Meenakshi Kilawat

Tragedy


3.3  

Meenakshi Kilawat

Tragedy


एक स्वयंप्रकाशित निखळतां तारा

एक स्वयंप्रकाशित निखळतां तारा

6 mins 600 6 mins 600

हा सु:खादु:खाने भरलेला संसार आहे.किती लोभस वाटणारा हा संसार,पण दरदिवशी किती करूण कहाण्यांना जन्म देतो हा संसार. विचार केला तर सुखी संसार आहे,नाहीतर अगदी भयंकर रूपाने बरबटलेला अथाह सागर आहे.

       आमच मोठ कुंटूब पांच भाऊ तीन बहीनी सर्वात मोठ्या दोन बहीनी ,माझ्यापेक्षा बारा तेरा वर्षानी मोठ्या होत्या,माझा जन्म झाला तेंव्हा दोन्ही बहीनींचे लग्न झालेले होते. त्याकाळी म्हणे असच व्हायचंय. आईचे अन लेकीचे कधी सोबत बाळंतपण ही होत असे. तरी आई म्हणे! मी माझ्या मुलींचे विवाह बारा वर्षानंतर केले ,बाकीच्यां लोकांनी तर पाच ,सात वर्षातच विवाह केले. इतक्या लहाण वयात विवाह करून ,आईबाबांना आपल्या जवाबदारीतून मुक्तता मिळायची. परंतू इतुक्या लहाण वयात आईबाबाला सोडून जाणे, तारा दिदीला कठीन झाले होते. या संसारातून तिने खुप कष्टाने वाटचाल केलेली. दिदीचे संंपूर्ण लक्ष खेळण्या बागडण्यात असायचे. तश्यावेळी विवाह योग्य नसायचा शिक्षण ही नावालाच झालेले.अश्या परीस्थितीत ती लहनगी तारादिदी आईबाबास पत्र लिहिते ती माझी मोठी दिदी होती. त्या पत्राचा मजकूर थोडक्यात लिहिते. 

    "आई मी तूझी लाडकी लेक होती ना ? मग मला असे का गं तू दूर केलेस? मला तुम्हा सर्वांची खुप खुप आठवण येते.बाबाची,दादाची,आजी-आजोबाची , आपल्या घराची,गावाची जिथे मी लहानाची मोठी झाली , माझ्या जीवलग मैत्रीनिंची,माझ्या शाळेची, मला प्रत्येक वस्तूची आठवण येते,मी सासरी येतांना वळून बघितले होते, साऱ्यांच्या डोळ्यात अश्रृ होते ,गुलाबाने ही आपली मान खाली टाकली होती.जणू मला मोठ्या मनाने निरोप देतो आहे."

      "माझ घर म्हणत होते मी आजवर, ते घर आज माझ्यासाठी परके झाले.आणि ज्यांना मी कधीच पाहिले नव्हते तिथे मी येवून वसले ,ही कसली ग आई रीत परंपरा ,या हिंदू संस्कृतीचे नियम ? हे नियम मुलींसाठीच का आहेत, हा नियम मुलांना कां लागू होत नाही ,त्यांना आपल हक्काचे घर कां नाही सोडावे लागत? आम्ही काय वस्तू किंवा जनावर आहोत,"

 "आंम्हा मुलींनाच सासरला येवून संसार करावा लागत असतो. सार सहन करून दिवस काढावे लागत असतात. असे कोणते पाप आमच्या हातून घडत असते? वरून आई तूझी शिकवण माझ्या चांगलीच लक्षात आहे ,आई मी तूझी लाडाची लेक ना! मग तू कीं कन्यादान केलय माझ ? मी काय गाय आहे,किंवा प्राणी आहे.मला का तू दान समजून दिले आहे "? 

   "किती करूण विचारना केली होती तारादिदीने,"

आपल्या पत्रात पुन्हा लिहीते दिदी ! 

    नाही आई तूला माझ्या बोलण्याचा राग येईल पण "हे कन्यादान नको वाटते ग मला," तुझ्या रक्तमासाची मी तूझी लेक" अशी दानात देणे यौग्य आहे कां?" काय उत्तर देणार आई ,अश्रृ ढाळण्या व्यतिरीक्त काय होते तिच्या हातात.

    माझ्या तारादिदीचे जीवन सतत विवंचनेत गेलय. पतीच्या कमी पगारात भागत नाही म्हणुन ताईने अनेक काम केले ,विवाहानंतर ग्रज्युएशन पर्यंत शिक्षण घेतले. शिवन कर्तन करून आपल्या संसाराला हातभार लावला.नंतर इतर मुलींना स्वता: प्रशिक्षण देत गेली. सरकारमान्यता मिळवून प्रशिक्षण केंद्र स्थापित केलय. पतीपत्नी एकदुसऱ्याचे पुरक असल्यामुळे ,त्यांचा संसार व्यवस्थीत व निटनेटका दिसायचा.अथक मेहनत करून आपल्या संसाराला हातभार लावला ,तीन मुलांचा सांभाळ करून जिल्ह्याच्या ठिकाणी छोटेखानी तीन रूमच घर उभारलय . मुलांना चांगल शिक्षण दिले. मोठा मुलगा इंजिनिअर झाला .दुसरा मुलगा डॉक्टर झाला.मुलगी एम.एस.सी. झाली.आता तारादिदीचे सुखाचे दिवस आले होते ,चारही कडून लक्ष्मीची कृपा होती.आताशी मोठा बंगला घेतला होता. संसार कसा दृष्ट लागण्यासारखा भरला होता.

       जिल्ह्याचे ठीकाण असल्यामुळे चारही दिशेने येणारे जाणारे पाहूने मित्र मंडळी सारखी वर्दळ चालूच असायची.अर्धरात्री,पहाटे, सकाळी कधीपण पाहूने येत असत.तेंव्हा तारादिदी हसून स्वागत करायची, तिच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम टिकून रहायचे. ताई मुळातच खुप सुंदर होती,तिच्या खुल्या स्वभावाने व सांमजस्याने, सर्व नातेवाईकांचा दिदीवर विषेश लळा होता.ताईची कधीही कोणावर नाराजी नाही की रूसने नाही. तब्बेत जर दाखवायची असली तर पेंशंट आधी ताईकडे यायचा,मुलगा डॉक्टर होण्याआधीच कोणत्या हॉस्पिटलमध्ये भरती करायचे विचारपूस रहायची व पेंशंटसाठी ताई डबा करून पाठवायची , पुन्हा काही असल नसल ही बघायची, तारादिदीच्या सहनशिलतेला सर्वच मनापासून दाद द्यायचे. 

        हे सर्व हाताळत असता ती स्वता:कधी बिमार झाली ,हे कोणाच्याच लक्षात आल नाही.तीला कँसर सारख्या भंयकर रोगाने पिडीत केले. डोक्यात तिला खुप यातना होवू लागल्या ,तेंव्हा तऱ्हेतऱ्हेच्या टेस्ट केल्या गेल्या. हॉस्पिटलमध्ये निदान झालय, कित्येक औषधी घेतल्या ,डोळ्यात अश्रृ घेवून सर्वांनी तारादिदीची खुप सेवा केली.

    सारखे ऑपरेशन करून ती तारादिदी गोंधळली होती. केमोथेरपी व अनेक तपासण्याने ती खुपच दु:खी व कमजोर झाली होती. अश्यातच ताईने मोठ्या मुलाचे आणि मुलीचे विवाह माझ्या समोर कराव ,असा हट्ट धरला ,मुलगा प्रकाश शिकून एरीगेशन मधे नोकरीला लागला होता.चांगले स्थळ पाहून सुनबाई रेनुकाला घरात आणले. रेनुका खुपच समजदार होती.सारी सासरची धूरा तिच्यावर येवून पडली. जवाबदाऱ्या तिने सांभाळल्या, तिने माहेर समजून तारादिदीची औषध देण्यापासून सार सारा हसत केले. वर्षात नातू झाला.दिदी म्हणायची!मला नाही मरायच इतक्यात.

      त्यावेळी ताईची वय फक्त ४४ होते. लगेच मुलगी प्रज्ञासाठी स्थळ बघून मोठ्या थाटामाटात तिचा विवाह केला गेला. प्रज्ञा ही चांगल्या संस्कारी श्रीमंत घरी गेली. पण गोजीरीला दूर केल्याच दिदीला अतिशय दु:ख झाले होते.

    मी दिदीची लाडकी बहिन होती. मला दिदीने भरभरून माया दिली होती. मी लहाणपणा पासूनच दिदीकडे उन्हाळासुट्टीत १/१ महिना रहायची. विवाहानंतर ही सारख येणेजाणे असायचे. त्यानंतर दिदीचे स्वस्थ बिघडले. तेंव्हा ताईला सोडून जाणे फार जीवावर जायचे. तरीपण जाव लागत असे.दिदी मला माझ्या सासरवरून लगेच बोलवून घ्यायची. आम्ही दोघी बहिनी खुप गोष्टी करायचो. ती जरी माझ्यापेक्षा १४/ वर्षाने मोठी होती तरी मला ती माझी मैत्रीन वाटायची. आपल पुर्ण मनातल मला सांगायची, दिदीला आणि मलाही खुप मोकळ वाटायच. तिचे अनेक ऑपरेशन झालेत तेंव्हा ती मला बोलवून घ्यायची, हॉस्पिटलमधे मी सोबत असायची ,दिदीच्या वेदना पाहून माझ्या डोळ्याला नुसत्या धारा असायच्या.पण दिदीसमोर मी कधीच रडले नाही.

      नियतीचा कसा हा खेळ होता बघा. ज्या दिदीने कधीच कुणाला दुखवल नाही छळल नाही रागावल नाही तिला इतक्या वेदना कां द्याव्यात.कधी कोणतेच व्यसन केले नाही की कधी सोपसुपारी देखिल खाल्ली नाही.शुद्ध शाकाहारी अन्नाचे सेवन, करायची. अशी कां बर अवस्था झाली असेल माझ्या दिदीची! ईश्वरावर श्रद्धा ठेवणारी .साऱ्यांचे हित व सर्वांवर प्रेम करणारी दिनरात्र संसारात वाहून घेणारी, अशी माझी तारादिदी!

    तारादिदी माझ्याजवळ बसून मला म्हणायची! "मीना मला एवढ्यात नाही ग मरायच ",माझ्या हातून कोणत पाप झाल असेल,मला ही सजा कां देतो आहे देव,मी तिला दिदीला धीर देवून समजवत असे पण माझ्या ह्रदयात सारखी कालवाकालव होत असे,मी कोणत्या शब्दात दिदीची सांत्वना घालू आता! दिदी पुन्हच्छ बोलू लागायची, शुन्यात बघत ताई म्हणाली, मला माझ्या संसारात खुप काही करायच आहे. किती इच्छा आकांक्षेचा गळा घोटत आले मी! आताशी मी त्या सर्व इच्छा पुर्ण करणार होते,परंतू माझ्याकडे वेळच उरलेला नाही.मी माझ्या मुलांसाठी काहिच केले नाही. माझा जीव की प्राण माझी गोजीरी सासरला गेली. तिला माझ्याबद्दल काय वाटत असेल ,ती म्हणत असेल की, माझ्याकडे आईच मुळीच लक्ष नाही. तिला पहिल बाळ होणार आहे,आणि मी बघ आपले स्वास्थ जपती आहे. मी या जगात नसेल तेंव्हा माझ्या गोजीरीकडे कोण लक्ष देईल ग ,मला म्हणाली तू देशिल ना मीना तिच्याकडे लक्ष ? मी बोलायच्या आधीच प्रश्न ,पण ती फार लांब असते ग,तुला कुठे जावू देणार तुझ्या सासरची लोक नाही कां?डोळ्यातिल अश्रृ आवरेना म्हणुन मी काही बहाणा करून बाथरूममधे जावून अश्रृला वाट मोकळी करून पुन्हा ताईजवळ येवून बसायचे.

       "तारादिदी क्षणोक्षणी मरत होती,"मी अदृष्य प्रकृतीला मनोमनी हात जोडले व प्रार्थना केला. नको परीक्षा घेवू माझ्या दिदीची तिच्या वेदना कमी कर ,नाहीतर पटकन अनंतात विलिन होवू दे,नाही बघू शकत मी ताईची तळमळ ,अपराधी असल्यासारख वाटते मला,माझ जगनं, माझ्या हाती काहीच नाही,मी नाही करू शकत दिदीचे दु:ख दूर ,तिला शक्ती दे सहन करण्याची ,तिला रस्ता दाखव जगण्याचा, मी आतून ढासळलेली होती. मी ताईचे मनोबल वाढविण्याचा खुप प्रयत्न केला.तसे घरी सारेच दिदीला धीर देत असे. पण दिदीचे दु:ख काही केल्या कमी होईना.

      मी आपल्या सासरी आले ,तिथे मला सतत दिदीच दिसायची, काही दिवसानंतर मला स्वप्न पडले होते. तारादिदी स्वप्नात माझ्या घरी आली आहे ,मी झोपेतून उठुन खाली हॉलमध्ये आले, उल्हासुन म्हणाले दिदी आली नां? कुठे आहे माझी ताई?तेंव्हा माझे कमलनयन मोबाईलवर कुणाशी तरी बोलत होते. सासूबाईपण जवळच उभी होती.माझ्या प्रश्नाच उत्तर कुणीच देईनां,मी परत विचारले असता माझे पती माझ्याकडे सारखे बघत उभे राहिले,त्यांच्या तोंडातून ब्र शब्दही निघेनां, तेंव्हा सासूबाई म्हणाल्या! तुझी दिदी गेली ग , मी म्हणाले! आताच तर आली अन आल्या आल्या लगेच कशी गेली ? माझी सासुबाई जवळ आली ,व येवून माझे दोन्ही हात धरले, अग मीना तुझ्या तारादिदीचा स्वर्गवास झालेला आहे, आताच फोनवर ही बातमी कळली ,मी इथेच होते! 

        माझे काही वेळ भानच हरपले होते.सुन्न होवून जागेवर बसले, खरी स्थिती समजायला वेळ लागला नाही. या भरल्या संसारात माझा जीवलग आधार क्षितिजापार गेला होता . तितक्या दुरून दिदी मला पहाटेला भेटायला आली होती. मनातच विचार करू लागले."जिथे प्रेम आहे तिथे अस्तित्व आहे." "संसार हे स्वप्न आहे." मला भेटायला अवश्य आली होती माझी दिदी ! माझी दिदी खुपच दयाळू होती.तिला माझ्या प्रेमाची जाणिव होती. म्हणुन तर ती मला शेवटची भेटायला आली होती.मी निरभ्र आकाशाकडे बघितले .सूर्य निघाला नव्हता मला एक स्वयंप्रकाशित निखळतां तारा दिसला स्वच्छ, सुंदर तेजस्वी प्रभा घेवून विद्युल्लतेप्रमाणे तो माझ्या सर्वांगात रुजला.Rate this content
Log in

More marathi story from Meenakshi Kilawat

Similar marathi story from Tragedy