STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

घरची गरीबी. पण मनाची श्रीमंती

घरची गरीबी. पण मनाची श्रीमंती

4 mins
268

आयुष्यात कुठलेही मोठे सुख नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा जे आहे जसे आहे त्यात समाधान मानणाऱ्या आणि आपला गरिबीचा कुठलाही तमाशा नकरता शांत पणे नेटाने आपला संसार करणाऱ्या अनेक बायका आपण आपल्या आजुबाजूला कधीतरी पहातच असतो. ज्या धनाने श्रिमंत नसल्या तरी मनाने फार मोठ्या असतात आणि ज्या घरात या अशा बायका असतात ते घर मग एक झोपडी का असेना पण त्या घरातल्या व्यक्तींसाठी ते घर स्वर्गापेक्षा कमी भासत नसते हो ना?..

सरू ताई या ही देखील अशीच एक स्त्रि आहे जिच्या नावाची आणि मनाच्या मोठेपणाची चर्चा सर्वदूर पसरली आहे. सरू ही जेव्हा लग्न करून आली तेव्हा दोन लहान दिर आणि एक नणंद ,एक तिचा नवरा आणि आता ती स्वता असा पाच लोकांचा परिवार सासु सासरे नव्हतेच नणंद लहान असताना दोघेही अपघातात गेले होते तिचा भावांनी आपल्या बहीणीला लाडाने सांभाळले आणि वाढवलं होतं.

घरातला मोठा भाऊ म्हणुन सरूच्या नवऱ्याने तीघा भावंडांना वडिलांप्रमाणेच वाढवले होते.आता सरू लाही त्या तिघांची आई बनायचे होते. सरू मनाची मोठी तिने दिरांनाही आणि नणंदेला आपल्या मुलांसारखे चे प्रेम आणि आपुलकी ने वागवले तिघांची काळजी घेतली नणंदेला ही मोठी केली तिला घरातील सर्व कामे आणि शिक्षणासोबतच चांगले संस्कार ही दिले .

झोपडी वजा छोटे टुमदार घर जे सरुच्या नवऱ्याने शेतातच बांधले होते तो मोठा भाग्यवान म्हणुन सरु सारखी बायको त्याला भेटली होती. त्याच्या फाटक्या संसारात ही तिने समाधान मानले होते त्याच्या छोट्याशा झोपडीलाही तिने स्वर्ग बनवले होते. सरू चे म्हणणे असायचे कि, घर लहान असो की मोठे, झोपडी असो की,महाल महत्वाची आहे ती माणुसकी नाती गोती जपली गेली पाहिजे आपल्याच लोकांना आपलेपणा वाटणार नाही तो बंगला काय कामाचा आणि आपल्या च आई-वडिलांना रहायला जिथे जागा नाही आणि खायला दोन घास मिळत नाही ते महाल काय कामाचे .

सरू स्वयंपाकात सुगरण तशीच अन्नपुर्णेचे रुप गरीबीत आणि झोपड्यांत राहुनही तिचे मन खूप मोठे घरात दोन वेळ खाण्याचे वांदे जेवढे राबाल तेवढेच धान्य तिच्या घरात असायचे पण तरिही तिच्या दारात आलेला कुणी पाहुणा असो की भिकारी कधीही तो उपाशी जात नसे.

भाकरी रांधतांना च सरू एक गो मातेची,एक दारात येणाऱ्या कुत्र्याची, एक मागायला येणाऱ्या भिकाऱ्याची आणि एक भाकरी जास्तीची वाढवून बनवत असे म्हणजे अचानक कुणीतरी वेळी अवेळी आलं तर तोही आपल्या घरातुन उपाशी पोटी नको जायला असे तिला वाटे.कुणीही नातलग किंवा सगेसोयरे भेटायला आले तर त्यांना ती कधीच रिकाम्या हाताने जाऊ देत नसे.

तिचे बनवलेले पापड, कुरडई,लोणची काही असू दे ती नेहमीच बांधून देत असे नाहीच असलं काही जास्त तर तिच्या शेतातील काही थोडाफार भाजीपाला निघाला असेल तो तरी ती पिशवीत घाईघाईने टाकून देत असे .

म्हणुन सारेच सरु चे तोंड भरून कौतुक करायचे .

नातेवाईक असो की गावातले सारेच तिची वाहवा करायचे कारण सरूच्या घरी मध्यरात्री जरी कुणी पाहुणा आला तरी सरू कधीही कंटाळा करत नसे तेवढ्या वेळेला ती काही तरी बनवून खाऊ घालत असे .

कुठलाही कंटाळा नाही कपाळावर आढ्या नाही की तिरस्कार नाही जेवढ्या प्रेमाने ती रांधायची तेवढयाच आग्रहाने आणि आपुलकीने ताटात वाढायची ही.


सरू नेहमीच म्हणायची. "कोंड्याचा मांडा, समाधानाची भाकरी करणारी आलेल्या गेलेल्या दोन घास खावुनच जा सांगणारी, सुग्रास जेवण बनवून आग्रह करून पोटभर खाऊ घालणारी, समोरच्या ने तृप्तीचा ढेकर दिला की चेहऱ्यावर समाधानाचे हसु दिसणारी, नेहमीच आनंददायी पाखरण करणारी तीच खरी सुगरण,तीच खरी अन्नपूर्णा,तिच खरी गृहिणी."

आणि आजही हे संस्कार फक्त एका झोपडीत किंवा गरिबांच्या घरातच जपले जातांना दिसतात ही खरं तर शोकांतिका आहे. पण अतिथी ला देव मानणारी आपली संस्कृती ही हळूहळू मागे पडतांना दिसत आहे .आज असा जमाना आला आहे की,आपल्या माणसांच्या घरी जाण्या अगोदर फोन करून विचारून जावे लागते कि ते फ्री आहेत का , त्यांचा काही दुसरा प्लॅन किंवा महत्त्वाचं काम तर नाही ना.तरच जाता येते.अचानक सरप्राइज देण्याच्या उद्देशाने जर गेले तर त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य चे हसु दिसत नाही तर हे मध्येच कसे कलमडले याचे त्रासदायक हावभाव दिसतात आणि हे कडु असले तरी सत्य आहे की, आज एका माणसाला दुसऱ्या माणसाचा कंटाळा येतो आहे. आपल्या ठरलेल्या बिझी शेड्युल मध्ये व्यत्यय आणणारे आपले आई-वडील ही अचानक आलेले चालत नाही मुलांना आणि काही घरांमध्ये आपल्या ठरलेल्या दिनचर्या त बदल नको म्हणून सासुरवाशीण मुलगीही अचानक आपल्या मुलं आणि नवऱ्यासोबत आल्या की आई-वडिलांनी ही प्रश्र्न पडतो हे काही सण नाही, सेलिब्रेशन नाही मध्येच कसे आले, म्हणजे काही घरांमध्ये ही परिस्थिती आहे मी सर्वच घरांबाबत असे म्हणत नाही हे. काही घरांमध्ये तर अशीही स्थिती मी अलीकडेच पाहिली आहे मुलीला आपल्या मूलांना घेऊन दोन दिवस जरा चेंज म्हणून माहेरी येण्याची इच्छा झाली आणि ती फोन करून बोलली तर तिला वेगवेगळी कारणं देऊन टाळलं ही जातं , काही बाया दोन दिवसांसाठी भावाच्या घरी गेल्या तर त्यांना अगदी च असे वागवले जाते कि बाई तुला हौस होती ना यायची आता आलीस तर स्वता सर्व कर तुझ्या हाताने तूलाही खायला बनव आणि आम्हालाही बनवून खाऊ घाल. दोन दिवसांसाठी आलेल्या त्या माहेरवाशीण ला आग्रहाने कुणी वाढणार तर नाही पण तीने जबरदस्तीने माहेरी येऊन किती मोठी चुक केली हे तिला वारंवार दाखवून दिले जाते.मग पंचपक्वान जरी असेल पण त्या जेवणाला जर आपलेपणाचा सुगंध नसेल तर काय उपयोग.तर एकुणच काय तर लोकं पैशाने, सुखसोयी ने,बंगला गाड्यांनी मोठे होत आहेत.पण मनाने आणि माणुसकी ने छोटे होऊन चालले आहेत. आणि हिच माणुसकी, आपुलकी,प्रेम झोपडीत मिळते तिथल्या कांदा भाकरी तही आपुलकी आणि आग्रह असतो तर ती झोपडी महाला पेक्षा मोठी आहे..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational