Gajendra Kudmate

Drama Others

3  

Gajendra Kudmate

Drama Others

क्षमलेले वादळ

क्षमलेले वादळ

6 mins
224


आज माधुरी फारच आनंदित होती, परंतु त्याचबरोबर बरेच प्रश्न तीचिया मनात राहून राहुन उठत होते. ती दुप्पट वेगाने लगबगीने काम करत होती. तेव्हढ्यात अनिता तीला म्हणाली, "आई मी येते". माधुरी उत्तरली, " हो बेटा, सावकाश जा आणि सुखरूप परत ये". तर परत लगेच माधुरीला आनंदचा आवाज आला, " आई माझे मोजे कुठे ठेवले आहेत. मला ऑफिसला जायला उशिर होत आहे. इकडे येऊन पटकन मला शोधून दे ना गं". माधुरी लगबगीने आनंदचा बेडरुमचा दिशेकडे जाऊ लागली. तेथे गेल्यावर उत्तरली, " काय रे बेटा! तूझ नेहमीचं! काही नवीन नाही रे, एकदाची तूझी बायको येऊ देत तर तू सुधरून जाशील म्हणून हसू लागली". आनंद हि गालात लाजून म्हणाला," काय गं आई, का बरं असं बोलतेस. मला उशिर होतोय माझा डबा दे मी निघतो". आनंदला डबा देत माधुरी बोलली," बाळा! सावकाश गाडी चालव आणि वेळेवर ऑफिसला पोहोच". आनंद तेथून गेल्यावर माधुरी पुन्हा आपल्या प्रश्नांचा भोवर्‍यात घिरट्या खाऊ लागली.

   तर माधुरी प्रशांत शेंडे, हि एक प्रामाणिक, एकनिष्ठ,प्रेमळ आणि विशेषतः सुंदर दिसायला अशी स्त्रि होती. तीचे आईवडील गरीब असून मुलगी दिसायला फारच सुंदर होती. त्यामुळे अवघ्या १६ व्या वर्षाची असतांना एक चांगलं स्थळ येउन तीचीये लग्नं झाले. जीवनसाथी हि माधुरीला फारच चांगला मिळाला, त्याचे नाव होते प्रशांत. त्याचा नावाप्रमाणेच त्याचे व्यक्तिमत्त्वं होते. तो हि प्रामाणिक , एकनिष्ठ आणि शांत स्वभावाचा मुलगा होता. दोघांचे एकमेकांवर खुप प्रेम आणि निष्ठा होती, त्यामुळे तीला लवकरचं दिवस गेलेत. नऊ महिण्यानंतर माधुरीने एकाच वेळेस दोन अपत्यांना जन्म दिला फक्त ५ मिनिटांचा अंतराने. त्यातील एक मुलगा तर एक मुलगी होती. प्रशांत हा शाळेत शिक्षक होता, त्याचे आणि परिवाराचे पालन पोषण होईल इतके तो कमावत होता. तो माधुरीपेक्षा फक्त ७ वर्षांनी मोठा होता. असेच दिवसांमागून दिवस निसटत गेले आणि दोन्हीं मुले ५ वर्षांची झाली होती. तेच एके दिवशी एका वाहन अपघातात प्रशांतचा अनपेक्षित मृत्यू झाला. हि बातमी कळताच माधुरीवर दुःखांचे डोंगरच कोसळले होते. डोक्यावर मोठ्यांपैकी कुणाचाच हाथ नव्हता कारण प्रशांत हा अनाथ होता आणि माधुरीचे आईवडलांचा अल्प काळात निधन झालेल होतं. सोबतच तीचा पदरात दोन चिमुकली मूले होती. आता माधुरीला विचार येऊ लागला होता, कि आता करावे तर काय करावे.

   काहि लोकांनी सल्ला दिला कि बाई तू अवघ्या २१ वर्षांची आहेस. वरुन तरुण आणि दिसायला फारच सुंदर आहेस तर तू दुसरे लग्नं का बरं करत नाहिस. तुला नवीन आधार आणि लहान लेकरांना बाप मिळून जाईल. माधुरीला स्वत:पेक्षा दोन मुलांची काळजी सारखी सतावत होती. जर मी लग्नं केल तर नवीन व्यक्ती काय माझ्या लेकरांना प्रेम देईन कि नाही. त्यांचे भवितव्य पुढे काय होणार. तिचा विचारांना निश्चित असे कारण होते. कारण कि तीचा डोळयांसमोर अनेक उदाहरण येऊ लागले होते कि दुसरे लग्नं झाल्यावर नवीन पिताकडून लेकरांचे हाल होतात वगैरे वगैरे. त्यामुळे माधुरीने एक निर्धार केला कि ती स्वत:चा जीवनाला आपुल्या मुलांसाठी अर्पण करून कबाड कष्ट करून त्यांचे पालनपोषण करेन परंतु दुसरे लग्नं करणार नाही. त्या कठोर निर्णयासाठी माधुरीने आपले तरुणपण, आशा, आकांक्षा, शरीराची भुक आणि बरेच काही त्यांचा त्याग केला. तिने बिचारीने एकनिष्ठा आणि प्रामाणिकपणे एका विधवेचं जीवन स्विकारलं. आयुष्यात तीने कबाडकष्ट करून दोन्हीं मुलांना शिकवण दिली. त्यांना त्यांचा पायावर उभे केले. त्यात अनिता हि मोठी मुलगी ती आज पिताप्रमाणे शाळेत शिक्षीका तर आनंद हा लहान मुलगा शिकून एका मोठया कंपनीत कामाला होता. आता दोन्हीं मुले लग्नाचा वयाला आलेली होती. परंतु सगळ्यात विलक्षण गोष्ट हि होती कि माधुरी हि कुठल्याच बाजुने त्यांची आई वाटतं नव्हती. कोवळ्या वयात लग्नं आणि लगेच मुलं यादरम्यान आई आणि लेकरू यांत फरक फारच कमी होता. ज्या लोकांना माहित होते ते म्हणायचे माय लेक परंतु अनोळखी लोक माधुरी आणि अनिताला बहिणी समझायचे.

  तर आज इतक्या वर्षांनी माधुरीची एकनिष्ठेची शपथ तुटण्याची वेळ आलेली होती. कारण कि कुणीतरी माधुरीला आवडू लागलेलं होतं. तिचापण दबलेल्या भावना, आशा, अपेक्षा आता फोफाऊ लागल्या होत्या. तिचे मनसुद्धा आता स्वप्न बघू लागले होते. या गोष्टीला मागील दोन ते तीन वर्षांचा काळ होत आला होता जेंव्हा एका कार्यक्रमात सुमीत आणि माधुरीची भेट झाली होती. सुमित हा काहिप्रमाणे प्रशांतसारखाच स्वभावाचा होता. त्याचे पत्नीशी संबंध विच्छेद झालेले होते. तर हाच सुमित आज घरी येणार होता आणि माधुरी आपल्या मुलांना त्याचाशी भेटवणार होती. सायंकाळची वेळ होत आली होती. अनिता आणि आनंद घरी परतले होते. माधुरी सारखी घळीकडे बघत होती. घळीत ७.०० वाजले तोच १० मिनिटांनी डोर बेल वाजली. अनिता दार उघडण्यास गेली तर इकडं माधुरीचा हृदयाचे ठोके वाढू लागले होते. दार उघडताच सुमित दरात उभा होता. अनिता त्याला ओळखतं नव्हती म्हणून तीने सुमितला विचारले, "कोण पाहिजे आपल्याला? सुमितने माधुरीचे नाव घेतले. तेवढ्यात आनंद हि तेथे आला. अनिताने,"आई " म्हणून हाक मारली. तेच माधुरी बाहेर आली. माधुरी येताच दोन्हीं मुले आपापल्या बेडरुमचा दिशेने जाऊ लागली होती. माधुरीने दोघांनाही थाबायला सांगितले आणि सुमितला घरात येण्यास सांगितले.

   सगळे एकत्र बसल्यावर त्या ठिकाणी एकदम शांतता पसरली होती जणू वादळ येण्याआधीची शांतता असावी. तर माधुरीने दोन्हीं मुलांची ओळख सुमितशी आणि सुमितची ओळख मुलांशी करून दिली. नमस्कार चमत्कार झाल्यानंतर माधुरी पुढं दोन्हीं मुलांना म्हणाली मला एका कार्यासाठी तुम्हां दोघांचीहि सहमती हवी आहे. अनिता उत्तरली, "कसले कार्य, आई " तर माधुरीने सर्व सामर्थ्य एकवटून उत्तर दिले, " लग्नाचे कार्य ". हे ऐकताच दोन्हीं मुलांनी म्हटले नाही आता ५ वर्ष तरी आम्हाला लग्नं करायचे नाही. त्यांना मद्देच थांबवून माधुरी म्हणाली, "मला लग्नं करायचे आहे". हे ऐकून पुन्हा तेथे एकदम शांतता पसरली होती. काहि वेळाने अनिता बोलली, " आई तू काय बोलतेस, तू शुद्धिवर तर आहेस ना. दुसरे लग्नं आता या वयात. अगं आता आमचे लग्नं करण्याची वेळ आलेली आहे आणि आता तुला लग्नं करण्याचं वेळ लागलेलं आहे." त्यावर आनंद बोलला, " अगं काही समाजाचा विचार कर, लोक काय म्हणतील. यापेक्षा आमचा विचार कर, आम्हाला काय वाटणार, लोक आम्हाला काय म्हणतील. तुझा या निर्णयाने आमचे काय होईल, आमचे भवितव्य अंधकारमय होईल. आम्ही कुणाला तोंड दाखवण्याचा लाईकेचे राहणार नाही वगैरे वगैरे." त्या दोघांचेही बोलणे माधुरी ठामपणे ऐकत होती. दोघांनीही एकमताने नकार दिला आणि तेथून जाऊ लागले होते. तेच पुन्हा माधुरीने त्यांना थांबवले. पुन्हा तेथे पुर्वीसारखी शांतता पसरली होती.

   मग एकाएक माधुरीचा भावनांचे वादळ उमडून आले. "काय म्हटले तुम्ही दोघांनी, आम्हाला काय वाटेल, आम्हाला लोक काय म्हणतील. आमचे भवितव्य अंधकारमय होईल वगैरे वगैरे. हो रे बाळांनो मी आजवर तुमचा आणि फक्त तुमचाच विचार केला. स्वत:ला तर मी त्याचं क्षणी तुमचासाठी विसरले होते. जेंव्हा तुमच्या जन्मादात्याचे निधन झाले होते. त्याच वेळेस मी तुमचा विचार न करता आपल्या स्वत:चा विचार केला असता आणि दुसरे लग्नं केले असते तर तुमचे काय झाले असते. कुठे असता तुम्ही काही माहित नाही. तेव्हा मी फक्त तुमचाच विचार करून आपल्या सर्व आशा, आकांक्षा, भावनांचा त्याग करून एकनिष्ठेने विधवेचे जीवन जगले. तुमचे शिक्षण पुर्ण करून तुम्हांला तूमचा पायावर उभे करण्यापर्यंत तुमचा मार्गात अळथळा म्हणून कधीच आले नाही. तरी तुम्ही म्हणता मी तुमच्यासाठी काहींचं नाही केले. तुम्ही म्हणता तुमची लग्नाची वेळ आली आहे तर खुशाल लग्नं करा. आपापले संसार थाटा. परंतु मी कुठे जाऊ. लग्नं करून तुम्हांला तुमचे नवीन परिवार मिळेल जोडीदार मीळेल, पण माझे काय? आताच असे मला बोलता तर तुमचे लग्नं झाल्यानंतर माझ्या उतरत्या वयात काय नाही बोलणार तुम्ही. म्हणून मी हा धाडसी निर्णय घेतला आहे आणि तो मी यशस्वि करणार आहे. आज मी खरच स्वत:चा विचार करणार आहे". माधुरी ढसाढसा रडू लागली आणि तेथे पुन्हा एक शुन्याप्रमाणे शांतता पसरली होती. दोन्हीं मुलं पाय आपटून तेथून निघून गेली. माधुरीचा डोळयांतून अश्रुधारा वाहू लागल्या होत्या आणि माधुरीचा मनातील भावनांचे वादळ आता क्षमून गेले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama