anagha jagdale

Inspirational

3  

anagha jagdale

Inspirational

एक ब्रेक तो बनता है!

एक ब्रेक तो बनता है!

3 mins
219


ऋषीकेशमधली सुंदर पहाट, आश्रमाच्या पायथ्याशी वाहणारी गंगा, अशा सुंदर वातावरणात थंडगार पाण्यात पाय सोडून बसलेली रागिणी मंत्रमुग्ध झाली होती. खळाळणारं पाणी, वाहता वारा, किलबिलणारे पक्षी आणि आजूबाजूला दिसणारे हिरवेगार डोंगर खूप आल्हाददायक होतं. रागिणीला तो एकटेपणा हवाहवासा वाटतं होता. आज खूप शांत वाटत होत. मनातली खळबळ आता शांत झाली होती. आजची प्रसन्न सकाळ तिला जिच्यामुळे लाभली त्या आईला ती मनोमन धन्यवाद देत होती.


चाळीशीच्या टप्प्यावर पोचता पोचता रागिणी स्वतःला पार विसरून गेली होती. घर, पैसा, मुले, शिक्षण, नोकरी अशा अनेक व्यापात गुंतून ती एकसुरी आयुष्य जगत होती.आताशा पहाटेपासून रात्रीपर्यंत सगळी कामे आटोपतांना खूप दमछाक होत होती.मुलांसोबत दंगा मांडणारी ममा, नवऱ्याची प्रेयसी आणि उत्साहाने रसरसलेली रागिणी हरवत चालली होती.या वयातले शारीरिक बदल तिला सतावत होते, आणि चिडचिडेपणा वाढवत होते.नवरा, मुले सगळेजण आपल्याला गृहीत धरतात, आपल्या मनाचा विचार करतं नाही असं वाटायला लागलं होतं.आपण जे काही करतोय ते आपल्याच लोकांसाठी हे जरी खरं असलं तरी कुठेतरी याचा कंंटाळा आला होता.घरची मंडळी आपापल्या परीने मदत करायची, पण तरीही मनात खूप घुसमट जाणवत होती.सगळेजण आपापल्या विश्वात दंग आहेत,आपल्याला कुणीच समजून घेत नाही असं सारखं तिला वाटत होतं.हळुहळू ह्या सगळ्यामुळे घराचा सूर बिघडत होता.उत्साही रागिणी हळूहळू गप्प राहू लागली.घरातला संवाद थोडा हरवत चालला होता.


तिची आई आपल्या लेकीची तडफड खूप दिवसापासून बघत होती शेवटी एक दिवस तिने रागिणीशी बोलायचं ठरवलं.आई म्हणाली"रागिणी मी खूप दिवसापासून तुझी तडफड बघतेय.अग, सगळ्याच बायका या फेज मधून जातात. लग्न झाल्यापासून आपण स्वतःला संसारासाठी झोकून देतो.माझं घर, माझा संसार ह्यापलीकडे काही वेळ स्वतःसाठी असावा हेच विसरतो. नवरा, घर, मुलं, नोकरी या सगळ्या व्यापात स्वतःच्या मनाकडे मात्र दुर्लक्ष करतो. खरं तर आपलं शरीर आपल्याला कायम सावध करत असतं पण आपण मात्र माझं घरटं, माझी पिल्लं यातच अडकून त्याकडे लक्ष देत नाही. आपण घराचा सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ, आणि तोच जर ढासळला तर ?सगळ्यानां वस्तू हातोहाती देण्याची सवय लावलीस,आणि सगळी कामंपण पुढे पुढे होऊन करत राहीलीस.त्यामुळे आता घरच्या लोकांना तीच सवय झाली आहे.मला वाटतं तू या सगळ्या पासून थोडा ब्रेक घे. थोडा स्वतःला वेळ दे. बघ कदाचित तुला शांतता लाभेल आणि घरचे तुला जे गृहीत धरतात त्यांना पण उमजेल.कधी तरी त्यानां पण जबाबदारी घेऊ दे. अंगावर पडलं की बरोबर जमेल त्यानां.पुन्हा स्वतःचा नव्याने शोध घे"


आईचं ऐकून रागिणी आठ दिवसांसाठी ऋषीकेशला आश्रमात आली.पहीले दोन दिवस तर तिने सगळ्यांना प्रचंड मिस केलं पण हळूहळू स्वतःशी संवाद साधता येऊ लागला.ध्यान धारणा, आश्रमातील प्रवचने, सुंदर वातावरण ह्या सगळ्याचा सकारात्मक परीणाम होऊ लागला. स्वतःशीच संवाद होऊ लागला आणि मनातलं साचलेलं मळभ दूर होऊ लागलं.खरं तर प्रत्येकजण आपल्याजागी बरोबरच होता, पण सततच्या सहवासामधे एकमेकांना गृहीत धरण्यात येत होतं.आता रागिणीला तिचं घर खुणावत होतं.


आज आश्रमातील मुक्काम संपवून निघालेल्या रागिणीला घरट्याची आणि पाखरांची ओढ लागली होती आणि घर तिच्या स्वागताला सज्ज होतं.आज रागिणीला जुनी उत्साही ती परत सापडली होती, जी नव्या उमेदीने पुढची नवी इनिंग खेळायला सिद्ध होती.आज तिला जाणवतं होतं आयुष्यात उत्साह टिकवून ठेवायचं असेल तर

"एक ब्रेक तो बनता है"


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational