एप्रिल फुल
एप्रिल फुल
३१ तारखेची दुपार होती. नुकतीच गार्गी शाळेतून घरी आली, आणि पत्र लिहायला बसली. पत्रात लिहिलेलं असतं, 'आम्ही उद्या १५ जण पुण्याहुन घरी येतोय, आणि जेऊन पुढे जायला निघायचं आहे'. सगळा स्वयंपाक तयार ठेवा." आणि पत्र अापल्या घरच्या पत्त्यावर पोस्ट केले.
दुस-या दिवशी सकाळी …
नीलांजनाच्या हातात ते पत्र पडतं. नीलांजना ते पत्र वाचते आणि आनंदून सगळे येणार म्हणून आवरा-आवर करू लागते, सगळी तयारी करते, पण तरीही कुणालाच आज १ एप्रिल आहे याच भान राहत नाही. अश्यातच दुपार होते. तरीही कुणी येत नाही. सगळे निलांजनाला विचारतात, ”तू पत्र नीट वाचल होतस न नक्की? सगळे आजच येणार होते न?”
नीलांजना म्हणते, ”हो मी दोन-तीनदा वाचलंय पत्र त्यांनी आजच येणार असल्याच सांगितलय.” सगळे संध्याकाळ पर्यंत वाट बघतात. शेवटी न राहाउन गार्गी म्हणते. ”आणा बर ते पत्र इकडे बघू जरा.” नीलांजना गार्गीला पत्र दाखवते तेव्हा गार्गी सगळ्यांना सांगते. ”सगळ्यांनी पत्र वाचलं पण हस्ताक्षर मात्र पहिला नाही. आणी आज किती तारीख आहे?”
नीलांजना म्हणते, ”१”
गार्गी विचारते, “आणि महिना?”
“एप्रिल!”
"मग आता समजल का सगळ्यांना, ते पत्र मीच लिहील होत. आज १ एप्रिल आहे. येssss! ”
हे ऐकून सगळे हसायला लागले आणि त्याच आनंदात सगळेजण जेवायला बसले. दुसऱ्याना हसवण्यात एक वेगळीच मजा असते नाही का?