Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Ujwala Rahane

Tragedy


4.2  

Ujwala Rahane

Tragedy


एक अक्षम्य अपराध

एक अक्षम्य अपराध

2 mins 235 2 mins 235

  आज मी अपयशी ठरलो होतो,आदर्श विद्यार्थी माझ्या हाताने मी घडवले. सुपुत्राला घडवण्यास अपयशी ठरलो. गुरूजी धाय मोकलून रडत होते.


  मी त्याचाच विद्यार्थी होतो. पण कर्तव्याने माझे हात बांधले होते. नाईलाजाने मला त्याचा मुलांला बेड्या ठोकायला भाग पडले.


 गुरुजी हो! एक आदर्श व्यक्तीमत्व आज कितीतरी महान रत्न यांनीच घडवले. विद्यावंत, किर्तीवंत, ज्ञानवंत म्हणून त्याची ख्याती.


  रस्त्यांवरून गुरूजी चालताना भले भले खाली वाकून गुरूजींना नमस्कार करायचे.


 आज मात्र शरमेने मान खाली त्याची मान झुकली होती.


  खुपदा मी त्याच्या मुलाला दम दिलेला. संगती गुण दोषन! वडलांचा मान ठेव म्हणून धमकावून झाले.


  लहान वयातच त्याच्या शरिराला नाना व्यसन गोचीडगत चिटकून बसलेली.


 कधीही भेटला कि,मी त्याला म्हणायचो सोड हे सगळे गुरूजींना समजले तर सगळे संपेल रे त्यांचे.!.


  त्याचं उत्तर ठरलेलं 'दो दिन का जिंदगी है, इन्स्पेक्टर जिओ मजे के साथ'


   वाईट वाटायचं कोणत्यान न् कोणत्या गुन्ह्यात तो अडकायाचा माझ्यामुळे सहीसलामत सुटायचा.


 लहान वयात धुम्रपान हा तर कैक वेळा झालेला गुन्हा. आज त्याच्या फुप्फुसाची झालेली चाळणी याला जबाबदार अप्रत्यक्ष पणे मी होतो.


 गुरूजींचा आदर्श व मान सांभाळता सांभाळता एक जिवाला नाहक मी मारले होते.


 वेळीच आवर घालायला हावी होती. पण आता वेळ निघून गेली होती.


 आज २४तास बाटलीत बुडालेला तो सिगरेटने तर त्याच्या फुप्फुसाची चाळण केली होती.


   प्रकरण सुधारणेच्या पलिकडे गेले होते. आज नाईलाजाने मला त्याला बेड्या घालून रिहॅबिलिटेशन संस्थेच्या स्वाधीन करावे लागणार होते.खुपच व्यसनाधीन झाला होता.तो खुप व्हांयलेंट होत होता.


  आजूबाजूचा त्याचा मित्रपरिवार केंव्हाच त्याला सोडून गेला होता.


  बेड्या ठोकताना तो म्हणाला सर, एक सिगरेट सर फक्त एक शेवटची, बाबांना मला दाखवायचे आहे 'दो दिन का जिंदगी है जिओ मस्त मजे मे'हे वाक्य माझ्या कानात घुमत होते.


 खरच आपराधी मी होतो. गुरूजींनी परोपकार करता, करता घरातला वाहता झरा मात्र कोरडा ठणठणीत केला होता.


  खऱ्या अर्थाने शिक्षा मला झाली होती जिवनभराची. फक्त सद्गुणाचे व कर्तव्याचे कवच पांघरलेली, कोणालाही न दिसणारी,सिगरेट पेक्षाही आती महाभयंकर मादक पदार्थांनी माझ्या शरीराची चाळण करणारी.


 नक्की कोण अपयशी ठरले होते गुरूजी कि मी?अनुत्तरीत प्रश्न?


Rate this content
Log in

More marathi story from Ujwala Rahane

Similar marathi story from Tragedy