Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

sunil sawant

Tragedy Others


4.7  

sunil sawant

Tragedy Others


गर्दी. . .(लघुकथा)

गर्दी. . .(लघुकथा)

3 mins 409 3 mins 409

बापरे! प्लॅटफॉर्म तर गर्दीने भरलाय नुसता आणि तिकिट काढण्यासाठीही हीऽऽ मोठी रांग लागलीय. खरंतर ही वेळच गर्दीची, आणि त्यात वडाळा नुसतं स्टेशन नाहीये तर जंक्शन आहे. मग काही बोलायलाच नको. ही गर्दी म्हणजे ताप आहे नुसता. . . .


गाडी मे भीड तो बहोत है। अभीतक कोई बकरा नजरमे नय आयला है। अगले टेसनतक रुकना पडेगा। अभी वडालामे गाडी एकदम पॅक हो जायेगा। जितना भीड ज्यादा होयगा, उतना अपुनके लिए भी अच्छा रहगा। . . . .आ गया वडाला। साल्ला, पाच उतरेंगा, पच्चीस चढेगा। बकरा तो ढुंढना पडेगा. . . .


हुश्श! बापरे! काय ही गर्दी! नुसती चेंगराचेंगरी. . .दोन दिवस झालेत मुलीला ताप आहे. डॉक्टरला दाखवून झालंय. पण ताप उतरत नाहीये. आता दुसर्‍या डॉक्टरकडे दहा वाजताची अपॉइंटमेंट आहे. चाईल्ड स्पेशालिस्ट डॉक्टर आहे, किती पैसे घेणार कोण जाणे? तीन वर्षाच्या मुलीला घेऊन या गर्दीतून चढलोय खरं पण फार मोठी कसरत करावी लागलीय. पण काय करणार? नाइलाज आहे, आपल्यासारख्याला ट्रेनचाच प्रवास परवडणार. आतातर या गर्दीने पार चेंगरून टाकलंय. कसंही करून मुलीला संभाळायला हवं आणि पाकीटही. . . . . अरे तो कोपर्‍यातला आपल्याकडेच वळून वळून बघतोय. पाकीटमार तर नसेल?


वा व्वा! आज नसीब हेै आपुनका। दिख गया बकरा। लडकीको संभालनेमे उसका हात बीजी है और भीडनेभी उसको दबा दिया है, मतलब नीचेकी जेब साफ करनेको आसानी होयगी। चलो. . . , उसकेपास चुपकेसे जाना होगा। घाई करना पडेगा नयतो आपुन पहूचनेसे पयले वो उतर जायेगा. . .


अरे तो तर आपल्याकडेच सरकतोय. या भयानक गर्दीत आपल्याला बिल्कूल हलता येत नाहीये आणि तो बिनधास्तपणे धक्काबुक्की करीत आपल्यापर्यंत पोहोचतोय. शिवडी आलं. उतरणार्‍या लोकांबरोबर तोही पुढे सरकून आलाय आणि आता आपल्याला खेटून उभा राहिलाय. दारुची दुर्गंधी जाणवतेय. चढणार्‍या लोकांना आपल्यापासून दूर ठेवतोय. जसं काही माझ्या मुलीला इतरांचा धक्का लागू नये याची काळजी करतोय. "सब बाजुसे जाव। बच्ची छोटी है। उसको धक्का मत मारो" असं बोलत हा शिवडीला चढणार्‍या लोकांना समजावतोय. मी तर बिल्कूल हलू शकत नाहीये. कॉटन ग्रीनला उतरायचं आहे. उतरायला जमेल ना? आणि तोपर्यंत पाकीट . . .


पोजिसन तो बराबर पकड लिया है, हाथ नीचेतक बराबर पहुचा है। पाकीटबी जेबमेच है, बस्स अब असली कमाल दिखानेका टेम आया है. . .उसका ध्यान तो बच्चीको संबालनेमे लगा है। बच्चीने आँक खोलके मुजको देखा. . . . .


खिशाला हालचाल तर जाणवली पण नंतर सगळं थांबलय. त्याच्या चेहर्‍यावर निराशा दिसतेय. कॉटन ग्रीन आलं. त्याला कळंलंय की आम्हांला उतरायचं आहे. तो पुन्हा दरवाजाकडे सरकतो. उतरणार्‍या लोकांबरोबर आम्हांला संरक्षक वाट करून देतो. चढणार्‍या गर्दीवर ओरडतोही. मी मुलीसह त्याच्यामुळे आरामात उतरतो. उतरल्यावर सहज त्याच्याकडे नजर जाते. छानपैकी हसत तो निरोपाचा हात हलवतो. मला गर्दीतून उतरल्यावर खिसे चाचपून बघायची सवय आहे पण आज नाही गरज वाटली त्याची. . .


इतना भीडमेभी काम नय हुआ। स्साल्ला. . .पर क्या करता, एकबार वो बच्चीको देखा और नजर हिलाही नय पाया। उसने एकबार अहिस्तासे आँक खोलके मुजे देखा और प्यारसे हँस दिया। बास्स!!! . . .वो मासुम, भोला चेयरा . . . . मेरे मुन्नी जैसा. . . दो दिनसे मुन्नीको तेज बुखार है. . . आज कैसेबी डाकटरके पास लेके जाना पडेगा. . .बकरा ढुंडना पडेगा. .बकरा ढुंडना पडेगा. . . फिरसे भीड मे घुसना पडेगा. . . .


Rate this content
Log in

More marathi story from sunil sawant

Similar marathi story from Tragedy