STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational

3  

Jyoti gosavi

Inspirational

घुबड बाळ

घुबड बाळ

3 mins
226

आज सकाळी खांद्याला सेॅक अडकवून कामावर जाण्यासाठी बाहेर पडले. एक वीस-पंचवीस पावले चालले असेन, आणि चमकले ,थबकले, कारण जिथे बांधकामासाठी म्हणून पत्रे लावले आहेत, तिथे मला काहीतरी वेगळं वाटलं. अगदी जमिनीच्या कट्ट्या लगत. 

बारकाईने बघितल्यावर मी पण प्रथम घाबरले, कारण ते एक छोटंसं घुबडाच पिल्लू, त्या पत्र्याला एकदम चिटकून बसलेलं होतं. 


घाबरलेलं होतं ,कदाचित त्याला उडता येत नसाव, पण त्यांची चेहरेपट्टी अशी की, माणसाला घाबरवणारी असल्यामुळे, काही क्षण मी त्याच्याकडे आणि ते माझ्याकडे एकटक बघत राहिले. 

नंतर लक्षात आले की याला कावळे आणि रोडवरची कुत्री मारून टाकतील. त्याच्या आजूबाजूला कावळे फिरतच होते, आणि कुत्र्याचे एक लहानसं पिल्लू देखील त्याच्यावर  भुंकत होतं .

काय करावं ते मला समजेना, दहा मिनिटं त्याच्या पाशी उभी राहिले, शेवटी विचार केला घरात नेऊन ठेवू ,संध्याकाळी कामावरून आल्यावर बघू, म्हणून मी त्याला पकडायला पुढे गेले, कि ते उडाले. 

पण त्याला वरती उडता येत नव्हते. नाकतोडा जेवढ्या अंतराच्या उड्या मारतो ना! तेवढ्याच उड्या मारत होते. 


शेवटी मनाचा हिय्या करून मी त्याला पकडले, तरी मनात धाकधूक होती. 

घुबड म्हणजे अशुभ , लोक काय म्हणतील ?वगैरे वगैरे


 पण शेवटी ते घुबड बाळ मी घरात आणले. 

दोन्ही मुले झोपलेली होती. त्यांना उठवले आणि त्यांना सांगितले, "अरे उठ! मी घुबड आणलंय "

आधी बारक्याला काही कळेना ,त्याला वाटले माझ्या हातात नारळच आहे. 

कारण ते माझ्या ड्रेसच्या रंगाला एकदम मॅचिंग असे मिसळुन गेले होते. 

माझा ड्रेस पिवळट, त्याचा रंग देखील पिवळट, 

मग त्याला म्हणाले, "अरे हे पहा! माझ्या हातात आहे"


आधी ते धडपडत होते सुटण्यासाठी, परंतु मी जसे त्याला हळुवार गोंजारले, त्याच्या पंखावरूनी हात फिरवले, तसे ते माझ्या कुशीत विसावले .

छोट्याने मोठ्याला उठवले. 


अरे दादा बघ! आईने घुबड आणले .

तो पण खडबडून उठला, काय? काय? घुबड ?

त्याला आश्चर्य वाटले. 


लहान असताना त्यांचे कपडे ठेवण्याची औषधे ठेवण्याची एक जाळीदार बास्केट होती, ती बाहेर काढली. त्यातलं सगळं सामान बाहेर काढून ठेवलं, आणि त्या गोड बाळाला त्याच्यामध्ये ठेवलं. 

ते एकदम निपचित दोन्ही पाय वर करून पडलं, मग आम्हाला भीती वाटली .


अरे !मेल की काय? मग परत बास्केट्स झाकण उघडलं ,तर हे पटकन बाहेर उडाल आणि बेड खाली जाऊन लपल. मग पुन्हा बेड खाली शुक करून हात लांब करून, त्याला बाहेर काढले. आणि पुन्हा बास्केटमध्ये ठेवले. 

त्यात शिवाय घरांमध्ये आमचा ब्रुनो! त्यामुळे तो काय करेल का ?अशी भीती वाटत होती. 

मला तर कामावर जाणे भाग होते .मी मुलांच्या वरती सोपवून कामावर निघून गेले. 


खरेतर घुबड या प्राण्याबद्दल आपल्यामध्ये खूप प्रवाद आहेत. ते अशुभ असते, त्याचे दर्शन अशुभ असते, तसेच त्याच्याकडे एकटक पाहिले तर आपले डोळे जातात, ते आपले डोळे फोडते, आणि लहानपणी ऐकलेली एक अफवा, अशा दुर्मिळ प्राण्यांसाठी बरोबर आहे. 


ती म्हणजे म्हणजे घुबडाला कधी दगड मारू नये, आपला दगड ते झेलते आणि उगाळत राहते. 

जसा जसा दगड झिजत जातो, तसे तसे आपण क्षीण होतो, झिजतो आणि मरून जातो .त्यामुळे भीतीच वाटायची. शिवाय बहुदा त्याच्या डोळ्याच्या पापण्या नसतात, त्यामुळे ते आपल्याकडे एकटक बघतोय किंवा रागाने बघते असे वाटते. 

शिवाय मी देखील आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या जवळून घुबड बघितले होते. त्यामुळे मी पण पहिले हात लावायला घाबरत होते. आपल्याला चावेल का? शेवटी घाबरत घाबरत मी त्याला पकडले, आणि जवळ घेतल्यावर ते एवढ्या विश्वासाने माझ्या कुशीत शिरले ,की खरंच वाटलं एवढा गोंडस गोड पक्षी अशुभ कसा काय असू शकतो? 

उलट माझा मोठा मुलगा घरात आल्या आल्या म्हणाला , "आई घुबड लक्ष्मीचे वाहन आहे..शिवाय पांढरे घुबड दुर्मिळ, ते तुमच्या घरी आले, म्हणजे तुमच्यावर लक्ष्मीचा कृपाप्रसाद झाला .असे देखील कोणीतरी सांगितले.


मुलांनी ऑनलाईन सर्च केले आणि मुलुंड मधील एक "उत्कर्ष वेल्फेअर "नावाच्या संस्थेमधील एक मुलगा रेस्क्यू करायला आला, त्याचे नाव नरेंद्र, मग तो त्या घुबड बाळाला आमच्याकडून घेऊन गेला आणि ॲनिमल दवाखान्यात दाखवून, वनविभागाच्या ऑफिसशी संपर्क साधून, त्यांना फोटो वगैरे पाठवला आणि नंतर संध्याकाळी त्याला येऊरच्या जंगलामध्ये सोडून दिले .

आम्हा तिघांना पण ते इतके आवडले होते की त्याला घरी पाळावेसे वाटत होते. 


 तरी पण आमच्या तिघांना आज त्याला सोडल्याबद्दल खूप हुरहुर वाटत आहे .

असे वाटते की पाळायला पाहिजे होते .


पण त्याला काय खायला लागते, ते काय खाणार हे काय माहित नाही. 

माझ्या माहितीप्रमाणे घुबड हे पूर्ण मांसाहारी असते. गांडूळ, उंदीर घुशी, किडेमकोडे खाते, त्यामुळे शेवटी सोडून द्यावे लागले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational