Varsha Nerekar

Others

3  

Varsha Nerekar

Others

सेवाभाव

सेवाभाव

4 mins
147


"अजय मला दिलेले वचन लक्षात ठेव पूर्ण कर" क्षणात मॉनिटरवर आडवी लाईन आली बीप बीप मशीनचा आवाज आला तसा अजय गोंधळला. डॉक्टर डॉक्टर हाका देत राहिला. जरा वेळात डॉक्टर आले, सॉरी..... 

"माई...अगं माई...बघ ना माझ्याकडे एकदा, अग अशी सोडून जाऊ नको पोरक करू नको. बाबा बघा ना आपली माई... 

" माई.... " काय झालं अजय का ओरडलात, प्रिया अजयला हालवत होती. अरे काही वाईट स्वप्न पडले का? काही होतय का रे तुला. अजय आता सावध झाला होता झोपेतून. काही नाही तू झोप. त्याने घड्याळात पाहिले पहाटेचे चार वाजले होते. आज महत्त्वाचे कार्य पार पाडायचे. पाणी पिऊन तो बराचवेळ पडून होता. 

अचानक डोळ्यातून थेंब ओघळले. माई... कासावीस झाला. दहा वर्ष झाली घटनेला. सगळे आठवत क्षण सरत राहिले. आजोबा, काका-काकू, बाबा, माई, अजय, लहान भाऊ संजय एकत्र कुटुंब गावात राहणारे. चिंचवाडी गाव डोंगर कुशीत हिरव्या वनराईत शोभून दिसणारे. तालुक्याच्या गावापासून पाच मैलांवर. ना रस्ते ना सुखसोयी. शेतीवर जीवन, एकच शाळा तालुक्यात पण त्याने शिकावे म्हणून आई आग्रही होती. अजय हुशार, एकपाठी सातवीत स्काॅलरशीप मिळाली तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता. शेजारी सगळीकडे साखर वाटली. "अजय मी सांगते पोरा शिकलच पाहिजे अन् तू शिक डॉक्टर हो. माझे शिक्षण सुटलं पण तुम्ही दोघे खूप शिका. आपल्या गावाचे नाव आज केले तसेच मोठं करा" दहावीत तो मेरीट मधे आला. आई तालुक्यातील शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून आली विचारले तिने "डॉक्टर व्हायला काय करावे ओ भाऊ". ओळखी पाळखीत चौकशी करून सरांचे मार्गदर्शन घेऊन अजयला माईने हट्टाने बाबांना सांगून शहरात कॉलेजला पाठवले. 

तो निघाला तेव्हा पोराला लांब पाठवताना वाईट वाटत होते तिला पण पोरगं शिकून मोठा डॉक्टर होईल हीच आस. अजय शहरात आला आणि काही महिने गेले असतील ती चक्कर येऊन पडली. दुखणे अंगावर काढले. इकडे अजयला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला पुढील वाटचाल सुरू झाली. बाबा भेटून जात पैसे देऊन जात. आई खुशाल आहे सांगत राहिले. संजय मात्र तालुक्यातील कॉलेजमध्ये जाऊ लागला. शेतीत बाबांना मदत करत होता. आईने बाबांना, संजयला ताकीद दिली तिच्या आजारपणाचे सांगायचे नाही. तिचे औषधपाणी सुरू झाले, तालुक्यातील दवाखान्यात जास्त सोई नव्हत्या अन् पोराला शिकवायचे तर दवाखाना कसा परवडणार हे विचार. 


दिवाळीला अजय गावी जायचा भेटायला तसा तो याही वेळी गेला आता एकच वर्ष बाकी होते तो एमबीबीएस होणार होता. विशेष प्राविण्याने पास होत होता. तो गावाला गेला आणि अंथरुणावर माईला पाहून तिथंच बसला. तो जे बघत होता त्यावर विश्वास बसत नव्हता. माई खूप हडकली होती. चला आपण शहरात जाऊ. अरे जाणार कसे, कुठे अनेक प्रश्न. गावातून आईला झोळीत घालून डोंगर तुडवत तालुक्यातील दवाखान्यात आणले. नातेवाईक, गावचे सरपंच यांच्या ओळखीने थोडी सोय झाली होती ते शहरात आले. त्याने वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना विचारले त्यांनी सहकार्य केले. सरकारी दवाखान्यात भरती केले. शहरात एक खोली भाड्याने घेतली. गावी शेती काका सांभाळत होता. प्रकृती सुधारायला वेळ लागणार होता. सुगी झालीच होती धान्य विकून पैसे पण हाती पडणार होते उपचाराला. 


पण निदान होत नव्हते. एकीकडे आईची सेवा आणि कॉलेजची परीक्षा अजयची मोठी परीक्षा सुरू होती. सुट्टी मिळाली तसे त्याने बाबांना गावी जायला सांगितले, शेतीची कामे करून या. काका काय म्हणतात बघा. पंधरा दिवस गेले डॉक्टरांनी निदान केले टीबीचे. बाबा, संजय, काका निरोप मिळताच आले शहरात. बाबा सतत दवाखान्यात बसून असायचे तिच्या शेजारी. सांगता येत नाही डॉक्टर म्हणाले. उपचार सुरू होतेच रात्रीतून तिला धाप लागली, श्वासाला त्रास होत होता. "अजय अजय मला अजयशी बोलायचे.." अजय धावला, "माई तू शांत रहा मी इथेच आहे तू बोलू नको त्रास होईल." "अजय तू मला वचन दे तू डॉक्टर होशील वचन पूर्ण करशील" आणि बीप बीप मशीनचा आवाज घुमला......माई... दोन्ही मुले रडत होती माईने निरोप घेतला जगाचा. 


माई गेली सावरला अजय डॉक्टर झाला, मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करू लागला. त्याने संजयला शहरात आणले तो शेतकी महाविद्यालयात प्राध्यापक झाला. गावही पूर्वीचे राहिले नव्हते तालुक्यासारखे विस्तारले होते. आता काकांची मुलेही शिकत होती. गावात सुधारणा होत होत्या. रस्ते झाले, वीज आली, शाळाही सुरू झाली. बाबा गावाकडेच राहणार म्हणाले. संजयने तालुक्याच्या गावी नोकरी धरली. बाबांबरोबर राहून शेती पण बघत होता. कालचक्र गतिमान आधुनिकीकरण होत होते.


आज अजय खूप आनंदात होता. "अरे झाली का तयारी, बाबा या लवकर अरे या सगळे. संजय बाबांना बोलव." सगळे "सेवाभाव"च्या भव्य इमारतीत जमलेले. अजयचे मुख्याध्यापक, गावचे सरपंच ज्यांनी ज्यांनी अजयला मदत केली ते सर्व उपस्थित होते. अजयने बाबांच्या हातूनच त्यांनी गावातच बांधलेल्या छोट्या हॉस्पिटलचे सेवाभावचे उद्घाटन केले. पुढेच माईचे स्मारक उभारले होते. माईला ज्या क्षणी वचन दिले तेव्हा अजून एक वचनात तो स्वतः राहिला. माझ्या गावात कोणतीही माई अशी आजारी राहू नये. आज डॉक्टर होवून गावातल्या लोकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यायचे ध्येय स्ववचन पूर्ण झाले. सेवाभाव मधे माईचे स्मारक उभारले "माई मी डॉक्टर झालो आपल्या गावात हॉस्पिटल सुरू झाले.." तो बोलत होता, माई हसली त्याला जाणवले.


Rate this content
Log in