गोंधळ
गोंधळ
रात्री गोंधळ जागरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. देवीच्या मंदिराचा सभामंडप
छान फुलापानांनी सजवला होता. एक प्रसन्न वातावरण निर्मिती झाली होती.
देवीसमोर पारंपारिक पद्धतीने पूजा मांडताच संबळीचा आवाज वातावरणात घुमला आणि गोंधळी लोकांनी भक्तीभावाने गोंधळ सुरू केला.
अगदी त्याचवेळेस भाविकभक्त मात्र सिनेमाच्या गाण्यावर आधुनिक गोंधळ घालून गर्दी खेचत होते.
