एकाकी :भयकथा
एकाकी :भयकथा
नसरापूर एक गाव होतं. त्या गावात मिशाजीरावांचा वाडा चर्चेचा विषय. दहा रूमचा वाडा, तेवढ्याच दुपटीने खिडक्या, अवाढव्य वाडा पाहायला लोक आवर्जून येत. तो वाडा गावापासून लांब होता.काही वर्षातच मिशाजीराव जग सोडून गेले, छोट्या दिनूला आणि बायकोला सुमनला सोडून. एवढ्या मोठया वाड्यात आई आणि दिनू राहत होतें. दिनू छोटासाच होता. बाबांनंतर त्याच आईवर खूप प्रेम होतं. आई जगण्याची आशा होती. लहान असणारा दिनू आईची खूप काळजी घेत. सुमनला पण हा वाडा नवऱ्याच्या पाठी खायला उठत. दिनू शाळेतून आला की आई आई करून सगळं घर डोकयावर घेई.
दिनूचं आईवर विलक्षण प्रेम. गावातील लोक ही त्याच्या आईवरील प्रेमाच कौतुक करत.
त्याची आई शारीरिक व्याधीनी ग्रासली होती. ती दिनूला लग्न कर म्हणून सारखं मागे लागत. दिनू तिला तू बरी झाली की आपण मुलगी पाहू असं तो म्हणत.दिनू आईला जीवापाड जपत. आईची काळजी घेत असे.
वाढलेल्या आजारपणाने दिनूची आई जग सोडून निघून गेली. दिनू एकटा राहिला लागला. त्याची मानसिक स्थिती आता बदलत चालली होती. तो एकटाच वाड्याच्या रूममध्ये जाऊन बडबडत राहत असे. वाड्याची रोषणाई क्षणात निघून गेली.
आईची इच्छा होती त्याच लग्न करून देईच, पण ती इच्छा अर्धवट राहिली. तो मुलगी पाहायला गेला. सुनिता त्या मुलीचं नाव. ती शिकलेली नव्हती पण उंच, सडसडीत बांधा, गोरीपान, हुशार असणारी सुनिता गरीब घरातील होती. वडील शेतकरी होतें. दिनूचा वाडा, जमीन, नौकरी पाहून त्यांनी दिनूशी लग्न लावून दिले.
सुनिता सासरी आली. एवढा मोठा वाडा तिला खूप आवडला. काही दिवसातच तिला वेगवेगळे वाड्यात भास होऊ लागले. पांढरी साडी नेसणाऱ्या बायका अचानक समोर येत आणि गायब होत. तिची घाबरगुंडी होत होती. वाडा वर्दळीपासून दूर असल्याने सुनिता घरात एकटीच राहत असे. तिच्याशी बोलायलाही कोणी नव्हतं.
त्यात एक गोष्ट जाणवली ती म्हणजे एका रूमला नेहमी कुलूप असत. तिने दिनूला विचारलं तर त्याने तू त्याकडे लक्ष देऊ नकोस असं तो म्हणाला. दिनू दिवसभरात जेव्हा घरात असे तेव्हा त्या रूममध्ये जाऊन बोलत राही. सुनीताला नेहमी प्रश्न पडे हा कोणाशी बोलत असेल.
सुनीताला मात्र त्याचं वागणं कळत नव्हतं. हा असा का वागतोय...?
तिला प्रश्न पडत असे. तीने न राहवून त्या खोलीत बघायचं ठरवलं. नवऱ्याच्या परस्पर तिने रूममध्ये पहिलं तर एक बाई पाठमोरी खुर्चीवर बसली होती. त्या रूममध्ये उग्र वास सुटला होता. त्या बाईला पाहून ती क्षणात घाबरून गेली, तुम्ही कोण इथं काय करताय...? तर तिने अग ओळखलं नाही का...? मी दिनूची आई आजारामुळे मी रूमच्या बाहेर पडतच नाही. दिनूने सांगितले नाही का तुला ....? ते राहू दे...! पुन्हा मला न विचारता रूममध्ये येऊ नकोस. दिनूला समजलं तर त्याला खूप राग येईल. जा तू इथून दार ओढून घे.
सुनिता प्रचंड घाबरली होती. हे प्रकरन भलतंच असल्याच तिच्या लक्षात आलं.
तिने संध्याकाळी नवऱ्याला विचारले तर त्याने जोरात तिच्या गालात लावून दिली. तू त्या रूममध्ये मला न विचारता का गेलीस...?
सुनिता प्रचंड घाबरली, तिला काय आहे हे प्रकरण समजत नव्हतं.
तिने न घाबरता हे प्रकरण काय आहे नक्की पाहायचं ठरवलं. रात्री एक वाजता दिनू रूमच्या बाहेर पडला.
सुनीताने झोपण्याचं नाटक केलं होतं. जरा वेळाने तीही त्याच्या मागे बाहेर पडली. दिनूच्या हातात तिला काही तरी दिसत होतं. तिने निरखून पाहिले तर त्याच्या हातात साडी, बांगड्या, तिच्या सासूबाईंच्या वस्तू होत्या. तो त्याच वाड्याच्या रूमच्या दिशेने चालला होता. तो रूममध्ये शिरला आणि दार लावून घेतलं. सुनीताला आता आतमधील काहीच दिसत नव्हतं. तिला रूमची छोटी खिडकी दिसली ती तिने उघडली. आतमध्ये आता सगळं तिला दिसत होतं.
आतमधील दृश्य पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला. आतमध्ये दिनूने साडी नेसली होती. स्त्रीयांसारखा तो दाग दागिने घालून तो नटला होता. त्याच्या समोर एक कुजलेला सांगाडा होता. त्या सांगायड्याशी तो बोलत होता, हसत होता, रडत होता. सुनीता हे दृश्य पाहून सुन्न झाली. तिला हे काय चालय काही समजत नव्हतं. सुनीताच्या मागे तिला कोणीतरी असल्याचे जाणवले तिने मागे ओळून पाहिले तर दोन स्त्रिया पांढऱ्या साडीत तिला इथून लवकर पळून जा सुनिता अशा बोलत होत्या.
बाहेर कोणीतरी असल्याचे दिनूला जाणवलं. त्याने दार उघडून पहिलं तर कोणीही नव्हतं. तो त्याच्या बेडरूममध्ये पहायला आला. तर सुनीताने झोपण्याचं नाटक केलं होतं. दुसऱ्या दिवशी सुनिता उठली तर,तिला वाड्याचे सगळे दरवाजे बंद दिसलें. तिला संशय खरा ठरला होता. दिनूला तिच रात्री रूमच्या बाहेर असल्याचे समजलं होतं.
तोपर्यंत दिनू तिथं आला, किती वेळा सांगितलं तुला तू रूमकडे येऊ नकोस. दिनूने तिच्यावर चाकूने हल्ला चढवायला सुरुवात केली. मी तुमची बायको आहे असं म्हणत ती जीव मुठीत घेऊन पळत होती.
दिनूचा आक्रलविक्राळ चेहरा पाहून ती प्रचंड घाबरली होती. एका दरवाजाच्या पाठीमागे ती लपून बसली. ती जोरात धापा टाकत होती. त्या ठिकाणी त्या पांढऱ्या साडीतील आत्मे तिला पुन्हा दिसले . सुनिता पळून जा इथून तो तुला मारेल अशा विनवानी करत होतें . आमचा घात झाला तसा तुझा होऊन देऊ नकोस. त्या बायका पुन्हा दिसेनाशा झाल्या. सुनीताला त्या नक्की कोण होत्या समजत नव्हतं. तोपर्यंत दिनू दारापाशी आला तिने धाडकन दार ढकललं,तसं दिनूच्या डोक्याला जोरात लागून रक्त वाहू लागलं होतं. तो जाग्यावरच बेशुद्ध झाला. तिने कसलाही वेळ न लावता पोलीसस्टेशन गाठलं. घडलेला प्रकार पोलीसांना सांगितलं. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं.
खूप मारल्यावर दिनूने तोंड उघडले. त्याची आधी दोन लग्न झाल्याचे समजलं. तो आईच्या गेल्यावर इतका एकलकोंडी झाला होता की, तो मनोरुग्ण झाला होता. आईच्या प्रेताची त्याने विल्हेवाट ही लावली नव्हती. त्याच्या आईच्या सांगाड्याची त्याने विल्हेवाट ही लावली नव्हती . तो वाडा सुनसान ठिकाणी, असल्याने कोणाच्याही लक्षात आलं नाही. तो त्या आईच्या प्रेताशी रोज बोलत असे.त्या रूमची चावी फक्त त्याच्याकडे असे. त्यानंतर तो आईसारखं साडी नेसन, बोलणं, नटण अशा गोष्टी करू लागला. तो मानसिक रोगी झाला होता त्याने दोन जीव घेतले होतें . तिसरी सुनिता होती.जी वाचली होती.ती चाणक्ष बुद्धिमुळे त्यातून सुटली. पहिल्या दोघींना जेव्हा हा मनोरुग्ण असल्याच समजल्.तेव्हा दोघीन वरही चाकूने वार केला आणि त्यांचा जीव घेतला. त्याच रूममध्ये दोघींना ठेवलं होतं.सुनिता हुशार निघाली त्यामुळे दिनूच्या हल्ल्यापासून वाचली होती. दिनूच्या पहिल्या दोन बायकांचे आत्मे त्याचं वाड्यात घुटमळत आहेत. आज सुनिता मुळे दोघींच्या आत्म्याला शांती मिळेल. अशा प्रकारे तो वाडा आत्म्यानपासून मुक्त झाला.
