Dhanshri Kaje

Comedy

3  

Dhanshri Kaje

Comedy

एप्रिल फुल

एप्रिल फुल

1 min
1.0K


३१ तारखेची दुपार होती . नुकतीच गार्गी शाळेतून घरी येते आणि पत्र लिहायला घेते. पत्रात लिहिलेलं असत “आम्ही उद्या १५ जण पुण्याहुन घरी येतोय सगळा स्वयंपाक तयार ठेवा आम्हाला लगेच पुढे जायला निघायचं आहे .”आणि आपल्या घरच्या पत्त्यावर पोस्ट करते .

दुसऱ्या दिवशी सकाळी...

नीलांजनाच्या हातात ते पत्र जात . नीलांजना ते पत्र वाचते आणि आनंदुन सगळे येणार म्हणुन आवरा-आवर करू लागते पण तरीही कुणालाच आज १ एप्रिल आहे याच भान राहत नाही . अश्यातच दुपार होते . तरीही कुणी येत नाही . सगळे निलांजनाला विचारतात .”तु पत्र नीट वाचल होतस न नक्की सगळे आजच येणार होते न .” नीलांजना सगळ्यांना हो म्हणते .”हो मी दोन-तीनदा वाचलंय पत्र त्यांनी आजच येणार असल्याच सांगितलय.” सगळे संध्याकाळ पर्यंत वाट बघतात . शेवटी न राहाउन गार्गी म्हणते .”आणा बर ते पत्र इकडे बघु जरा .” नीलांजना गार्गीला पत्र दाखवते तेव्हा गार्गी सगळ्यांना सांगते .”

सगळ्यांनी पत्र वाचल पण पत्ता मात्र पहिला नाही . आज किती तारीख आहे?” नीलांजना म्हणते .”१ ” गार्गी विचारते. “आणि महिना” सगळे “एप्रिल” गार्गी सगळ्यांना सांगते . “आता समजल सगळ्यांना ते पत्र मीच लिहील होत. आज १ एप्रिल आहे ” हे ऐकून सगळे हसायला लागतात आणि त्याच आनंदात सगळेजण जेवायला बसतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy