गाभाऱ्यातील देव
गाभाऱ्यातील देव
अवघ्या बारा तेरा वर्षाची ती अल्लड पोर. लाकूडफाटा गोळा करीत असताना नराधमांच्या दृष्टीस पडली. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी ती
जिवाच्या आकांताने धावत सुटली. एका मंदिरात शिरली आणि निर्धास्त झाली.
पण त्या नराधमांना कसले मंदिर अन् कसले काय? तिच्यावर अमानुष अत्याचार होतांना मंदिराच्या भिंती थरथरल्या, जमीन हादरली. पण गाभाऱ्यातील देव शांत होता. ती एवढेच म्हणाली - "देवा वाटले होते तू तरी माझी लाज राखशील."
