एक नवा पायंडा
एक नवा पायंडा
"जान्हवी, अगं येतीलच सर्वजण तू आधी आवरून ये, आधी जेवण करू." सुलभा ताईंनी टेबल मांडताना आवाज दिला. "आई अहो आज काय विशेष कोण येणार काय चालले कळेल का मला..." जान्हवीने विचारले. दिवाळीच्या आधी सुलभाताई सहा महिने प्रवासाला गेल्या ती अटच हि घालून की कोणाला सांगायचे नाही, फोन करायचा नाही मी येईन. दिवाळी झाल्यावर पंधरा दिवसांनी आल्या आणि आठवड्यात कार्यक्रम ठरला. निमित्त काय जान्हवीला कोडे पडले.
हळूहळू सारे जमले अरे बापरे नणंद नणंदेचे मिस्टर व सासुबाई सासरे. दिर जाऊ आणि जावेचे आई वडील सोबत. जान्हवीचा भाऊ रमेश -वहिनी जान्हवीची आई, . पाठोपाठ निमा वहिनीचे आई बाबा. तिची बहिण मुक्ता- मेहुणे, मेहुण्यांचे आई बाबा. हसत खेळत गप्पा झाल्या जेवण उरकले सारे आवरून जान्हवी हॉलमध्ये आली. "बस जान्हवी तुझा गोंधळ उडाला लक्षात आले ह्या सगळ्याचे कारण तू", म्हणताच जान्हवीच्या डोळ्यात अश्रू तराळले. त्याचवेळी त्यांची थंड नजर सर्वांचे हावभाव टिपत होती अपेक्षेप्रमाणे जान्हवीच्या नणंद, वहिनीच्या चेहऱ्यावर हलकी कुत्सित छटा जाणवली "बरे झाले असेच हवे" जणू भाव होते ते.
त्यांनी व्याह्यांना हात जोडले आणि बोलू लागल्या "लपवायचे काही नाही सगळे आपले आज व्याही म्हणून नाही तर एक सुजाण व्यक्ति म्हणून तुम्हाला बोलावले मुलांसह, आपण भेटून बोललो त्याप्रमाणे". "सर्वांनी शांतपणे आता मी बोलणार फक्त ऐका. जे चालले ते काळानुसार कुठे तरी थांबायला हवे भाव भावना आवरून परिवर्तन स्विकारणे योग्य नाहीतर जान्हवी सारख्या कीती जणींची फक्त ससेहोलपट, घुसमट होत राहिल. त्या सुंदर जीवन जगणार नाहीत अंतरी दुखावल्या मनाची नकळत हाय लागते असे व्हायला नको. कोणीतरी बोलून सुरुवात केली पाहिजे मी प्रयत्न करते." मुले आई वडीलांकडे बघू लागली. "असे बघू नका पोरांनो आई बाप आहोत तुमचे, आम्ही सगळे एकत्रित नुकतेच पंधरा दिवस सहलीला जावून आलो. उत्तम सूर जुळला आमचा वृद्धत्वाच्या वेशीवर असलो तरी खंबीर आहोत तुमचे मुखवटे बाजू करायला."
सोहम, जान्हवी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते मी गेले सहा महिने कुठे होते. मी माझी मुलगी, माझा मुलगा एवढेच नाही जान्हवीचा भाऊ आणि तिची बहिण प्रत्येकाच्या घराजवळ महिनाभर राहून आले. जान्हवीच्या संपर्कातील सर्वात जवळ जिव्हाळ्याचे नातेवाईक आहोत. मागच्या दिवाळीत तुम्हा सर्वांच्या साक्षीने रात्र छायेसारखी काजळ दिवाळी झाली सारे नाट्यमय. मी सुहृदाच्या कानशीलात लगावली पण ते कमीच झाले....विचाराचे वादळ मनात थैमान घालून गेले आणि समजली ती जान्हवीची भूमिका नात्यांना जपण्याणी पण दुर्दैवाने ती इतरांना समजलेली नाही. ती मुलगी काही बोलणार नाही कालांतराने नात्यांचा त्याग करत पाषाण होईल. असेच चालू राहणार दुष्टचक्र, तिला जाचक ठरायला नको भविष्यात वास्तव कळून ती तेंव्हा उद्ध्वस्त होईल पण आज सावरेल नक्की तशी खंबीर, हिमतीची आहे. ती मनमिळावू सहज विश्वास ठेवत जपते सहकार्याने तिला सर्व गृहित धरतायत हे चुकीचे. कदाचित बोलण्याने दुखवले जाणार आपण सर्व पण त्यातून सुधारणा व्हावी हि अपेक्षा, शुद्ध हेतू. आज कान उघाडणी....
तुमच्या कडून अपेक्षा नाही अवास्तव पण साधा व्यवहार समजला नाही बाकी स्वार्थ कळतो नाते जपणे समजत नाही, का आम्ही संस्कारात कमी पडलो. जान्हवी तुम्हा प्रत्येकास भेटायला येते तेव्हा रिकाम्या हाती येत नाही तुम्ही कधी काही घेऊन आलात का तिच्यासाठी? उत्तर "नाही" बरोबर. जान्हवीच फोनवर विचारपूस करते तुमचे काय? तुम्हाला गरज तेव्हाच फोन येतो. मदतीला धावते रिकामी नसते हो.., तुम्ही कारणे सांगता तिच्या गरजेच्या वेळी, ती जाऊ दे वाद नको सोडून देते. तुम्हाला प्रत्येकाला काय आवडते तिला माहित तिला काय आवडते आहे का उत्तर. तुम्ही फाडफाड बोलता विचार न करता तिच्या मनाच्या चिंधड्या सोहमला, मला जाणवतात. यात तिचाही दोष आहे कारण ती गप्प राहते नाती धरून ठेवावी पण जान्हवी समोरचा तसा आदरास योग्यतेचा आहे का आज तिला कळायला हवे. तिला आदर दिला जात नाही तर तिने कदर का करावी तुमची. नाते जोडणे दोन्हीकडून हवे अरे समजून घेणारी साथ देणारी माणसे या जगात हाताच्या बोटावर मोजण्या इतकी. भावनिक कमजोर नसतात उलट खंबीर,उत्तम व्यक्ती असतात म्हणून तर नाते टिकते नाहीतर तुमच्या सारखे एकटे पडतील. दुखावले गेलेले वाद नको म्हणून बोलणार नाही फक्त निघून जातात तुमच्या आयुष्यातून कायमचे, नुकसान इतरांचे होते ते पश्चातापाने कळून फायदा नाही. मान हवा तर आधी द्यायला शिका. नाहीतर अशी व्यक्ती साथ सोडते कायमची त्या व्यक्तीचे नुकसान होत नाही कारण ती निरपेक्ष चांगले कर्म करते.
"हं तर सुहृदा तुझ्या पासून सुरूवात करू" असे म्हणत त्या स्वतःच्या मुलीकडे वळल्या. "मुलगी म्हणून पहिला मान तुझा आजचा आहेर स्विकारलास तर जीवनाचा पुढचा प्रवास चांगला होईल. आत्याला मध्यस्थी घालून मागतेस देताना चिमूटभर घेताना पसाभर हे कोणते गणित गं तुझे. मी आई म्हणून हे कधी शिकवलेच नाही. आहेर, भेट वस्तू, देणेघेणे, अधिक गोंडस नाव 'गिफ्ट' बद्दल बोलू. असे म्हणत त्यांनी हातातले कागद प्रत्येकाला दिले. हि लिस्ट सर्व भेट वस्तू दिल्या जान्हवीने तिच्या छोट्या कमाईतून स्वतः साधेपणाने रहात गेल्या काही वर्षांत. याही पेक्षा मोठीच आहे मी अल्प लिहिले, खाली तुम्ही जान्हवीला काही दिले का बघा, काय दिसतात दोन चार ठिपके. तिची स्वप्ने नसतील, छान रहावे हौस मौज करावी, फिरायला जावे तिला वाटत नसेल. तुमचे केले नसते तर आज राणीसारखी राहू शकेल ती सुद्धा."
"सुहृदा तुला तुझ्या मैत्रिणी बीबीसी चॅनेल म्हणतात मी ऐकले तू त्या दिवशी तुझ्या भिशीला हॉटेल मध्ये गेली तेव्हा तुझ्याच मागे दोन टेबल सोडून पाठमोरी होते मी आणि त्यांनी मोबाइल सुरू केला, सुहृदाचा आवाज "माझी वहिनी खूप खाष्ट आईला नीट वागवत नाही कशीही बोलते मला, भाऊपण बायकोचे ऐकतो, खूप करावे लागते मला. धावाधाव, पैसे दयावे लागतात आणि सासूबाई सासरे त्यांचा त्रास काय करू मी..." टेप सुरूच होता सुहृदाचा नवरा उठला आणि प्रतिक्रिया सुहृदाच्या गालावर उमटली त्याला नवीन होते सर्व. सुहृदाला समजले आज काही खरे नाही आई सगळे हिशोब चुकते करणार. सगळेच अवाक "आई मनापासून धन्यवाद हे भयानक आहे माझ्यासाठी अहो मधे बाबांचे ऑपरेशन झाले जान्हवी वहिनी रोज दवाखान्यात सकाळचा नाष्टा देवून ऑफीसमधे जायच्या, पण हि डबा हॉस्पिटलचा लाव म्हणाली. बाबांना घरी आणू दिले नाही. आत्ताच सांगतो मी कदाचित घटस्फोट घेणार आहे मी कंटाळलो आहे तिच्या वागण्याला. आई आता मलाही बदलायची गरज आहे". त्याचे बोलणे ऐकून सुहृदा हादरलीच.
"सुहृदा कीती सुंदर नाव अगं कमीपणा आला, तुझी तक्रार चांगले मानपान नाही सासरचे बोलतात त्यांना आवडत नाही तुझा अपमान होतो तू असे म्हणाली की आमची कुचंबणा होते. पण तुझ्या सासू सासऱ्यांना माहित नाही आजतागायत आम्ही काय आणि किती दिले, कीती खोटे बोलतेस, कान भरतेस आणि का?? तू वेगळी राहतेस. नवऱ्याला सुद्धा सांगत नाहीस, काय कमी पडते सधन घरात दिले तुला रिकामी असतेस म्हणून हे उद्योग करतेस. चांदीच्या वस्तू, छान साड्या, बारश्याला मुलांना सोन्या-चांदीचे, मुलांची खेळणी, कपडे इ. रीतभात...तुझे माहेरचे म्हणून सांभाळतो. तू कधी काही दिलेस आपलेपणाने इतरांना रीतभात तुला माहीत नाही, फक्त घेणे माहित हे नाही माझे संस्कार. जान्हवी तिच्या जमेतून करते सोहमवर भार नको. कोणालाही आहेर मला दाखवून विचारून देत आलीय, तेव्हापासून सांगत आले बाई एवढे करू नकोस. लोक घ्यायला येतात संकटात साथ सोडतात. कधी काही दिले नाही तुम्ही इथे तोरा नकोच. गेल्या वर्षी तू जे दिवाळीत बोललीस वागलीस वाटले बोलवूच नये तुला मी मरेपर्यंत आई असून संबंध तोडावा वाटला त्या जान्हवीची कोण अवस्था.... तुझ्या नणंदेशी तशीच बोलतेस. मुलगी म्हणून पांघरूण घालणार नाही. तू सुधारणार नसशील तरी आणि हो तुला घटस्फोट मिळाला तरीही इथून पुढे या घराचे दरवाजे बंद."
"अपर्णा, तू सून माझी धाकटी जाऊ जान्हवीची म्हणून तुला समजून घेतले तिने हे चुकले नाही का गं तिचे, तू स्वतःच्या श्रीमंतीचा दिखावा दाखवून तिने दिलेले प्रेझेंट फेकून पायदळी तुडवले व्हिडिओ आहे" आणि त्यांनी रेकॉर्ड दाखवली ताडताड बोलत होती अपर्णा जान्हवीला मुलाच्या बारश्याच्या वेळी. "तुझ्या भावालाही दाखवला मी. महेश खाली मान घालून बसला होता. माझ्या मुलाला महेशला खोटे सांगतेस मी तुझ्याकडून दोन लाख घेतले आणि सांगू नको असे कधी म्हणाले कळू दे सर्वांना. महेशने आमच्याबरोबर बोलणे बंद केले तेव्हा त्याच्याबरोबर आठवडाभर सहलीला जावून आले मी इतरही बरेच आजवरचे गैरसमज मिटले. अपर्णा तुलाही सुहृदाला सांगितले तेच लागू.... एक परंपरा तोडत नवा प्रघात करायचा आज, एक कळले सर्वांशी संवाद साधत रहायला हवा, कानात फुंकर घालणारे दूर बरे. सर्व नवीन, सुधारायचे...
समोर बसलेल्या जान्हवीच्या वहिनीचा चेहरा पांढरा पडला सगळ्यांची शाळा घेत होत्या सुलभाताई प्राध्यापिका होत्या आणि तसेच झाले पुढचा मोर्चा त्यांनी जान्हवीच्या भाऊ, वहिनी आणि बहिणीकडे वळवला. हं तर जान्हवीच्या आई निमा तुमची सून पैसे मागून नेते यांना सांगू नका नाहीतर मला बोलतील आजकाल भागत नाही हो आमचे. आईंचे पण करावे लागते सांगते तीही खोटे बोलते. निमा, आमच्याकडे लपवून छपवून वागत नाही कोणी. आई तुम्हाला हे माहित नाही हे तुमच्याशी बोलल्यावर मला कळले. सांभाळा हिला नाहीतर डोक्यावरून पाणी जाईल. रमेश कधी बहिणीला माहेरी बोलवावे असे वाटत नाही, ती आत्या मावशी म्हणून तुमच्या मुलांचे कौतुक करते तुम्ही काय करताय. व्यवहार जबाबदारी फक्त कोण्या एका व्यक्तीची एकतर्फी. बहिण-भाऊ म्हणून तुमची जबाबदारी शून्य. मुक्ता अग तू बहिण जान्हवीची, तुझ्या गावात राहून आले तिथले तलाठी यांचे मित्र. काय मुक्ता मुलाच्या मुंजीत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मामा म्हणून मान दिलात स्वतःच्या सख्ख्या भावा बहिणीचा मान ठेवला नाही. स्वतःच्या आईला मानाची साडी घेता आली नाही, अगं त्या माऊलीचा विचार तरी करायचा. गेली अनेक वर्षे तुला जान्हवी बोलवते तुझ्या सर्व कुटुंबास मानाने कपडा दिल्याशिवाय जाऊ देत नाही. आमची साधारण परिस्थिती पण भाचे आहेत म्हणून देते ती. मुक्ता तेच तुझ्या दिर, नणंदेला भरभरून देत कौतुक करतेस ते विचारत पण नाहीत तूच सांगितले होते मला तुला अपघात झाला तेव्हा महिनाभर इथेच होतीस. रमेश तुझी बायको बाळंतपणासाठी शहरात होती जान्हवीने पाहिले सर्व. बोलू नये पण बोलावे लागते. मुक्ता तुझ्या सासू सासऱ्यांकडे गावी चार दिवस राहून आले प्रेमळ आहेत दोघे. अगं तुझ्या लग्नाची बैठक बोलणी आम्ही पार पाडली. आमच्याकडे माहेरवाशिण जणू पाहुणचाराला आम्ही मध्यमवर्गीय कोणाच्याही येणे जाणे परिस्थिती बद्दल काहीच म्हणत नाही पण थोडी जाणीव हवी इतका कोरड्या भावना. काय प्रतिष्ठा, पैसाच बघायचा. मधे जान्हवीच्या बाबांची जमीन विकली रमेश आणि मुक्ता दोघांनी त्याचे पैसे परस्पर वाटून घेतलेत का हक्क नव्हता जान्हवीचा. ती बोलत नाही तर गृहीत धरून चालता. तिच्याकडून अपेक्षेने हक्काने घेता तिलाच डावललेत. आईंकडून, तुमच्या काकांकडून, वकिलांकडून सर्व कळाले....ती कोर्टात गेली नाही तिच्या मनाचा मोठेपणा तुमचे नशीब नाहीच. पुढच्या वेळी नोटीस हाती असेल...मग बघू..... अरे घराचा टीव्ही चॅनेल का करायचाय मुलांनो.... कि बाहेरच्यांनी म्हणावे छान टिव्ही शो यांच्या कुटुंबाचा चालू असतो" सुलभाताई काही चांगले व्हावे पोटतिडकीने बोलत होत्या..
या देण्या घेण्याने मान पान राखणे यामुळे आपलेच दुरावले जातात आजवर कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली अवतीभवती उदाहरणे पाहतो मग यातून मार्ग काढायला हवा सुरूवात स्वतःपासून मग सगळे सुधरत जाते. आमची तत्त्व म्हणणाऱ्यांनी मोबाईल शिकून घेतला मग अपेक्षांचे ओझे इतरांवर का लावावे स्वतः कमवा मग मिजाशीत रहा. प्रत्येकवेळी भेटवस्तू काय मिळेल याची अपेक्षा त्यासाठी फक्त बोलायचे, भेटायचे हे पटतच नाही. यापुढे मन दुखावले जाईल असे वागू नका तुम्ही इथून पुढच्या काळात एकमेकांना चांगली साथ द्या. नव्या योग्य विचारांचा जागर व्हायलाच हवा. काळ बदलला म्हणजे माणसाची मते, वर्तन, भावना बदलल्या मग चांगले हितकारी परिवर्तन आपणच घडवायला हवे. तुझे माझे, वाद, विनाकारण गॉसीप बंद व्हायला हवे. पुढची पिढी चांगली घडवा. माझं म्हणत पसारा पण रिकाम्या हाती येणे जाणे अरे माणसं जोडा ते महत्त्वाचे.
वातावरण गंभीर झाले होते. तेवढ्यात त्यांच्या धाकट्या सूनेचे अपर्णाचे वडील उठले, "खरेच सुलभाताई आज मान खाली गेली आम्ही सर्वच आभारी आहोत बरेच काही कळाले व पटले. तुम्ही येवून गेलात जाणीव झाली आम्ही पण असेच फिरून आलो माहिती काढून नव्याने जाणून आलो. काही बरे वाईट अनुभव पदरी पडले मन दुखावले गेले पण काही समजले तर काही गैरसमज दूर झाले. मी माफी मागतो....अपर्णा काय सांगायची ते ऐकले तुम्हाला विचारून चौकशी केली नाही हो कधी. मुले सुधारली नाही तर नाती तुटतील आवाज न करता. भयाण एकटेपण येईल यांच्या वाट्याला."
वाद संवाद, साद प्रतिसाद सर्व पडसाद उमटत राहिले बराचवेळ..... "माझा कोणताही राग नाही रे बाळांनो अरे तुम्ही एकमेकांत असे वागून दरी निर्माण करताय. बाहेरचे येत नाहीत सावरायला खांदा लागतोच सुख दुःखात. मृगजळामागे धावताना हातचे स्वर्गीय सुख नातेसंबंध तुम्ही गमावू नये. थोडी स्पष्ट बोलले राग येणार माझा.. स्वाभाविक पण गेल्या वर्षी जणू संधी मिळाली अन् तुम्ही प्रत्येकाने जान्हवीला तोडून कटू बोललात चुकीचे वागलात."
"जान्हवी अगं भावनेला कुंपण घालावे. जग भल्या बुऱ्याचा संगम. फसगत झाली कळले की विश्वास उडतो माणूसकीवरून हेच तुला नंतर कळले असते काही काळाने तू संभ्रमित होवून त्रागा करून सुप्त ज्वालामुखी झाली असतीस. बऱ्याच वेळा समज दिली तू भावनेत निर्णय घेऊ नको अगं आपला संसार, अडीअडचणी डोके वर काढतात तेव्हा यांच्यापैकी कोण आले मदतीला विचार कर. तुझी भूमिका चांगली मदत करावी पण व्यक्तीला जाणीव असेल कदर करून सन्मान दिला तर आदर करावा. स्वतःच्या आत्मसन्मानासाठी लढायलाच हवे जाऊ दे म्हणशील तर जग जगू देत नाही. दिवाळीच्या दिवशी तुझे डोळे पाणावले, म्हणालीस" "आई, सांगा खरचं का माझे चुकते सगळ्यांना धरून ठेवते. हे देणे घेणे मान पान, आहेर, भेट वस्तू माझ्याकडून स्विकारूनही मलाच टोमणे मारतात. मान सन्मान देवून अपमान, उपेक्षा पदरी आता सहन होत नाही मेटाकुटीला येतो जीव. जाऊ दे म्हणत सोडले तरी मनात सलत रहाते. सर्वांचे करते मग चुकते काय?? प्रश्न... आता जाणार नाही कोणत्याही समारंभात कोणाकडे कधीही. सासर माहेरच्या उंबरठ्यावर जीवन दोलायमान अन् हातात आधारास काठीही नाही सावरायला. देवा, मन मारून घुसमटून जगते वाटते" तू बोललीस गलबलले आतून आणि म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. आपण सगळेच झाले गेले विसरून इथून पुढे जीवन प्रवास करत चांगल्या आठवणी निर्माण करू. जेणेकरून कोणालाच मानसिक त्रास होणार नाही. अरे क्षणभर भेटतो तर हसत भेटू. परत भेटण्याची ओढ असावी नात्यात. तशीही आता घरे दूर दूर मग मनाने जवळ या. काय मुलांनो पटले का?. . ..
"*एक नवा पायंडा* इथून पुढे सणासुदीला देणे घेणे बंद निदान या घरात कायमचे बंद मी असताना आणि माझ्यानंतरही, या भेटा आठवणी चांगल्या होतील असे बोला वागा सहभोजन करा." समजून घेतले तर मतभेद दूर, मनभेद होऊ नये जपायचे. वस्तू देण्या घेण्यावरून मानापमानाचे प्रसंगच नकोत. थांबवू हे सगळे. आम्ही माफ केले तुम्हाला याक्षणी तुम्ही काही न म्हणता. सुलभाताई बोलल्या परिणाम झाला. रमेश, निमा , मुक्ताने सुलभाताईंची, जान्हवी, सोहम, जान्हवीच्या आईची माफी मागितली. सुहृदा हादरलीच होती आईचा खाक्या तिला माहित होता सुधारावे लागणारच, मी चुकले परत असे होणार नाही आश्वासन दिले. अपर्णा खजील झाली अक्षम्य चुकलो काय समजायचे समजली, पण शांत बसून राहिली. जान्हवी चहा घेऊन आली तसे प्रत्येकजण थोडा रिलॅक्स जाणवला. काही वेळाने काही अंशी ताण कमी झाला. व्याही एकमेकांशी हसतखेळत चर्चा करत होते भेटल्याने गैरसमज दूर झाले. अखेर निरोप घेऊन सगळे मार्गस्थ झाले.
"आई आज तुम्ही नसतात तर मला हे सगळे धक्कादायक होते एखाद्या चित्रपटात प्रमाणे वाटले. आई मी चुकलेच हो, जाणीवपूर्वक वागेन बदलण्याचा प्रयत्न करेन तुमचे कदर तसाच आदर लक्षात राहिल, थॅक्स" जान्हवीने त्यांचे हात हातात घेतले तसे तिच्या डोक्यावर हात ठेवत त्या म्हणाल्या "अगं वेडाबाई मी यातून गेले पण तू सहन करते ते काही अंशी अतिच, अतिरेक कोणताच चांगला नाही दुःख तर नाहीच नाही. जरा जिथल्या तिथे बोलायला शिक उद्यापासून तुझी शिकवणी घेणार आहे हं" म्हणत सुलभाताई हसल्या. "जीवन दुःख सुखाचा हिंदोळा, घटना घडणार पण अजाणतेपणी होणे आणि जाणीवपूर्वक त्रास देणे ह्यात खूप फरक असतो.जगणे स्पर्धा नसावी विलोभनीय वाटायला हवे जगणे सर्वांसह, खूप लांबचा प्रवास तू समजूतदार आहेस आनंदी रहा. चला जान्हवी ताई तुमचे झाले.
आता निघायचे, हेच लेक्चर देणार एका सभेत सणासुदीला देणेघेणे, आहेर, गिफ्ट बंद "नवा पायंडा", तुमच्या सारखे अजून काही सुधारतील या आशेने" म्हणत सुलभाताई घराबाहेर पडल्या.
