दयामरण
दयामरण
अभय ने आपल्या कडील लैच की ने दार उघडले आणि घरात आला. त्याची आई निर्मला चहा सगळा फरशी वर सांडून ओरडत होत्या. भाजले मला ,मला माझ्या सुनेने भाजले बघा बघा गरम चहा ओतला अंगावर माझ्या . अभय अभय अस त्या ऒरडत होत्या. रंजना ये रंजना काय करतेस? आले आले म्हणत हातात सुकलेले कपड़े घेवून रंजना आत आली. अहो आई काय केले हे तुम्ही? रंजना लघवी चा वास येतोय. आई ला बाथरुम मध्ये ने अगोदर. अभय वैतागला. रंजना ने आईना उठवले आणि बाथरूम मध्ये घेवून गेली त्यांना अंगोळ घालून दूसरा गाऊन घातला. रूम मध्ये नेवून त्यांना डायपर लावून बाहेर आली. अभय फ्रेश होऊन डायनिग टेबल कड़े आला. रंजू मला आता हे सहन होत नाही . ख़ुप मनस्ताप होतोय. तू ही दमतेस आई च्या मागे मागे करून. मला तर काही समजत नाही यातून मार्ग काहीच नाही का? अहो अस कस बोलता ? आई काय हे सगळ मुद्दाम हुन करतात का? त्यांना अल्झाइमर चा आजार आहे. त्यामुळे त्यांच्या लक्षात काही राहत नाही. नैसर्गिक विधी वर ही त्यांचा कंट्रोल नाही. एक बाई कामाला ठेवली होती ती ही जास्त दिवस नाही टिकली.
रंजू अभय शी लग्न करून या घरात आली तेव्हा निर्मला ताई नी तिला मूली सारखे प्रेम दिले कारण त्यांना दोन मुलेच होती. मोठा निशांत तो अमेरिके ला गेला आणि तिथेच राहिला. अभय ने आई ला वडिलांच्या माघारी सांभाळले. त्यांचे वय झाले तसे त्यांना हा अल्झाइमरचा त्रास सुरु झाला. रंजू ख़ुप मायेने त्यांचे सगळ करत होती. पण आई च सतत ओरडन,रात्री अपरात्री रङन,मोठ्याने बड़बड़ने याचा अभय ला त्रास होत होता. छोटा समीर ही वैतागत होता. पण नाइलाज होता या आजारा वर म्हणावे तसे औषध उपयोगी पड़त नव्हते. हा एक मानसिक आजार होता. आपण जेवलो,आंघोळ केली या गोष्टी ही निर्मला ताई विसरत होत्या आणि पुन्हा आंघोळ करायच्या. ग़ार पाणी ओतुन घ्यायच्या. निशात ने आई ची जबाबदारी पूर्णपणे झटकून दिली होती. अभय ला आई कड़े लक्ष देणे भाग होते. कधी कधी निर्मला ताई ना झोपेच्या गोळ्या देवून झोपवावे लागत असे पण त्या गोळ्या ही क्वचित केव्हा तरी. सतत त्या गोळ्या देण ही रिस्की होते. अभय ला आणि रंजना लाही या परिस्थितिचा त्रास होत होता पण निर्मला ताई जाणून बुजुन करत नव्हत्या हे समजून दोघे ही आप आपल्या परीने आई ची सेवा करत होते.
आज दिवस भर निर्मला ताई अखंड बडबडत होत्या. निट जेवण ही त्यांनी केले नाही.रंजना त्यांच्या मागे मागे करून दमली होती. संध्याकाळी अभय घरी आला तर काय ,निर्मला ताई नी आपला गाउन काढून टाकला होता. रंजना ने पाहिले तशी पळत येऊन तीने त्यांना बेडशीट मध्ये गुंडाळले आणि आत नेले. अभय ला आता संताप येत होता. या वर काही तरी उपाय करने गरजेचे होते. रात्री तो रंजू शी बोलला की मी आता गप्प नाही बसणार . मग काय करणार आहात.रंजू ने विचारले. मी वकीलाला भेटतो आणि आई ला दया मरण देता येईल का बघतो. अहो काही ही बोलता तुम्ही? रंजू अग मी काय आनंदाने हे करणार आहे का? आई चे हाल मला बघवत नाहीत. आणि तिला ही त्रास होतो ग. इच्छा नसताना ही हे कठोर पाऊल मला उचलावे लागत आहे. ठरल्या प्रमाणे अभय वकीलां कड़े गेला आणि आई चे होणारे हाल आणि सद्य स्थिति त्यांना सांगितली. वकील म्हणाले की जे रुग्ण असहाय आणि दुर्धर आजाराने ग्रस्त असतात . त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जर त्रास होत असेल तर त्या रुग्णाला दया मरण किंवा इच्छामरण दिले जाते, पण आपल्या देशात हा कायदा अजुन अंमलात नाही आला. त्या कायद्याची प्रोसेस अजुन सुरु आहे पण कधी अंमलबजावणी होतेय हे नाही माहित. त्यामुळे सध्या तरी असे इच्छामरण कोणा लाही नाही देता येणार. अभय मग घरी आला आणि त्याने रंजू ला सगळे सांगितले. आता काय करता येईल याचा विचार तो करत होता. मागे त्याने एका संस्थे बद्दल ऐकले होते. तिथे अशा अल्झाइमर झालेल्या रुग्णा ना एडमिट करून घेतले जाते . तिथे डॉक्टर्स आणि केयर टेकर ही असतात जे या रुग्नांची काळजी घेतात. अभय ने नेट वर त्या संस्थेची माहिती काढ़ली. थोड्याच दिवसात निर्मला ताईंना तिथे एडमिट केले गेले. घरातून जाताना त्या ख़ुप दंगा करत होत्या . आपल्याला येथून कोणीतरी घेवून जात आहे इतके त्यांना समजत होते. त्या रडत ही होत्या. अभय आणि रंजनाचे ही डोळे भरून आले. पण मनावर दगड ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला होता. निर्मला ताई गेल्या तस घर शांत आणि रिकामे रिकामे दिसू लागले. एक भयान शांतता घर भर पसरली. अभय रंजू ला आज जेवण ही नाही गेले. रात्री अभय लहान मुला सारखा रडला . रंजू या घरात मला राहण अवघड होईल इथे सतत आई नजरे समोर दिसेल आणि मी स्व:ताला दोष देत राहीन. त्या पेक्षा आपण हे घर विकु आणि दूसरी कड़े राहु. तुम्हाला जसे योग्य वाटेल तसे करा पण आईं च्यां बाबतीत तुम्ही दोषी नाही आहात. परिस्थितिच तशी होती त्यामुळे तुम्ही काही ही चुकी चे नाही वागलात आणि त्या संस्थेत राहुन आई वर झाले चांगले उपचार ,नशिबाने त्या बऱ्या झाल्या तर चांगलेच आहे ना? नाही रंजू असे रुग्ण बरे होण्याचे चांसेस ख़ुप कमी आहेत. पण आपण आशा करू तशी . तुम्ही नका जास्त विचार करू. आपल्याला जितके शक्य होते तितके आपण आई साठी केले आहे. पण रंजू अशा प्रकारे आई घरातून गेली हे एक प्रकारचे तिचे मरणच नाही का? अहो अस काही मनात नका आणू . आपण हे घर लवकर विकु रंजना ने त्याला समजावले. अभय मग मनोमन आई ची माफी मागून झोपण्याचा प्रयत्न करू लागला.
अल्झाइमर म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे म्हणजे वाढत जाणारा विसराळूपणा ही एक गंभीर समस्या उद्भवू लागली आहे. या आजारामुळे अनेक व्यक्ती परवालंबी होत जातात. दैनंदिन व्यवहार करणेही त्यांना अशक्य होते. विस्मरण, स्थळ काळाचे भान कमी होणे, मूड बदलणे, वाक्ये बोलता न येणे, परत परत तेच शब्द येणे, ओळखायला न येणे, बोलणे न समजणे आणि एकूण भ्रमिष्टपणा ही वाढती लक्षणे दिसून येतात. शब्दसंपत्ती कमी होत जाते. वाक्यरचना तुटक होते आणि शेवटी व्यक्ती मूक होते. पुढेपुढे दैनंदिन व्यवहार जसे खाणे, पिणे, स्वच्छता, कपडे घालणे वगैरे गोष्टीही अवघड होत जातात.
