मृत्यूपत्र
मृत्यूपत्र
नितीन येणार म्हणून मीनाताईं तयारी करत होत्या. आता वाटेकडे डोळे लागले होते. नितीन, सून विनिता नात अवनी दोन वर्षांनी येणार होते. घरात गडबड चालू होती, स्वागताची तयारी सुरू होती. दारावरची बेल वाजली सगळ्यांनी उत्साहात स्वागत केले. अवनी छान दिसत होती "आजी..." तिने मिठी मारली. विनायकची हर्षा आणि अवनी खेळायला गेल्या. विचारपूस झाली जेवण उरकले आणि शेजारी, नातेवाईक रजा घेऊन निघाले. हर्षाला खेळणी आणली होती ती खूप खुशीत बागडली.
मीनाताई बेचैन होत्या नितीन बरोबर कधी बोलेन असे झाले होते. "अरे नितीन अवनी झोपली का रे दमली असेल. तुम्ही पण विश्रांती घ्या." विनायकला त्यांनी घरी थांबायला सांगितले. "नितीन, विनायक मला तुमच्याबरोबर बोलायचे आहे. विनिता, प्रज्ञा तुम्हीही थांबा. "आई अगं असे काय महत्त्वाचे आहे, मी आहे महिनाभर, बोलू आपण." नितीन म्हणाला पण त्याला तोडत मीनाताई म्हणाल्या "म्हणजे काम पूर्ण होईल पंधरा दिवसांत. मी स्पष्ट बोलते अलीकडे माझी तब्येत ठीक नसते काय भरवसा बाबा आणि सतत विचार येतात माझ्या माघारी वाद नको" मीनाताई भावूक झाल्या "आई काय झाले आमचे काही चुकले का? बघ दादा मी तुला सांगितले फोनवर हे असे बोलते हल्ली. कळतच नाही हिला काय झाले." विनायक म्हणाला.
"मला माहिती हा कशाचा परिणाम" विनीता म्हणाली. "अगं तुला माहीत होते तर सांगायचे न", "अरे नितीन तसं नाही पण मी आणि प्रज्ञा बोललो तेव्हा लक्षात आले आमच्या. तू म्हणालास तेच कारण."
खरेतर महिन्यांपूर्वी मीना ताईंच्या बहिणीचे सुमनचे यजमान गेले आणि त्यांच्या मुलांनी इस्टेट विकून गाव सोडले हे मावशीला काहीच माहित नव्हते. घराचा ताबा घ्यायला माणसे आली तेव्हा तिला धक्का बसला. आणि हे कळले तेव्हापासून मीना ताईंची प्रकृती खालावली. "आई अगं तुला आम्ही तसे वागू असे वाटते का? तुझे चांगले संस्कार आहेत. कसले दडपण विनाकारण घेतलेस. आणि मला हे कळले नाही असे नाही मला माहिती आहे. अग मी इथे तुझ्यासाठी आलोय तुलाच आम्हाला सांगायचे आहे. आई अगं विनायकला मावशीने फोन केला तेव्हा लगेच मलाही त्याने कळवले. विनायकने तिथे जावून मावशीला ॲडमिट केले, आता ती बरी आहे. तू काळजी करू नको. दोन दिवसात आपण तिला घेऊन येऊ. हे सांगताच मीनाताई रडू लागल्या. "पण तरीही मला मृत्यूपत्र करायचे आहे. तुम्ही म्हणता विश्वास आहे असे होणार नाही पण काळ, परिस्थिती काय समोर येईल सांगता येत नाही". बोलता बोलता चक्कर आली. दोघेजण आपापल्या परीने समजावत होते. डॉक्टर चेक करून गेले. विश्रांती घेतल्यावर आता थोडे बरे वाटत होते.
वृद्धावस्था सुरू झाली की विचार आणि रात्र नाही सरत. कितीतरी वेळ त्या विचार करत होत्या. सुमन खूप फटकळ आणि तिची सासरची परिस्थिती सधन, त्यामुळे नाही म्हणता थोडा 'मी' डोकवायचा. मुलेही नितीन, विनायकची चेष्टा करत अपमान करत. तसे मीनाताईंची परिस्थिती खाऊन पिऊन सुखी. पण सुमन सारखे चैनी राहणीमान नव्हते. पण कधी भेट झाली तर तुलना व्हायची याचा परिणाम मुलांवर व्हायला नको म्हणून मीनाताई खूप सावध होत्या. आई वडील या नात्याने नितीन व विनायकवर उत्तम संस्कार केले. मुले स्वकर्तृत्वावर पुढे जात राहिली दिवस बदलले. मोठे घर झाले एकत्र कुटुंब. दोन्ही सूना स्वभावाने खूप छान. मोठी सून विनिता विवाह झाला तेव्हा पदवीधर होती पुढे शिकली, तिलाही जॉब मिळाला. चार वर्षांपूर्वी दोघे परदेशी नोकरीस गेले घराचे लोन लवकर फिटेल म्हणून. विनायक, प्रज्ञा, हर्षा आणि त्या इथे विनायक,प्रज्ञा दोघे नोकरी करणारे. पण आत्ता सगळे ठीक वाटते आपल्या नंतर.... हे घडले असे काही व्हायला नको आपण आहोत तोवर....विचाराने त्रास....
"आई कशी आहेस" मुले आली. अरे तू वकीलांना बोलव. "अगं तू टेंशन घेवू नको" पण त्या ऐकायला तयार नव्हत्या. आई आम्ही वेगळे राहणार नाही जोवर आहोत तोवर आमचे चौघांचे ठरले. अगं एकटे रहाणे आम्ही दोघांनी अनुभवले नोकरीच्या ट्रांसफरमुळे आम्ही एकत्र राहणार एकमेकांना आधार अगं छोटी कुरबूर होईल पण समजून घेतले की झाले. मुलांचे हाल होणारे जबरदस्तीचे निर्णय घ्यायचे नाही आणि त्यांना भावा-बहिणीचे प्रेम सहवास हवाच. आम्ही आत्ता अमेरीकेत पाहतोय मोहवणारे असले तरी विचित्र परिस्थितीत लोक राहतात. खूप सुखी आहोत आपण इथे भारतात छोटे आहे ते बरे. आणि पुढच्या वर्षी विनिता अवनी इथे येणार अवनीची शाळेत ॲडमिशन करतोय विनायक...आमची मुले मोठी होतील तेव्हा बघू. सगळ्यांनी माना डोलवल्या." "अरे छान वाटला तुमचा निर्णय एकत्र रहाणे पुन्हा काळाची गरज होणार तर. पण माझी इच्छा आहे मृत्यूपत्र करू आपण. फार काही नसले तरी जुना छोटा फ्लॅट घेतला तो भाड्याने दिलेला. दोन चार दागिने. एवढेच नाममात्र करून घेऊ रे" नाही हो करत मीनाताई हट्टाला पेटल्या आणि मृत्यूपत्र केले. नितीनने आईचे बॅकेतले पैसे आईच्या नावाने ठेवायला सांगितले, बाबांची पेन्शन हि तिची आणि येणारे भाडे हे तिची मिळकत शेवटपर्यंत तिची. "आई तू परावलंबी आहेस हि भावना आम्हाला नकोय. हे तुझे तू हवे ते खर्च कर. तू न मागताही आम्ही देणारच पण आता तू काही द्यायचे नाही. अगं डोक्यावर तुझे छत्र हि श्रीमंती आमची".
दोनच दिवसांनी सुमन मावशीला घेऊन घरी आले. सुमन मावशी खचली होती मनाने. "मीनाताईं नशीब भोग बघ कसे आले. आज तुझ्या घरात लाचार...कधी ऐश्वर्य होते क्षणात गेले हातचे माझ्याच पोटच्या पोरांनी घात केला. मोठ्या तोऱ्यात वागले कधी कोणास जवळ केले नाही. मीच फार तोडून वागायचे नात्यातल्यांशी तुझी मुले सोडली तर कोणी फिरकले नाही. माझी मुले पैसा हातात त्यांच्या स्वच्छंदीपणाने..मी लाड केले तेच भोवले... मी विनंती करते मला इथे ठेवू नको, मी वृद्धाश्रमात जाते.... " डोळे पाझरत राहिले तिचे. दोन्ही मुलगे कुठे गेले कोणाला काही माहित नाही. तिला तसे सोडणे माणूसकीला धरून नाही कशीही वागली असली तरी बहिण या नात्याने तिला आधार द्यायचे मीनाताईंनी ठरवले. "सुमन अगं आत्ता बरे नाही तुला बघू पुढे तू आराम कर लवकर बरे वाटेल हो, काय हवे सांग आम्ही सगळे आहोत." मीनाताई समजवत होत्या. एक नर्स ठेवली काही दिवस मदतीला. पण अघटीत सर्व काळ वेळ एकत्र आले..आठवड्यातच सुमन मावशी...
