Sangieta Devkar

Tragedy

3  

Sangieta Devkar

Tragedy

दूसरी संधी

दूसरी संधी

10 mins
258


दुर्वा ये दुर्वा अग कुठे आहेस? सीमा आपल्या लेकीला आवाज देत घरात आली. सीमा ऑफिस वरून आली होती. पन दुर्वा कुठेच दिसेना तिने तिच्या रुम मध्ये जाऊन बघितले तिथे पण न्हवती. असे कधी होत नाही कुठे बाहेर जाणार असेल तर दुर्वा आई ला सांगून जात असे. दुर्वा दुपारीच कॉलेज वरून घरी येत असे. आता ती एस वाय बी कॉम ला होती. थोड्या वेळात विनोद घरी आला. त्याला पाणी देत सीमा बोलली अहो दुर्वा घरात नाही आणि कुठे गेलीय माहीत पण नाही. असेल इथेच जवळपास गेली असेल नको काळजी करू. विनोद म्हणाला. पण अस न सांगता जात नाही ती म्हणून काळजी वाटते. मग फोन करून बघ विनोद म्हणाला. गॅसवर चहा ठेवून सीमा ने दुर्वा ला कॉल लावला पण नॉट रिचेबल येत होता. अहो फोन लागत नाही तिचा सीमा बोलली. हे बघ थोडा वेळ वाटू पाहू मग ठरवू काय करायचे ते. विनोद म्हणाला. दोघांनी चहा घेतला. सीमाचे चित्त थाऱ्या वर नवहते. नको त्या शंका मनात येत होत्या. आता दोन तास होत आले होते दुर्वा चा काहीच पत्ता नवहता की फोन ही नाही आला. सीमा म्हणाली अहो आता वाट बघण्यात अर्थ नाही चला आपण पोलीस चौकित जायला हवे. काही बरे वाईट तर पोरी सोबत घडले नसेल ना? नको तो विचार करू नकोस सीमा पण त्या आधी तिच्या मैत्रिणीला कॉल लाव. हा म्हणत सीमा ने अनुजा दुर्वा च्या मैत्रीनी ला कॉल लावला. हॅलो अनुजा मी दुर्वा ची आई बोलतेय अग दुर्वा आज घरी आली नाही तुला काही माहिती आहे का ग? ती कॉलेज मधून कुठे बाहेर गेली आहे का? अनुजा -- काकू आज दुर्वा कॉलेज ला आलीच नाही आणि मला ही काही कॉल तिचा आला नाही. सीमा -- बर अजून कोणी मैत्रीनी आहेत तुमच्या त्यांचा नम्बर देतेस का? अनुजा -- काकू तुम्ही नका काळजी करू मी बाकीच्या मैत्रिणीना फोन करून विचारते असे बोलून अनुजा ने फोन ठेवला. नाही ओ अनुजा म्हणते की आज दुर्वा कॉलेजलाच आली नाही.

कुठे गेली असेल मग? चल सीमा जाऊ आपण पोलिसां कडे म्हणत ते दोघे बाहेर पडले इतक्यात दुर्वाचा कॉल सीमाला आला. हॅलो दुर्वा बेटा अग कुठे आहेस तू ? आणि कॉल का नाही केलास आम्ही किती काळजीत होतो. दुर्वा -- आई मी सांगते ते नीट ऐक मी माझ्या मित्रा सोबत लग्न केले आहे. आणि आता घरी परत येणार नाही. सीमा -- काय ? काय बोलतेस दुर्वा अग हे काय तुझं लग्नाचे वय आहे का? आणि तू आम्हाला का नाही सांगितलेस? दुर्वा -- आई तुम्ही लग्नाला परवानगी दिली नसती कारण मी ज्याच्या वर प्रेम करते तो मुलगा आमिर नाव त्याचे मुस्लिम आहे. त्याच्या घरी त्याचे लग्न करत होते म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केले. तुम्हाला पसंत असेल आमचे लग्न तर आम्ही घरी येऊ. सीमा -- तुला वेड लागले आहे का दुर्वा लग्न केलेस ते ही इतक्या लहान वयात अजून तुझे शिक्षण पूर्ण नाही झाले आणि त्यातून ही मुस्लिम मुलगा. आम्हाला हे लग्न कधीच मान्य नाही होणार. दुर्वा -- ठीक आहे आई मग माझी वाट नका बघू बाय म्हणत दुर्वा ने फोन ठेवला. सीमा काय बोलत होती दुर्वा सांग मला विनोद ने विचारले. सीमाचे डोळे भरून वाहत होते म्हणाली,आपल्या मुलीनेच आपला विश्वासघात केला. एका मुस्लीम मुलां सोबत तिने लग्न केले आहे. काय हे कसे शक्य आहे सीमा . दुर्वा लहान आहे ग तिला त्या मुलाने नक्की फसवले असेल चल आपण त्याची पोलिस कम्प्लेन्ट करूया. काही उपयोग नाही त्याचा आपली दुर्वा सज्ञान आहे तिच्या मर्जीने तिने लग्न केले आहे. सीमा आणि विनोद दोघाना हा फार मोठा अनपेक्षित धक्का होता. लोकांना काय सांगायचे हा मोठा प्रश्न त्यांना पडला होता. एकुलती एक लेक म्हणून खूप लाडात त्यांनी दुर्वा ला वाढवले होते. कसले ही बंधन तिला नवहते . याचा ती असा गैरफायदा घेईल असा विचार ही कधी त्यांच्या मनात नाही आला. वेळ जाईल तस तसे बाहेर आणि नातेवाईकांना ही बातमी समजली सगळी कडून त्यांना ऐकून घ्यावे लागत होते. दुर्वा ने परत त्यांना कधी संपर्क साधला नाही.

तिचे लग्न होऊन आता वर्ष होत होते. दुर्वा अमीर सोबत एका दोन रूम च्या घरात भाड्याने राहत होती. आमिरचे गाड्या रिपेअरचे गॅरेज होते. त्याच्या आई वडिलांनी ही या दोघांना स्वीकारले नवहते. एक दिवस आमिर घरी जेवायला आला. तेव्हा त्याला त्याच्या वडिलांचा फोन आला की त्याच्या आई ला हार्ट अटॅक आला आहे. तो तसाच न जेवता आई ला भेटायला गेला. त्याला एक बहीण आणि भाऊ होता. हा सगळ्यात मोठा होता. आई सिरीयस कंडिशन मध्ये होती. तिने आमिर ला घरी येऊन रहा अशी शपथ घातली. त्याचा ही मग नाईलाज झाला. घरी आल्यावर त्याने दुर्वाला हे सांगितले. तो म्हणाला मी तुला अधून मधून भेटायला येत जाईन तू इथेच रहा. आई ला बरे वाटले की मी तुला घरी घेऊन जाईन. आमिर अरे मी एकटी कशी राहणार? मला सवय नाही एकटी राहण्याची. आणि आपले लग्न झाले आहे. हो दुर्वा पण थोडे दिवसच मी आईचे मन वळवतो मग तुला नक्की घेऊन जाईन. दुर्वा ला कसेबसे समजावून आमिर त्याचे सामान घेऊन त्याच्या घरी आला. आता दुर्वा एकटीच पडली होती. शिक्षण ही मधयेच सोडून तिने लग्न केले होते. दिवसभर एकटी राहून ती कंटाळत असे. आमिर आठवड्यातुन एखादा दिवस किंवा दोन दिवस तिला भेटायला येत असे. दुर्वा दरवेळी त्याला विचारत असे की मला तुज्या घरी कधी नेणार आहेस. मी एकटी किती दिवस राहू? इकडे आमिर ची आई त्याचे कान भरत होती की तुझी बायको हिंदू आहे हे आपला समाज मान्य करणार नाही. तिला कोणी स्वीकारनार नाही. एक तर तिने आपला धर्म स्वीकारला पाहिजे नाहीतर तू तिला सोडून दे. आमिर ने दुर्वाला हे सांगितले की तुला आता माझा धर्म स्वीकारावा लागेल नाहीतर माझ्या घरी ही तुला घेणार नाहीत. पण दुर्वा ला हे कदापि मान्य नवहते . तिने याच अटीवर त्याच्या शी लग्न केले होते की ती त्याचा धर्म स्वीकारनार नाही. तेव्हा प्रेमाच्या नशेत आमिर तयार झाला होता पण आता तो तीच्या मागे लागला होता. आमिर ची आई त्याला बहिणीच्या लग्नाचा विषय पुढे करून त्याला ब्लॅकमेल करत होती. बहिणीशी कोणी लग्नाला तयार होणार नाहीत. तू आमचे नाव खराब केलेस. सगळे नातेवाईक नाव ठेवत आहेत. असे सतत बोलत असे. आता आमिर दुर्वा कडे 15 / 15 दिवस फिरकत नसे. तिला काय हवे काय नको हे ही पाहत नसे.तिने त्याला फोन केला तरी नीट बोलत नसे. आमिर च्या आई ने त्याला धमकी दिली की त्यांच्या जातीतील मुलीशी त्याने लग्न करावे अन्यथा मी जीवाचे बरे वाईट करून घेईन. मग आमिर चा नाईलाज झाला. दुर्वा बाहेर असेल आणि होणारी बायको घरी राहील या अटीवर आमिर लग्नाला तयार झाला. तसे ही दुर्वा आणि आमिर चे लग्न तिच्या इच्छेनुसार मंदिरात झाले होते पुढे कोर्टात रजिस्टर लग्न करू असे ठरवले होते पण आजतागायत ते झाले नाही त्यामुळे त्यांच्या लग्नाचा काही ही पुरावा न्हवता.

एक दिवस आमिर च्या आई ने त्यांच्या समाजातील मुली सोबत आमिर चे लग्न लावून दिले. आमिर आता दुर्वा कडे पूर्णपणे दुर्लक्ष करू लागला. दुर्वा वरचे त्याचे प्रेम संपुन गेले होते. दुर्वा आमिर ला सारखा फोन करत असे पण तो फोन घेत नवहता. घरी काही ही सामान शिल्लक नवहते . घरभाडे ही थकले होते. दुर्वा चे खाण्या पिण्याचे ही हाल होऊ लागले. एकदा तिने आमिर ला फोन लावला पण तो बंद होता. घर मालक घर भाड्या साठी मागे लागला होता. आमिर चा फोन बंदच येत होता कारण त्याने तो नंबर बदलला होता. दुर्वा ला समजेना की आता काय करावे. ती त्याच्या गॅरेज कडे गेली तिथे ही तो नवहता पण त्याचे लग्न झाले आहे आणी हे गॅरेज त्याने विकून टाकले होते. असे दुर्वाला समजले. हे सगळे ऐकून तिला शॉक बसला. ज्या प्रेमा साठी तीने आई वडिलांचा विश्वासघात केला त्यानेच तिला फसवले होते. ती वेड्या सारखी भान हरवून रस्त्याने फिरत होती. आता जगण्या सारखे काही शिल्लक नवहते. आई वडिलांनी तिच्या साठी घराचे दरवाजे कधीच बंद केले होते. भ्रमिषटा सारखी ती डोळ्यात आसवे घेऊन वाट मिळेल तिकडे फिरत चालली होती. पोटात काही नवहते आणि रखरखीत ऊन डोक्यावर तिला अचानक भोवळ आली आणि रस्त्यातच ती पडली. कोणीतरी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. दुर्वा ये दुर्वा जागी हो म्हणत शीला तिची मैत्रीण तिला उठवत होती. दुर्वा ने डोळे उघडले तसे शिला ने तिला पाणी प्यायला दिले. पाणी पिऊन दुर्वा उठली. दुर्वा अग काय अवस्था झाली आहे तुझी आणि तू कुठे चालली होती. चल मी तुला घरी सोडते. नाही शीला मला घर नाही मी जाईन कुठेपन. दुर्वा काय झाले आहे मला सांगशील? थाम्ब आपण माझ्या घरी जाऊ म्हणत शीला ने रिक्षा थांबवली. दुर्वा ला घेऊन ती घरी आली. शीला च्या घरी आई बाबा आणि एक छोटा भाऊ होता. शीला दुर्वाला घेऊन घरात आली. आई ही माझी कॉलेज ची मैत्रीण अचानक रस्त्यात चक्कर येऊन पडली म्हणून मी हिला आपल्या घरी आणले. शीला म्हणाली. असू दे शीला तिला आधी जेवू घाल मग बघू आपण काय करायचे. दुर्वा ला तिने फ्रेश होण्यास सांगितले. मग तिला जेवण दिले. दुर्वा फार थकली होती. त्यामुळे जेवण करताच ती झोपी गेली. संध्याकाळी दुर्वा शीला ला म्हणाली,मी जाते शीला माझ्या मुळे तुम्हा सर्वांना त्रास नको . दुर्वा तूच म्हणालीस ना की मला घर नाही मग कुठे जाणार आणि तुझे आई बाबा कुठे आहेत? काय झाले आहे मला सांगशील का? अचानक तू सेकंड इयर नंतर कॉलेज ला येणे बंद केलेस? दुर्वा रडू लागली आणि रडत रडत आज पर्यंत जे जे घडले ते सर्व तिने शीला ला सांगितले. दुर्वा नकळतया वयात तू खूप मोठी चूक केलीस पण आता आई बाबांची माफी माग ते तुला नक्की समजून घेतील. नाही ग शीला आता कोणत्या तोंडाने त्यांच्या समोर जाऊ? मी विश्वासघात केला आहे त्यांचा. तरी सुद्धा दुर्वा आता तुला तुझी चूक समजली आहे ना मग माफी माग हवे तर मी बोलते तुज्या आई बाबांशी. शीला दुःख याचे जास्त वाटते ग की मी आमीर ला ओळखू नाही शकले. त्याच्या वर आंधळे पणाने विश्वास ठेवला. दुर्वा ते झाले गेले आता तुला ही आयुष्याने दुसरी संधी दिली आहे असे समज आणि आई बाबां कडे जा नक्की चांगले होईल बघ. मग दुसऱ्याच दिवशी शीला ला सोबत घेऊन दुर्वा तिच्या घरी आली. दुर्वा ला बघून तिची आई सुन्न झाली . लाडा कोडात वाढलेली आपली लेक आज पार तिची रयाच गेली होती. अंगात त्राण राहिले नवहते तिच्या. आई ने तिला मिठीत घेतले कुठे होतीस दुर्वा ? अग तुझ्या काळजीने जीव कासावीस व्हायचा . आणि काय अवस्था करून घेतली आहेस स्वहताची? आम्हाला एकदा तरी भेटण्याचा प्रयत्न करायचा होता ना? आई तुम्ही मला माफ करणार नाही हे माहीत होतं मला म्हणून नाही आले कधी भेटायला पण खरच माज्या हातून खूप मोठी चूक झाली. त्याची शिक्षा मी आता भोगत आहे. दुर्वा आधी बस बाळा मग बोल आई म्हणाली. तितक्यात दूर्वाचे बाबा घरात आले तिला बघून भडकले तू काय करतेस इथे आमचे नाक कापलेस तरी तुझी इथे यायची हिम्मत कशी झाली. अहो आपलीच लेक आहे. ती चुकली हे मान्य आहे पण आता आली आहे ना परत . सीमा विनोद ला म्हणाली. काका दुर्वा सोबत किती भयानक घडले आहे हे तरी जाणून घ्या ती लहान होती म्हणूनच चूक झाली ना तिच्या कडून शीला विनोद ला म्हणाली. तिने केले तेव्हा तिचे ती बघेल विनोद म्हणाला. काका तूम्हीच दुर्वाला समजून घेणार नसाल तर मग तिच्या कडे जीव देण्या शिवाय दुसरा पर्याय नाही. असे नको बोलू शीला. हो काकू तुम्ही दुर्वाच काहिच ऐकून न घेता तिला हाकलून लावणार असाल तर हाच एक मार्ग तिच्या समोर आहे. काका मी सांगते दुर्वा सोबत काय काय घडले आणि मला कशी ती सापडली. मग ठरवा तुम्हाला जे योग्य वाटेल ते . असे बोलून शीला ने दुर्वांची सगळी हकीकत त्यांना सांगितली. तसे सीमा आणी विनोद चे डोळे भरून आले. किती ही नाही म्हंटले तरी दुर्वा त्यांची लेक होती. विनोद ने दुर्वाला हाक मारली तिला जवळ घेत म्हणाले इतकं तू सहन केलेस पोरी मग आम्हाला एकदा तरी सांगायचे ग. बाबा माझे चुकले मी खूप वाईट आहे . मला तुम्ही शिक्षा दया. दुर्वा आजाणत्या वयात प्रेम आकर्षक या गोष्टी मनावर हावी होतात त्यात तू वाहवत गेलीस. पण नशीब जास्त काही वाईट तुझ्या सोबत नाही घडले. तुझे लग्न ही कायदेशीर नाही ते ही चांगलेच आहे. आता तुला ही एक संधी देवानेच दिली आहे असं समज आणि सगळं विसरून नव्याने जीवनाची सुरुवात कर . विनोद म्हणाला. हो बाबा मला कळून चुकले आहे . आता मी माझे राहिलेले शिक्षण पूर्ण करीन. स्वहताच्या पायावर उभी राहीन. तुम्हाला न सांगता कोणतीच गोष्ट करणार नाही. फक्त तुम्ही दोघे कायम माझ्या पाठीशी रहा. हो बाळा आम्ही आहोत कायम तुझ्या सोबत सीमा दुर्वाच्या डोकयावर हात फिरवत म्हणाली.दुर्वा ने शीला चा हात हातात घेतला म्हणाली,शीला तू मला भेटलीस म्हणून आज मी माझ्या घरी आहे. तुझे आभार कसे मानू? दुर्वा मैत्री या साठीच असते ग. आणि आभार वैगरे नको मानू तू चांगली शिक आणि मिळालेल्या या दुसऱ्या संधी चे सोनं करून दाखव. नक्कीच शीला म्हणत दुर्वा ने तिला मिठी मारली. चहा नाष्टा करून शीला तिथून निघून गेली. दुर्वाच्या मनावरचे मळभ दूर झाले होते. देवाचे तिने मनोमन आभार मानले आणि नव्या आयुष्याला सामोरी जाण्यास सज्ज झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy