swati Balurkar " sakhi "

Romance

1.9  

swati Balurkar " sakhi "

Romance

एकाच या जन्मी जणु. . . . .

एकाच या जन्मी जणु. . . . .

9 mins
2.0K


रेवती घरी आली .

लॅचने दार उघडलं.

आत आली , दार लोटलं आणि दारालाच पाठ लावून उभी राहिली .

जणू कुणी तिचा पाठलाग करतंय.

इतकावेळ कृत्रिम हास्याखाली दाबलेला हुन्दका बाहेर पडला.

बांध फुटावा तशी रेवती रडू लागली.

तिचा आवाज वाढला तरी घरात ऐकणारं कुणी नव्हतं .

सर्वस्व गमावल्यागत किंवा खूप मौल्यवान वस्तु हरवल्यावर असते तशी अवस्था झाली होती तिची.

एका बर्थडे पार्टीतून ती परतली होती.

इच्छा असुनही नीरजशी बोलता आले नव्हते.

त्याची बायको सतत त्याच्यासोबत सावलीसारखी वावरत होती.

निमा , नीरजची बायको रेवतीचीही मैत्रिण होती. म्हणजे क्लायंट अॅक्चुअली!!

रेवती नीरजला टाळत होती आणि नीरज लांबूनच तिला न्याहाळत होता.

औपचारिक चौकशीच्या पुढे तो बोलला नाही आणि ती ही तेवढंच बोलून बाजुला सरकली.

३ तास एका छताखाली असुनही त्यांच्यात संवाद घडला नाही.

रेवती बाहेर खूप नॉर्मल दाखवत असली तरीही मन आक्रोश करत होतं !

नीरजला या न बोलण्याच्या बंधनात तिनेच अडकवलं होतं आणि तो काटेकोरपणे पालन करीत होता.

निमा रेवतीशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होती. नीरज बाजुलाच बसला होता पण तो गप्पांत सामिल झाला नाही.

"माझ्याशी पुन्हा संपर्क ठेवू नकात . मला सुखाने जगु द्या!" अशी कळकळीची विनंती तिनेच त्याला केली होती !

रेवती हॉलमधे लावलेल्या आलोकच्या फोटोकडे एकटक पहात रडू लागली. हा असता तर असा त्रास मला झाला नसता. आपला नवरा तो आपलाच असतो शेवटी.

कुणी काहिहि म्हणु देत पण अजुनही भारतात कुटुंब व्यवस्था टिकुन आहे. लग्नाचे बंध सहसा तुटत नाहित.

भांडण होऊ दे नाहीतर अजुन काही, पण नवरा बायको एकमेकांना सोडत नाही.

कुणी "वो" मधे आला किंवा आली तरी त्या व्यक्तिला तोडणं सोप असतं. पण पती पत्नीला तोडणं तेवढंच कठिण.

मंगळसुत्रात ताकद असते हे तर ‍१००% खरं!

आलोक , रेवतीचा नवरा ५ वर्षांपूर्वी गेला. उत्तराखंडच्या प्रलयात लोकांना मदत करायला गेला आणि एका दुर्घटनेमधे तोच गेला.

रेवतीने छोट्या अर्णव साठी स्वतःला सावरलं .

आपल्या मानसशास्राच्या अभ्यासातच करिअर करायचे म्हणून पुढचे कोर्स केले आणि समुपदेशन (काउन्सिलिंगच्या) या क्षेत्रात आली.

वकील मैत्रिण आणि वकील काकांच्या मदतीने केसेस मिळू लागल्या . रेवती फॅमिली मॅटर आणि डिवोर्स केसेसवर काम करू लागली.

३-४ वर्षाँत तिने छान नाव आणि पैसा कमावला. तिचा शांत आणि सहनशील स्वभाव तिची ताकत बनला. दुसर्‍यांचं ऐकुन घेण्याचा गुण तिला वरदान ठरला.

अर्णव शाळेत जात होता. माहेरच्या जवळच घर घेवून ती वेगळी रहात होती. आई -बाबा अर्णव चं सगळं बघून घेत होते.

आता ती मोकळा श्वास घेत होती. स्वतःसाठी जगत होती.

८-१० महिन्यापूर्वी 'नीरज' तिच्याकडे क्लाइंट म्हणून आला होता.

बायकोच्या तिरसट आणि संशयी स्वभावामुळे त्याला तिच्यापासून घटस्फोट हवा होता.

रेवतीला निमा साधी सरळच वाटली पण ती खूप पझेसिव्ह वाटली नवर्‍या बद्दल !

या प्रक्रियेत दोघांना जवळ आणण्यासाठी रेवतीने सगळे प्रयत्न केले .

निमाची आणि तिचीही छान मैत्री झाली.

दोघांचा घटस्फोट टळला. गैरसमज दूर झाले.

पण या दरम्यान सतत भेटीगाठी आणि फोनवर बोलणे यामुळे एक वेगळीच गोष्ट झाली.

नीरज रेवतीत गुंतत गेला.

रेवतीला हे कळालं नाही.

ती त्या नात्याला मैत्री समजत राहिली आणि तो एकतर्फी प्रेम! ❤

एकदा दोघे कॉफी घेत होते आणि अचानक नीरज म्हणाला होता "तू मला अाधी का नाही भेटलीस रेवा?"

"म्हणजे ?"

"मला निमा भेटण्याआधी "

"अहो पण.....!"

"तुला माहित नाही ,माझ्या मनात तुझ्याबद्दल किती श्रद्धा आहे!"

"काय बोलताय नीरज तुम्ही.? थँक्यू ! पण बस , मनाने इथेच थांबा तुम्ही"

"कुठे थांबायचं हे तू कशी सांगणार ? मी अलरेडी खूप लांब अालोय !!"

"मी तुमचा संसार वाचवण्यासाठी किती धडपडतेय अन तुम्ही!! "

"रेवा, खरं सांग, तुला मा़झी कंपनी आवडत नाही? माझे विचार पटत नाहीत? मी माणूस म्हणून इतका वाईट आहे का गं कि तू मला दूर लोटावस? "

नीरज ने तिचे दोन्हीं हात हातात घेतले.

रेवाने हात सोडवण्याचा प्रयत्न केला नाही.

तिने प्रतिसाद दिला नाही पण विरोधही केला नाही.

"नीरज प्लीज!! पण निमा. . ?. "

"रेवा , तू काळजी करू नकोस . निमा माझी जिम्मेदारी आहे . मी तिला त्रास होऊ देणार नाही. "

"पण हे बरोबर नाही " ती खूप गोंधळली होती.

"काय बरोबर- चूक घेऊन बसलीस तू. ? कुणीतरी आपल्याला आवडतं हे त्या व्यक्तीला सांगणं चूक कसं असू शकतं ?"

"नीरज, तुम्ही विवाहित अाहात. " रेवती खूप कळवळून म्हणाली.

रेवतीकडे कारण नव्हतं . कारण नीरजची कंपनी, त्याच्यासोबत घालवलेला वेळ, त्याचं बोलणं -वागणं रेवतीला खूप आवडायचं .

" विवाहित असण्या- नसण्याने मला काहीच फरक पडत नाही. अविवाहित माणसालाच कुणीतरी आवडायला पाहिजे असा नियम कुठे अाहे का तुमच्या मानस शास्त्रात??"

रेवती मोठ्यांदा हसली. "काहितरीच बोलता तुम्ही!"

"मी आहे. बस्स आहे तुझ्यासोबत .!! हे लक्षात ठेव .मी तुझं ऐकणार . तुला त्रास नाही होऊ देणार . .अन् तुझ्या शब्दाबाहेर मी नाही. "

"हो का साहेब. ? कॉफी थंड झाली तुमच्या विश्लेषणात.!"

रेवतीला हे सगळं खूप भारी वाटत होतं. मनात खूप आनंद होत होता.

"जाने दो यार. मॅडम साठी दुसरी मागवतो. " नीरज ने पुन्हा वेटरला बोलावलं होतं.

हे जास्त सहज होत गेलं . रेवती खूप आनंदी रहात होती. स्वतःबद्दलचा विश्वास वाढला होता. सतत खुश रहायची.

नीरज ही भारावल्यासारखा वागत होता.

त्याला खूप हलकं हलकं वाटत होतं.

तो घरी मुलीसोबतही मस्त वागत होता.

निमासोबतही सहज रहात होता. नेहमी बाहेर जाणं . फॅमिली सोबत आऊटिंग वगैरे बरंच करायचा.

पारिवारिक संबंध छान झाले होते.

रेवतीचा प्रयत्न सफल झाला होता. त्यांचा घटस्फोट टळला होता.

रेवती आणि निमासोबत तो छानच बॅलन्स करत होता.

एव्हाना रेवतीच्या लक्षात हे आलं होत कि नीरज च्या मनात रेवतीबद्दल शारिरीक आकर्षण कमी आणि मानसिक गुंतागुंत जास्त आहे.

तो नेहमी म्हणायचा कि वेव्हलेंथ जुळली पाहिजे, शरीरसुखाचं काय ते कुठेही मिळवता येतं!

दोघांत छान नातं फुललं होतं. आपापले व्यावसायिक ताण सांभाळून , वेळ काढुन ते भेटायचे , बोलायचे.

एक दिवस निमाने रेवतीला फोन केला आणि सांगितले कि 'नीरजचं कुणासोबत तरी अफेअर आहे.

तिला नाव माहित नाही पण काहितरी नक्की अाहे.

एका वेगळ्या नंबरवरून तो कुणाशीतरी बोलतो.

असा इतका खुश आणि छान तो कधीच नव्हता दहा वर्षांत!! नक्की कुठेतरी पाणी मुरतंय'

रेवती विचारातच पडली.

पुर्वी निमा शंका घ्यायची तेव्हां नीरजचं बाहेर तसं काहिच नव्हतं . पण आता?

आणि हे खरं होतं , नीरजने दोन वेगळे सिमकार्ड आणि फोन घेतले होते, रेवतीला व त्याला बोलण्यासाठी.

सिक्रेट नावाने सेव्ह केले होते.

पण आता निमाला नीरजबद्दल काहितरी कळाले होते.

ती सावध झाली होती.

पण तिचा रेवतीवर संशय नव्हताच. रेवतीतर तिला मदत करीत होती, असा तिचा पक्का समज होता.

रोज निमाकडून नीरजच्या तक्रारी ऐकुन रेवती सहजच म्हणाली, 'तू नीरजला अन् त्या बाईला एकदा झाड म्हणजे हे सगळे थांबेल. '

खरंच एक दिवस निमाने नीरजला खूप झाडून काढलं.

मग शिताफिने तो सिक्रेट फोन नंबर घेतला आणि रेवतीला फोनवर खूप बोलुन काढलं.

अॅक्चुअली निमाने फोनवर पलिकडे कोण अाहे याची दखलच घेतली नाही. फायर केलं अन् फोन ठेवला .

सगळं माहित असुनही त्या क्षणी मात्र रेवतीला खूप रडू आलं . ती विचारात पडली- ---------

'इतकी प्रसिद्ध कौन्सिलर असुनही आपण एवढे खालच्या थराचे बोलणे का ऐकुन घेतले ?

परिवार जोडणे हे माझे मूळ काम आहे आणि कुणाचे तुटणारच असेल तर शातता पूर्वक डिवोर्स व्हावा यासाठी मी काम करते. मग हे सर्व काय आहे?

सतत कुणाचे तरी काहितरी हिसकुन घेतोय असे का वाटायला लागले आजकाल?

जी व्यक्ति आपल्या हक्कांची नाही, तिच्या साठी का हा आटापिटा ?

निमासारख्या सरळ बाईचं घर मोडण्याचा काय अधिकार आहे आपल्याला ?'

सामाजिक दृष्ट्या आपण चुकीचं वागत आहोत, हे लक्षात आलं.

बस्स !! दुसर्‍या क्षणी तिने ठरवलं ""हे आता बंद. ! बंद म्हणजे बंद!"

तिने नीरजला मेसेज केला आणि फोन करूनही बजावले कि "माझ्याशी पुन्हा संपर्क ठेवू नकात . मला सुखाने जगु द्या!"

तो म्हणाला "ठिक आहे. मी तुझ्या शब्दाबाहेर नाही."

बस्स इतकंच!

आणि सगळं थांबलं , आपोआपच. !!

फोन, मेसेज, भेटी ,गप्पा, अाउटिंग, शॉपिंग , सगळच.

निमाने पुन्हा रेवतीला फोन करून सांगितले कि कसे तिने नीरज आणि त्या बाईला झाडले वगैरे.

आज एका कॉमन मैत्रिणी कडे बर्थडेची पार्टी होती. तब्बल ४ महिन्यांनतर ते तिघेे भेटले होते.

आलोकच्या फोटोला मनसोक्त पाहिल्यानंतर रेवती भानावर आली.

येत्या पंधरा दिवसात ती नागपूरला शिफ्ट होणार होती. यातलं नीरजला काहिच माहित नव्हतं . गेल्या महिनाभरात त्यांचा काहिच संपर्क नव्हता .

अाई -बाबा त्यांना मूळ गाव जवळ पडेल म्हणून नागपूरला शिफ्ट होणार होते.

दोन वर्षांपूर्वीच बाबा रिटायर झाले , पण रेवतीचा विचार करून इथेच राहिले होते.

आता वकील काकांच्या मदतीने ती नागपूरला पण हेच काम करणार होती.

आता तिने निर्णय घेतला होता.

आता तिला सोपं जाईल असं वाटलं !!

आज मनात साचलेलं हे सारं कुठेतरी बोलावं असं वाटलं , रेवतीला.

नीरजलाच बोलावं का?

नको पुनः संपर्क नको.

त्यापेक्षा आपला कागद पेन बरा!! असा विचार करून तिने डोळे पुसले.

फ्रेश झाली. आणि तिच्या टेबलजवळ बसली.

मग तटस्थ पणे तिच्या आणि नीरजच्या नात्याबद्दल विचार करू लागली.

मग स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारू लागली आणि तिला वास्तविकतेची जाणीव झाली.

ती काही कवयित्री किंवा लेखिका नव्हती ,पण मनातली सगळी भडास बाहेर काढण्यासाठीच ती लिहिणार होती.

तिने रायटिंग पॅड समोर घेतला, पेन पकडला अन् अनाहूतपणे लिहायला लागली. .

" हे प्रेम म्हणजे गुंतणारं ह्रदय. . !

ही मनाची गुंतागुंत तशी कठिणच !

गुंता सोडवावा, असे वाटणाराही गुंततो.

गुंत्याचं सुरुवातीचे किंवा शेवटचे टोक

कधीच सापडत नाही. . .

हा गुंता वाढत जातो, ते गुंतणं चालत राहतं

आणि एकदमच त्याचा शेवट होतो. . !

शेवट झाला म्हणजे ?

ते प्रेम नव्हतं का ??

आपलं ते फोनमधे कितीतरी वेळ रमणं . .

एकमेकांना पाहण्यासाठी ते आपलं तरसणं. .

भेटल्यावरची तुझ्या डोळ्यातली ती चमक,

अन् तुझी काहीतरी भव्य -दिव्य करण्याची धडपड !

प्रत्येक वेळी मला काहितरी देण्याची तुझी इच्छा . .

आणि तुझ्याकडून काहीही न घेण्याचा

माझा अट्टाहास प्रत्येक वेळी!

देवाणा- घेवाणा शिवायच नातं टिकवायचं

म्हणत होते का रे मी ?

एकतर्फी होती का रे ती मैत्री ?

किंवा मैत्री पलिकडचं काहितरी. .

तेव्हां तू गुंतला होतास माझ्यात, मान्य !!

पण मी प्रतिकारही केला नव्हता .

आता मात्र ती विरहाची जाणीव नाहीकी

भेटल्यावरचा तो आत्मिक आनंदही नाही.

काहितरी हरवलंय हे नक्की.

तसं काहिच राहिलं नाही आता तुझ्या -माझ्यात!!

का कुणास ठाऊक???

असा अंत झाला या नात्यांचा !

वाहणारा झरा आटतो ना , तसंच काहिसं !

कोरडेपणा भासतोय वागण्यात अन् बघण्यात!!?

तुझं ते मला भेटण्यासाठी कितीही लांब येणं ,

आणि माझं आतुरतेने, तुझी वाट पहाणं !

भेटल्यावर तुझं सतत माझ्या डोळ्यात बघणं

आपलं ते कितीतरी वेळ फोनवर बोलणं!

ती अजब बेचैनी आणि माझं फोन कट करणं- -

अन् तुझं जिद्दीने पुन्हापुन्हा लावणं!

तुझं नाव ऐकल की मनात होणारी गुदगुली. .

सगळंच हरवलंय आता !

फक्त औपचारिकता शिल्लक राहिलिय. .

फळा फुलाचा बहर असतो ना रे

तसं झालंय का आपल्या नात्याचं?

तो बहार संपलाय बहुतेक !

निसर्गाचा बहर पुन्हापुन्हा येतो रे पुढच्या वर्षी,

पण नात्यांना दुसरा बहर नसतो बहुतेक!

तुझं परक्यासारखं भेटणं आणि माझं दुर्लक्ष करणं- -

असू दे !! आता हेच योग्य वाटतंय!

___तुझी मैत्रिण

रेवा

रेवतीला खूप हलकं वाटलं . अगदी नीरजशी बोल लंयासारखं वाटलं .

ती फ्रेश झाली. नॉर्मलला आली मग तिला वाटलं कि या नात्याला छानसं वळण देऊन सोडू या.

हे पत्र पाठवावं का?

पण कसं ? मग निमाला कळेल.

आता नको.

तिचा माझ्यावर विश्वास आहे तो टिकला पाहिजे.

पण नीरजला भेटताही येणार नाही.

मीच नको म्हणालीय.

काय करावं ?

व्हाट्स अप आहे ना तो रिस्पॉन्स देईल.

रेवतीने मेसेज केला "हाय"

रिप्लाय आला" 🙂 स्माईली"

"पत्र पाठवतेय, वाचून डिलिट करा"

"🙏👍"

आणि तिने लिहिलेल्या पत्राचा फोटो पाठवला.

बराच वेळ काहिच प्रतिक्रिया नाही.

रेवती- " वाचलं का नीरज? मी बरोबर करतीय ना?"

"😞😞👌"

" मी नागपूरला शिफ्ट होतीय फॅमिली सोबत.! तिथेच प्रॅक्टिस करणार"

"🤔😖👍"

"तुमच्यासोबतचे दिवस कधीच विसरणार नाही.

थँक्स फोर एवरीथिंग!"

"😊😇"

"नीरज , बालपण वेगळं, कॉलेजचे दिवस वेगळे, लग्नानंतरची ५ वर्षे वेगळी, त्यानंतरचे स्टँड होण्याचे दिवस, आणि अापले मैत्री पूर्ण प्रेमाचे दिवस---- जणु इतके जन्म जगले मी."

"😊👍👏👏"

"आपण माणसं आहोत, नीरज माझीही चूक झाली. देवाने चूक सुधारण्याची बुद्धी दिली, म्हणून त्याचे आभार.. आणि तुम्ही समजून घेतले म्हणून तुमचे आभार. ! एकाच जन्मात आता फिरून जन्मावं म्हंणते !

असाच अजुन एक नवीन जन्म! मग जाऊ ना नागपुरला?"

"😊✋👍"

" माझी चूक झाली, नीरज ! मी माझी शपथ मागे घेते . तुम्ही बोला"

"All the best dear Rewa!!! I am always with you. Thanks for everything🙏 ! you are right👍

" friends forever Rewa n Neeraj!"👫

आणि रेवती शांतमनाने पुढचं आयुष्य जगण्यासाठी सज्ज झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance