anagha jagdale

Children Stories

4.7  

anagha jagdale

Children Stories

कधीकधी खोट बोलणं चांगल असतं!

कधीकधी खोट बोलणं चांगल असतं!

2 mins
212


सलील वय वर्षे तीन,मन लावून चित्र काढत बसला होता,कागदावर काढलेल्या आडव्या तिडव्या रेषा आणि भरपूर भरलेले रंग ह्यामुळे त्याने नक्की काय काढलं होत हे कळेना.पण तो मात्र त्या चित्रकलेच्या दुनियेत अगदी रममाण झाला होता.दोन तास मनसोक्त चित्र काढल्यावर तो स्वतःवरच खूष होता.

आनंदाने त्याने चित्र त्याच्या श्वेता ताईला दाखवले.

"ताई बघ ना माझे चित्र! छान काढलयं ना!"


आडव्या उभ्या रेषा आणि अगणित रंग भरलेले ते चित्र पाहून श्वेता ताईने मात्र नाक मुरडले.

"काय बेक्कार चित्र काढलयसं रे.नक्की काय काढायचं होतं काहीच कळत नाही.तुला काहीच जमत नाही, ढ कुठला"


ताईच्या उद्गारांनी सलील रडवेला झाला.तो चित्र फाडायलाच निघाला.पण हिरमुसलेल्या सलीलला आईने मात्र जवळ बोलवून शाबासकी दिली."सलील छानच काढलयं रे चित्र! वा,मस्त!अशीच चित्र काढत राहा. हळूहळू चांगली चित्र काढशील"


"काहीतरीच काय ग आई? कशाला पण शाबासकी देते. खोट खोट कौतुक का करतेस त्याचं?"श्वेता म्हणाली


आई हसली"अग, मला माहीतीय त्याने चित्र चांगल नाही काढलयं पण जर मी आज खोट कौतुक केलं नाही तर त्याला वाटेल की त्याला चित्रकला येतच नाही आणि तो कदाचित भविष्यात पुन्हा चित्रही काढणार नाही. आताचा माझा खोटेपणा त्याच्या चांगल्यासाठीच आहे.


बरेचदा कधी कधी खोट बोललेलं चांगल्यासाठीच असतं.तुला आठवतयं का तू लहानपणी सायकल चालवायला शिकत असतांना आम्ही सायकल पकडून तुझ्यासोबत असावं असं तुला वाटायचं. आधी आधी आम्ही तुझं ऐकलं पण एक दिवस आम्ही पकडलयं असं सांगून सायकल पकडलीच नाही आणि तुला चालवायला जमलं ना! तेव्हा जर तुला खरं कळलं असतं तर घाबरून तोल जाऊन पडली असतीस आणि भीती वाटून कदाचित पुढे सायकल शिकायला नकार दिला असतास.बघ तेव्हाच आमचं खोटं तुझ्या भल्यासाठीच होतं ना"


आईचं बोलणं ऐकून श्वेता विचारात पडली."पण खोटं कधी बोलू नये असंच तर शिकलोय ना" इति श्वेता.


"हो, खोट कधी बोलू नये.पण जर आपल्या एखाद्या छोट्याशा खोट्या बोलण्याने समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद पसरत असेल,त्याला काम करायला हुरुप येत असेल तर थोडीशी खोटी कौतुकाची थाप देण्यात काहीच गैर नाही.उलट थोडसं खोट कौतुक करून जर तू त्याच्या चुका सांगितल्या तर तो तुझं ऐकेल पण."आईचे बोलणे श्वेताला थोडेथोडे पटले.


श्वेताताईने सलीलला जवळ बसवून त्या चित्रात सुधारणा पण सांगितली आणि सलीलने शांतपणे ऐकल.


Rate this content
Log in