मोबाईलचे परिणाम
मोबाईलचे परिणाम


चिंटू, सोनी चला खूप झालं बरं का आता मोबाईल. शाळेतुन आल्यापासून नुसता मोबाईल घेऊन बसला आहात दोघे. न खाण्याची शुद्ध आहे न अभ्यासाची. काय येतो काय ५ मिनिटं हेच ऐकतीये सारखं पण येण्याचा काही पत्ता नाही. किती वेळ झाला बरं तुम्हाला अभ्यासाचं काही आहे की नाही. चला आता अभ्यासाला बसा बरं दोघ.
अहो ऐकलत का, काय करतायेत एकटेच खोलीमध्ये देव जाणे. आपण इथे मर मर करणार आणि ह्यांना मात्र काहीच नाही. आलात या काय करत होतात एकटेच खोलीत. चिडू नाही तर काय करू हो माझी कुणाला कदरच नाहीये. मी सगळ्यांसाठी इतकी राबते पण कुणाला त्याचं काही आहे का कुणी ऐकत का माझं. आता हीच मुलं बघा आपली इतके आवाज देतीये दोघांना पण यायचा पत्ता आहे का दोघांचा. आता तुम्हीच आवाज द्या त्यांना.
अहो काय करताय तुम्ही त्यांना आवाज द्यायला सांगितलं होतं मारायला नाही आलात दोघ रडत रडत पहिलेच ऐकलं असत तर जाऊ द्या आता डोळे पुसा चला दूध घ्या आता.