The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Pallavi Udhoji

Tragedy

1.0  

Pallavi Udhoji

Tragedy

एक अघोरी भीती

एक अघोरी भीती

4 mins
744


आज दिवसभर ऑफिसमध्ये खूप कामं होती. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होते. विरुंगळा म्हणून मध्येच एकमेकांची चेष्टा मस्करी करत होते. दिवसभर काम करत प्रत्येकजण ऑफिस सुटण्याची वाट बघत होते. संध्याकाळचे सहा वाजले. जातांना पंचींग करून सगळे आपापल्या घरी गेले. वैशालीच्या मनात मात्र काही वेगळाच चालला होत ती खूप उदास होती.तिने त्यादिवशी वरवर दाखवले मनातलं कोणाजवळ बोलली नाही. सगळ्यात शेवटी ती निघाली. रस्त्यात डोक्यात वेगळेच विचारांनी काहूर माजवले. घरी कशीबशी पोहचली. घरी सासूबाई वाट बघत होत्या. त्या सासुबईची भूमिका आई म्हणून बजावत होत्या. त्या तिची आई बनून माया करत होत्या.

  

 ते घर पूर्ण वैशालीच्या पगारावर चालत होतं. काही वर्षांपूर्वी प्रवीण म्हणजे वैशालीच्या यजमान ह्यांचा कार अपघातात निधन झालं. त्यांचा जागेवर वैशाली रुजू झाली. ती तेव्हा गर्भवती होती. तिला छान गोंडस मुलगी झाली रिया.रिया आता सात वर्षाची झाली. ती आपली जबाबदारी पूर्णपणे सांभाळत होती. आईना आज जाणवलं आज काहीतरी बिनसलं आहे. ती वैशालिजवळ गेली पाठीवरून हात फिरवला ती जवळ जाऊन धाय मोकलून रडु लागली. काय झालं वैशाली. वैशाली रडत रडत बोलली की आज मला ह्यांची खूप आठवण येते हो आई. का मला आणि रियाला सोडून गेले? मी असं काय वाईट केलं की माझ्या बाबतीत असं व्हावं.

    

रिया जसजशी मोठी होऊ लागली तसतसे समाजात ज्या घटना घडत आहे त्या घटनांनी वैशाली भयभित होऊ लागली. जेवणं आटोपली रियाला घेऊन वैशाली रूममध्ये गेली. तिच्या गालावर चुंबन घेऊन तिला अंगाई गीत गाऊन तिला झोपवत होती आणि बेडवर झोप लागली. रात्रीचा काळोख अंधार, रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. अशा काळोख रात्री काही लोकांचा गराडा येत असलेला वैशालीने पहिला ती खूप घाबरली. तो जसजसा जवळ येत होता तिच्या हृदयाचे ठोके खूप वेगाने वाढत होते. ते जवळ येताच एकदम ओरडून दचकून वैशाली जागी झाली. आई धावत रूम मध्ये आल्या. वैशालीच्या डोक्यावरून हात फिरवला तिला जवळ घेतले व दिलासा दिला घाबरु नको वैशाली मी आहे. आई म्हणाली की खरोखर एका स्त्रीला तिचा जीवनसाथी सोडून जाणे हीच कल्पनेच्या पलीकडचे गोष्ट आहे.

रिया लहान आहे तिचं पूर्ण आयुष्य पडलं आहे. वैशालीच्या समजेना काय करावं. अख्खं आयुष्य कसं काढायचं. रियाला तिच्या वडिलांचे प्रेम मिळेल का? जोपर्यंत आई सोबत आहे तोपर्यंत ठीक मग नंतर काय? असे अनेक प्रश्न तिच्या डोळ्यासमोर उभे होते.

    

तिला दिवसेंदिवस खूप भिती वाटायला लागली आणि एक दिवस तिला एक तरुण मुलगा भेटला. तिच्या ऑफिसमध्ये आला. त्याचा नाव दिनेश. दिसायला रुबाबदार, देखणा, उंच, गोरापान होता. त्याची ओळख वैशालीशी झाली. त्याला वैशाली पाहतच क्षणी आवडली. हळूहळू त्यांची मैत्री झाली. मग रोज भेट होत होती. तिने ही गोष्ट आपल्या आईला सांगितले. आईला खूप आनंद झाला. त्याला घरी घेऊन ये. आपण बोलू त्याचाशी. दिनेश घरी आला आई त्याच्याशी बोलली. आईला तो पसंद आला. मुहूर्त बघून लग्नाचा दिवस ठरला. लग्न थोडक्यात केले. हळूहळू त्यांचा संसार फुलू लागला.

 

        अचानक एक दिवस वैशाली ऑफिसमधून घरी आली. घरचं वातावरण खूप भीतीदायक तिला दिसला. दिनेश व आई तिला रडताना दिसले. काय झालं तुम्ही का रडता वैशालीने विचारला. वैशाली खूप भयभीत झाली. नियती आता कोणता घाव आपल्यावर घालेल ह्या विचारांनी तिची छातीत खूप धडधडायला लागलं. दिनेश सांगू लागला रिया आज शाळेतून घरी आलीच नाही. सगळीकडे शोधलं पण रिया कुठे नव्हती. वैशाली एकदम स्तब्ध झाली. तिची बोलतीच बंद झाली. डोळ्यासमोर सगळा अंधार पसरला. पोलिसमध्ये तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना रिया एका माणसाजवळ रडताना दिसली. पोलिसांनी त्या माणसाला पकडला आणि ताब्यात घेतला. रियाला सुखरूप आणून घरी सोडलं. पूर्ण कुटुंब त्या दिवशी आनंदात होत.


    काही वर्ष गेले रिया आता खूप मोठी झाली. रिया खूप देखणी, सुंदर, लांबसडक केस. पाहतच कोणीही तरुण मुलगा तिच्या प्रेमात पडेल अशी ती दिसत होती. तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. हिला कसा मुलगा मिळेल. परंतु रियाला लग्न करायचे नव्हते कारण लहानपणापासून तिला आपल्या आईचा संघर्ष दिसत होता . तिला खूप शिकायचे होते शिकून कलेक्टर व्हायचे होते. ते तिचं स्वप्नं होत. दिनेश आणि वैशालीच्या तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली. तिची इच्छा त्यांना पूर्ण करायची होती. सगळ्या परीक्षा तिने उत्तम रीतीने पास केल्या. आणि एक दिवस उजाडला. रिया कलेक्टर झाली. पण म्हणतात ना सुखदुःखाचा हा खेळ कधी संपत नाही. वैशाली हिच्या आयुष्यात सुख कमी दुखः जास्त होतं. रियाला कॉलेक्टरची पदवी मिळणार होती. त्या दिवशी ती खूप आनंदात होती. येताना मंदिरात गेली बाप्पाचे दर्शन घेतले. पेढे घेऊन घरी येताच तिला तिच्या घरासमोर लोकांची गर्दी दिसली. क्षणभर तिला काहीच कळले नाही. तिने त्या दिवशी मनात विचार केला की घरी जाताच आईला आनंदाने मिठी मारावी. पण घरात जाताच तिला समोर आईचे प्रेत दिसले तिला जबर शॉक बसला. नियतीला काय मान्य होते काय माहित. रियाच्या आनंदावर विरजण पडले. सगळेजण जिवाच्या आकांताने रडत होते. शेवटी आपल्या हातात काहीच नसतं. आयुष्याची दोरी किती लांब आहे हे कोणीही सांगू शकत नाही. त्यांचा आयुष्याला एक कायमची अघोरी भीती लागून राहिली.


Rate this content
Log in

More marathi story from Pallavi Udhoji

Similar marathi story from Tragedy