्पिड ने धावत होती.त्यामुळे त्याला पकडायला जमत नव्हते.आता ट्रेन जोरात गचके देत होती .पकडायला काही भेटत नव्हते.तो कसातरी एकनेकांच्या आंगाखांद्याला बँलंस करुन उभा होता.तेवढ्यात ट्रेन गचक्यात थांबते व व्हता नव्हता तेवढा जोश त्याला रेळवला नाही व समोरच्या बसलेल्या व्यक्तीच्या प्रवासांची शर्टांची काँलर पकडतो.आणि पुढे बँलंस सावरन्यासाठी त्याने चक्क त्या व्यक्तीची मानच पकडली.त्यावर हाहाकार माजला एवढ्याशा गोष्टीवरुन.तेवढ्यात तो ताडकन जागा होतो.
"अरे मेरा गला दबाओगे क्या"
"नही भाय हात फिसल गया,
ऐसे कैसे फिसल गया हात.
"क्या तुम तो मेरी जान लेते थे अभी,
क्या मारना चाहते हो.
तुमको मेरे पिछे लगा दिया गया है मुझे मारने के लिये...मेरे घरवालोंने....मेरे दुश्मन
तुम मेरा पिछा कर रहे हो क्या,
"नही भाय, मेरा वो मक्सत नही था.
सिर्फ हात फिसल गया
तुम्हे पकडने नही मिला तो, तुम मेरा गला दबाओगे क्या?....
बडा आया हात फिसल गया बोलने वाला.
मेरी सांस अकड जाती तो.
वैसे मेरी साँस की आेर फिट का मरीज हुँ.
तो माणुस गुजराती व्यापारी होता. त्याने त्याला ओळखले पण गुजराती लोक अनोळखी व्यक्तीला आपली ओळख दाखवत नाही.त्याने टाळाटाळ केली. तो रोज सकाळचा ग्रुपसंगत भायखला उतरतो.त्याला मस्जित बंदरला उतरायचे असते.पण व्यापारी लोक एक स्टेशन मागेच उतरतात. ट्रेन फास्ट असल्याने कदाचित तो भायखला उतरत असावा.त्याला कलवा व दिवा दर्म्यान बोंदग्यातुन जात असता आचानक मिरगी आली होती.त्याने तंबाखुची बुक्की तोंडांत कोंबळी होती.त्याचा एका साथी ग्रुप मेम्बरला माहीत होते.
"उसकाे ये घर की बिमारी है"
तो फोनवर बोलता बोलता पैस्याचा व्यवहार करीत होता.पैसे ट्रांस्फर करीत होता.तेवढ्यात त्याला मिरगीचा झटका येतो.
उसके उपर किसीने किया है?
क्या.....
आे ....ठिक हो जायेगा......
आचानक तो बोलायचा थांबतो हातापायांची हालचाल थांबते हातांची बोटे करंगळी वाकडी होते तोंड वाकडे होते तोंडातुन फेस येतो.तरी लोक त्याकडे पाहत होते.
उसका दिन ही है ....हमेशा
आज ...दिन पे ..उसको फिट आती है.
हमेसा...शनिवार को ही....
त्याची बोबडी वळते जीभ बाहेर काढतो.तो थरथर कापत होता.काही मिनिटे त्याच अवस्थेत ठेवन्याची त्याचा मित्राने विनवणी केली. काहीजन त्याला पाणी पाजा तर काहीजन चमड्याचा चप्पल हुंगायचा सल्ला देतात. काहिजन त्याचे हात चोळतात. काहीजन त्याला हवा मोकळी सोडन्यासाठी जागा करीत होते.
तर काहीजन पायाचा साँक्स काडला त्याला हुगायला त्याचा नाकाला लावतात.काहीजन तोंडातील तंबाकुची बुक्की काडायचा सल्ला देतात तर काहीजन लोखंडाची वस्तु हातात ठेवायची सल्ला देतात.
काहिजन त्याची पँट सैल करतात.त्याला फ्रेश वाटन्यासाठी.
त्याचा एका ग्रुपमधला म्हनतो की,'उसको बिच बिच मै दैारे आते रहते है,
उसका सर मे खुन पास नही होता है....एक जन बोलतो.
"ईसके वजसे उसको मिरगी आती है.
"नही...नही उसका ईलाज चालु है.
"फँमेली बिमारी है"
ठिक होगा ....अभी
नंतर तर्क विर्तक लावल्यावर तो शुध्दीवर येतो.
नंतर त्याला हातात लोखंड ची वस्तु ठेवायचा एक जन सल्ला देतो.पण तो त्याला फेटाळतो आणी.....
हमारा फँमिली मँटर है....तुम नही समजोगे....वर विषय बदलतो.तोंडातिल तंबाकुची बुक्की आजुन तो चगळत होता.
तो कोनाचे ऐकन्याच्या मनस्थित नव्हता.
आचानक त्याच व्यक्तीला त्याच डब्यात पाहुन जरा तो दचकतो. तोच व्यापारी ज्याला, गेल्या शनिवारी मिरगिचा झटका आला होता.आज पण शनिवार आहे ......
तो त्याला ओळखतो पण तो गुजराती व्यक्ती ओळखतो असे दाखवत नव्हता. हे व्यापारी अनोळखी व्क्तीला आपला परिचय दाखवत नसतात.त्याचे ग्रुप मेन्बर रोजचे त्याचा बरोबर नसतात.आचानक झालेल्या हादसाने तो घाबरला होता. तोंडात तंबाकुची बुक्की होती. तोंडात साठवलेली थुंकी गाल फुगलेले वाटत होते. तस्याच अवस्थेत तो बोलत होता.
पुढचे स्टेशन डोंबवली येनार होते.आता जागा खाली होनार होती.पण कोणी उठायची तसदी घेत नव्हते.तो गुजराती उठतो कदीचित तो विसरला असनार कुठे उतरनार ते.....
उतरनारे व चढनार्यांची रेल वाढत होती .पुन्हा ढकला ढकली होत होती.तो ही पुढे येतो उतरायला .गर्दी वाढत होती.आचानक प्लटफाँर्मवर गाडी थांबायला व त्याला मिरगी परत यायला एक होते. ह्यावेली त्याला साह्य करायला त्याचे मित्र नव्हते. तो त्या गर्दीत कोसळतो ..लोक उतरायच्या नादात खाली कोसळलेल्या माणसाला तुडवत पुढे जातात.क्षणात एका व्यक्तीचे लक्ष जाते त्याला प्लँटफार्मवर ओढतो.
पुढे काय होते माहीत नाही.त्यानंतर तो कधीच नजरेला गवसला नाही.