Dhanshri Kaje

Others

2  

Dhanshri Kaje

Others

बहिणीसाठी एक पत्र

बहिणीसाठी एक पत्र

2 mins
138


प्रिय सुलेखा,

काल तुझा फोन आला होता तेव्हा जाणवल तू माझ्या पासून काही तरी लपवत आहेस. आपण तर बहिणींच्या आधी मैत्रिणी आहोत न हे कस विसरलीस तू अग लहान पणा पासून आपण एकमेकांशी प्रत्येक गोष्ट शेअर करत आलोय न मग यावेळी अस काय घडल जे तूला मला सांगताना भीती वाटत आहे. मला समजत तू आता मोठी झाली आहेस स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतेस पण तरी सुद्धा निर्णय घेत असताना आयुष्याच्या वाटेवर तू भरकटत जाऊ नयेसं एवढच वाटत बघ.

सुलेखा आपले निर्णय घेणं मोठी स्वप्न बघण कधीही चांगल पण निर्णय घेत असताना एकदा तरी मागचा पुढचा विचार करावा. आपल्या एका निर्णयानी आपले घरचे आपले लोक यांच्या वर काय परिणाम होईल याचा तरी विचार करावास. आपल आयष्य हे खूप अनमोल असत आपल्या आयुष्यात आपल्याला आपले पाय खूप जपून टाकावे लागतात. मला माहित आहे तू खूप समजदार आहेस विचारी आहेस पण लेखा आज तू जो मार्ग निवडला आहेस तो चुकला ग, तू भले ही मला नको संगुस पण मी तुझी बहीण आहे फक्त तुझ्या आवाजावरून सांगू शकते मी तुझ्या मनात काय सुरु आहे. म्हणून तर मला तुझी काळजी वाटते ग. तू अश्या एका वळणावर उभी आहेस जिथून खूप सारे मार्ग जातात पण तुला कळत नाही नेमका कोणता मार्ग निवडू... लहान आहेस न अजून म्हणून वाटत.

बरं जाऊ दे सगळ तू कशी आहेस? तिकडे सगळ ठीक आहे ना तुला आपल्या घराण्याचं नाव मोठं करायचं आहे हे कधीच विसरू नकोस. आमच्या सगळ्यांच्या तुझ्या कडून खूप अपेक्षा आहेत तुला त्या पूर्ण करायच्या आहेत आणि काही अडल तर तुला सावरायला ही तुझी मैत्रीण आहेच की तू कधीही माझ्याशी आपल्या मनातलं बोलू शकतेस तूच मला म्हणतेस न मी तुझी मोठी बहीण नाही तर तुझी मैत्रीण आहे. मग आपल्या या मैत्रिणीला आपल्या मनातलं सांगशील न.

आपली काळजी घे. खूप अभ्यास कर, तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर एक गोष्ट कायम लक्षात ठेव कुठलाही मार्ग निवडताना सगळ्यांचा विचार कर मग मार्ग निवड आम्ही सगळे तुझ्या पाठीशी कायम उभे आहोत. हे कायम लक्षात असू देत मैत्रिणी बनव काही तरी नवीन शिक पण आपण कुठे चुकत तर नाही न यावर ही लक्ष असू देत.

बाकी तू विचार करायला आपल चांगल वाईट बघायला समर्थ आहेसच हो की नाही.

काळजी घे.

तुझी बहिण

सारा..

 


Rate this content
Log in