STORYMIRROR

Gajendra Kudmate

Abstract Drama

3  

Gajendra Kudmate

Abstract Drama

गिधाडं

गिधाडं

8 mins
131

   चिव चिव चिमण्यांचा चिवचिवाटाने माझी झोप उघडली. डोळे उघडून बघितले तर थोडा फार उजेड होऊ लागला होता. थंडी वाटत होती म्हणून ब्ल्यांकेट अंगावर घेऊन तसाच निवांत थोडं लेटलो होतो, तोच पाच मिनिटांनी आमचा लक्ष्मीची म्हणजे गृह लक्ष्मीची वाणी माझा कानावर पडली. "उठा आता! सुर्यनारायण सुद्धा रोजचा प्रमाणे आपल्या दैनंदिन कामावरती जाण्यास सज्ज झाले आहेत. तुम्ही पण सज्ज व्हा. " झोपलो नाही ग फक्त पांघरून लेटलो आहे, आज थंडी थोडी जास्तच वाढली आहे. "हो ना! थंडी फक्त तुमचासाठीच वाढलेली आहे, आम्हा बायकांना तर थंडीच वाटत नाही. तिकडे कितीही थंडी पडो कि पाऊस पडो, आम्हा बायकांना तर सकाळी उठून पाण्यात हात घालावयाच लागतो तिकडे ते पाणी कितीही थंड का बरं नाही असोत. फक्त एकदा हात पाण्यात घातले तर ते हात पाण्यातून रात्री झोपण्याचा वेळेसच बाहेर निघतात." हो बाई हो

उठतो म्हणत मी बिछान्यावरून उठलो. सुर्यानारायणाला नमस्कार करून बोललो, "आलास बाबा, जसे तुझ्या न येण्याने सगळ्या जगाची हालचाल थांबून जाईल, त्याच प्रमाणे माझ्या कामाला न जाण्याने माझे घर आणि माझा संसाराची हालचाल थांबून जाईल. देवा सूर्यनारायणा! थोडी थट्टा करतोय रे बाबा, राग मानून घेऊ नकोस. आजचा ही दिवस छान सुखाचा जाऊ दे असा मला आशीर्वाद दे असे म्हणताच छोट्याशा आभाळाचा तुकड्याचा मागिल सूर्य बाहेर आला आणि चमकू लागला आणि त्याची किरण थेट माझ्या चेहऱ्यावर आणि माझ्या सर्वांगावर पडू लागली." आशीर्वाद देण्यासाठी धन्यवाद करतो देवा असे बोलता बोलता खिडकीचा बाहेर मी नजर टाकली.


  खिडकीचा बाहेर रस्त्यावर मला कसली तरी गर्दी दिसली. मी सहजच बायकोला विचारलं, अग ऐकतीस काय! ती उत्तरली आता काय ? आणखी काय राहिलं तुमचं, मी तुमचा डबा बनवत आहे. अग एक मिनिट इकडे येतेस काय? तोच ती माझ्यापुढे हाजीर झाली आणि म्हणाली, पटकन बोला ताव्यावर पोळी टाकून आली आहे. मी तीला विचारलं अगं बाहेर कसली गर्दी झाली आहे, पहाटेच्या वेळेस. काही नाही हो, ती रस्त्याचा कडेला एक कुटी आहे ना, हो तेथील म्हातारी माय, काय? असे मी जोरात ओरडलो आणि ताडकन उभा झालो. तेच माझ्या बायकोने मला धरलं आणि थांबवलं. तस काही नाही झालं हो ती फक्त रोजचा प्रमाणे लोकांना बाहेर दिसली नाही म्हणून लोकं तीचाबद्द्ल चौकशी करण्यासाठी गर्दी करून आहेत. " चौकशी आणि कशाची चौकशी करतात, त्या बिचारीचा मरण्याची असे म्हणत मी जोरात ओरडलो आणि लगबगीने बाहेर जाण्यासाठी सज्ज होऊ लागलो." माझ्या बायकोने मला पुन्हा धरलं आणि मला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मला समजावले. अहो तुम्ही

जे म्हणता ते सत्य आहे. ते सगळे लोकं तिचा मरणाचीच वाट बघत असतात आणि आहेत. एखादा गिधाड जसे एखाद्या जनावराला त्याचा मरणाचा अंतिम घटकेपर्यंत बघत असतो आणि त्या प्राण्याचे प्राण एकदाचे गेले कि मग त्याचा शरीराचे लचके तोडतो. त्याचप्रमाणे हे उच्च शिक्षित, पॉश आणि हाय सोसायटीवाले श्रीमंत लोकं ही त्या गिधाडाप्रमाणे त्या बिचाऱ्या म्हातारीचा मरणाची वाट बघत आहेत आणि असतात. जेणेकरून ती म्हातारी एकदाची मेली कि पॉश आणि हाय सोसायटीवाले श्रीमंत लोकं वास्तव्याला असणाऱ्या कॉलनीतील तिचा त्या छोट्याशा कुटीने वेढलेली जी अमुल्य आणि मोक्यावरची जी जमीन आहे, तीला कसे आपल्या ताब्यात घेता येईल याचाच विचार करत असतात.


   तिचे बोलणे ऐकल्यानंतर मी सूर्यनारायणाच्या दिशेने बघत स्तब्ध उभा राहिलो आणि त्याला पुन्हा हात जोडून

म्हणालो, देवा तू पहाटेलाच मला आशीर्वाद दिलास रे देवा, परंतु माझ्या दिवसाची सुरुवातच वाईट झाली रे. असे म्हणत मी अनमनाने बाथरुमला गेलो. माझे सर्वांग त्या गीधाडरुपी लोकांचा वागणुकीने आधीच तापले होते त्यामुळे मला भानच नाही राहिले कि मी त्या थंड गार पाण्यानेच आंघोळ करून टाकली. बाहेर आल्यावर बायको म्हणाली, अहो आंघोळीला गरम पाणी ठेवले होते. तिने चहा दिला तो मी प्यायलो आणि आपल्या कामावर जाण्यास निघालो. निघताना त्या कुटीकडे लक्ष केले तर ते लोकं त्या कुटीकडे बघत चर्चा करत होते. त्या कुटीचा दारात आणि अवतीभवती कसलीच हालचाल दिसत नव्हती. मी गाडीला किक मारली आणि तोच बायकोला आवाज दिला, अग ऐकतेस काय, ती म्हणाली बोला. मी उत्तरलो जर तसे काही असेल तर मला तात्काळ फोन कर मी लगेच परत येतो म्हणून मी कामावर जाण्यास निघालो. रस्त्याभर तोच विचार करत करत आपल्या कामाचा ठिकाणी पोहोचलो.


   कामावर पोहोचून मी त्याच विचारात गुंग होऊन बसलो. माझे माझ्या कामावर लक्षचं लागत नव्हते. माझा नजरेसमोर

आणि माझ्या विचारांत मला तीच म्हातारी सारखी दिसत होती. असे करता करता मला तिचा सोबत घालवलेला एक अमुल्य

असा क्षण आठवला आणि मी त्या क्षणात जाऊन पोहोचलो. ऐके दिवशी मी सुट्टीचा दिवशी सहजच माझ्या घराचा बाहेर उभा

होतो. तोच माझ्या कानावर एका म्हातारीचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज आला. कौतुहलाने मी आवाज येण्याचा दिशेने बघू लागलो. तर मला दिसले कि रस्त्याचा कडेला त्या एका कुटीसमोर एक चार चाकी गाडी उभी होती आणि तीन लोकं त्या कुटीचा दारावर उभे राहून त्या म्हातारीशी वाद घालत होते. आम्ही जेव्हा पासुन त्या कॉलनीत रहायला आलो त्याचा आधीपासून ती कुटी आणि ती म्हातारी तेथे वास्तव्याला आहे. ती तशी साधीभोळी आणि फारच कुणाशी कमी बोलणारी अशी गरीब स्त्री आहे. त्या कॉलनीत श्रीमंत लोकं रहायचे आणि त्यांचा कॉलनीला लागून ती कुटी होती. म्हणून ते श्रीमंत लोकं त्या म्हतारीशी उद्धटपणे वागायचे आणि बोलायचे,म्हणून ती म्हातारी सुद्धा त्यांचावर चिढायची आणि ओरडायची. त्यामुळे त्या लोकांनी तीला विक्षिप्त म्हणून प्रसिद्ध करून ठेवले होते. तर मी लक्ष करून ऐकले तर मला समजून आले कि ते त्या कुटीवरून

तीचासोबत वाद घालत होते. ती एकटीच बिचारी त्यांचा सोबत रडत त्यांचा सामना करत वाद घालत होती. मला न जाणे काय त्यावेळेस उत्सुकता जाणवली आणि मी अनपेक्षित त्या कुटीजवळ गेलो. तेथे जाऊन मी फक्त उभा राहिलो, तर वाद सुरु असतांना त्या म्हातारीने मजकडे एक नजर टाकली. तिचा नजरेशी माझी नजर मिळाली आणि माझ्या हृदयात काय असे आले कि मी अन्यास पणे त्यांचा मध्ये बोललो. माझ्या तेथे फक्त उभ्या असल्याने तर होताच परंतु माझ्या बोलण्याने त्या म्हातारीला फार मोठा आधार आणि हिम्मत आली होती. मी बोललो तर ते लोकं मला म्हणू लागले कि तुम्ही तुमचे काम करा आमचा भानगळीत आपले नाक खुपसू नका. मला तसे काहीच करायचे नव्हते ती त्यांची भानगळ होती, परंतु त्या मनुष्याने थेट मला उद्घटाप्रमाणे नाक खुपसू नका म्हणून म्हटले म्हणून मला राग आला आणि अनयास माझा आवाज वाढला. मी म्हटल काय नाक नको खुपसा तोंड सांभाळून बोला आणि काय जाणे माझा आवाज आणखीनच वाढला होता.


   मी आवाज वाढवून त्यांना विचारले कि का बरं तुम्ही बिचारीला त्रास देत आहात. तर ते ही माझ्या आवाजाला घाबरून गेले होते आणि ते तेथून गुपचूप निघून गेले. त्या वेळेस माझे मन राहून राहून त्या म्हातारीची मदत करण्यास आतुर होत होते. मी त्या म्हातारीला घेऊन तिचा झोपडीचा आत शिरलो आणि बघतो तर काय तर ती कुटी पडण्याचा अवस्थेत होत चालली होती. ती बिचारी एकटीच तेथे रहात होती. कुठेही कुठलेही कुणाचाही घरात म्हणा कि शेतात काम करून आपले पोट भरायची. त्या दिवशी तीला खाण्यास काहीच नव्हते म्हणून मी घरी जाऊन तीचासाठी जेवण घेऊन गेलो. तर ती नाही म्हणता म्हणता शेवटी माझा आग्रह केल्यानंतर जेवली. तिची भूख शांत झाल्यानंतर पुन्हा मी त्या म्हातारीचा डोळ्यात बघितले आणि तिचा डोळयांत बघून मलाच माहित नाही काय असे झाले कि माझ्या तोंडातून उदगार निघाले. माय काय झाले आणि का बरं तू अशी रडत आहेस, ते लोकं कोण होते. तिचे उत्तर ऐकुन मला आणखीच जोराचा धक्का बसला. माझे बोलणे ऐकुन ती ढसाढसा रडू लागली आणि काही वेळात शांत होऊन मला तिने सांगितले. ती म्हणाली लेकरा ते लोकं माझी झोपडी तोडण्याची गोष्ट करत होते आणि ते दोन लोकं दलाल आहेत. मी उत्सुकतेने तीला विचारले तर तो तिसरा मनुष्य कोण होता. ते ऐकुन ती आणखीनच उसंडी मारून रडू लागली आणि रडता रडता म्हणाली कि तो आमचा पापाचे फळ आहे. मला कळेनासे झाले म्हणून मी तीला पुन्हा विचारले, तर ती म्हणाली कि तो तिचाच पोटचा गोळा म्हणजे तिचा सख्खा मुलगा होता. त्या नालायकानेच त्या दलालांना येथे आणले होते. बायको घरात आली आणि तिचा नादात तो नालायक माय बापाला असा निराधार सोडून गेला आणि या झोपडीसाठी या जमिनीसाठी आमचा मरणाचा मागे लागला आहे. त्या नालायकाला माझी ही झोपडी आणि ही जमीन विकायची आहे आणि त्यापासून फार पैशे कमवायचे आहे. मग तिने मला एक कागद दाखविला, तो कागद जमिनीचा होता. त्यात तिचा पतीने ती जमीन म्हातारीचा नावावर लिहून ठेवली होती. मी तीला विचारले याचा व्यतिरिक्त आणखी काय कागद आहेत. तर तिने पेटी उघडून मला एक पिशवी दिली. मी त्या पिशवीतून कागद काढून वाचले तर ते एक मृत्युपत्र होते. ते तिचा पतीने मरण्याचा आधी बनवून घेतले होते. त्यात लिहिले होते कि “ माझी झोपडी आणि जमीन मी माझ्या नालायक मुलाचा

नाही तर पत्नी चा नावावर करतो आहे. त्यापुढे लिहिले होते, माझ्या पत्नीचा मृत्यू जर सामान्य नैसर्गिक पणे होईल तर ती

जमीन माझ्या नालायक मुलाचा नावावर होईल आणि अपघाती, अवकाळी तिचा मृत्यू जर होतो, तर ती जमीन अनाथ

आश्रमाचा नावावर होऊन जाईल


   म्हणून तिचा गिधाड मुलगा आणि दलाल तिचा नैसर्गिक पणे मरणाची वाट बघत आहेत आणि त्यासाठी तिचा

झोपडीसमोरून रोज येरझऱ्या मारत असतात. मी जेव्हा तीला हे समजावून दिले तेव्हापासून तीला अधिकच बळ मिळाले आणि ती आणखीनच निर्भय होऊन जगू लागली. या सत्याची जाण तीला होताच ती आणखीनच खंबीरपणे त्या दलालांची आणि लालसावृत्ती लोकांचा सामना निडर होऊन करू लागली होती. तेच माझ्या टेबलवरचा टेलिफोनची घंटी वाजू लागली. माझ्या

हृदयात धड धड वाढू लागली होती आणि मला वाईट बातमीची चाहूल लागली. माझे हाथ थर थर करत होते, तर माझ्या

सहकर्मी मित्राने फोन उचलला, तो फोन माझ्या बायकोचा होता. माझा मित्र म्हणाला वहिनीचा फोन आहे, बोल. मी फोन कानाला लावला तोच समोरून बायकोचा आवाज आला. तिचा आवाजात काहीच फरक जाणवत नव्हता, ती जशी सकाळी बिनधास्त बोलत होती तशीच बोलली. ती म्हणाली अहो तुम्ही तुमचा वॉलेट घरीच विसरलात. मी खिशाला हात लावून बगीतला तर खरच मी वॉलेट घरीच विसरलो होतो. मी तेच सांगण्यासाठी तुम्हाला फोन केला, तर आता फोन ठेवते. तोच शेवटी बायको फोन ठेवते म्हणाली तेच माझ्या तोंडून जोरात शब्द निघाला, "नाही! माझ्या तोंडून नाही शब्द ऐकुन बायको म्हणाली, "काय झाले हो! मी म्हणालो, याशिवाय आणखी काहीच नाही सांगायचे. मग माझ्या बायकोचा लक्षात आले आणि तिने सांगितले ती म्हातारी बरी आहे. ती तुम्ही कामावर जाण्याचा काही वेळेने झोपडीचा बाहेर झाडू मारताना दिसली. तुम्हाला आणखी एक आनंदाची बातमी सांगायची होती ज्याने तुमचा मनाला शांतता मिळेल असे म्हणाली. मी आश्चर्य चकित झालो कि कुठली आनंदाची बातमी सांगते, तोच ती बोलली कि माय आपल्या घरीच बसलेली आहे आणि जेवण करत आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यांना अश्रूंचा पाणाच फुटला आणि अश्रुधारा वाहू लागल्या. देवाचे मी कोटी कोटी आभार मानले आणि तीला

स्वस्थ आणि सुखरूप ठेवण्याची कामना केली. परंतु राहून राहून मला त्या गिधाडांची आठवण आणि त्यांचा राग येत होता. माझ्या मस्तकात एकच प्रश्न वारंवार येत होता, कि ते आकाशात उडणारे गिधाड आणि जमिनीवर मनुष्य म्हणून जगणारे मनुष्य रुपी गिधाड यांचात काही फरक आहे काय. याचे उत्तर मलाच मग उमजलं, नाही! काहीच फरक नाही आहे. ते आकाशातील गिधाड फक्त आणि फक्त त्या मरणाऱ्या प्राण्याचे प्राण जाण्याची वाट बघत त्याचा डोक्यावर उडत असतात. जमिनीवरील त्या

प्राण्याचा जीव गेल्यानंतर त्याचे मांस खाऊन त्यांची भूख शांत होते. परंतु जमिनीवरील मनुष्य रुपी गिधाड सख्या जन्म देणा आई वडिलांचा मरणाची वाट बघत असतात. नुसती वाटच बघत नाहीत, तर वेळो वेळी येऊन त्यांना दुख वेदना देऊन जातात जेणेकरून ते लवकरात लवकर वेळेचा आधीच मरून जातील. यांची भूख ही आई वडिलांचा मृत्यनंतर ही नाही शांत होत, ते

सर्वथा भूखेच राहतात आयुष्यभर.


        स्वलिखित



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract