शब्दसखी सुनिता

Inspirational Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Inspirational Others

दुर्दम्य इच्छाशक्ती

दुर्दम्य इच्छाशक्ती

2 mins
180


     मनोहरराव गावातील शंभरी पार केलेले आजोबा... त्यांची प्रकृती उत्तम असायची. खुप मोठी फॅमीली होती. बायको, मुले, सुना, नातवंडे असे परिवार होता. खूप आनंदात राहत होते. मनोहर आजोबा आपल्या शेतातील घरात छान राहत होते. सगळ छान चालल होत. पण अचानक कोरोनाची साथ आली. आजोबा खूप काळजी घ्यायचे. घरीच राहायचे तरीही त्यांना कोरोनाची बाधा झाल्याच चाचणीतून निष्पन्न झाल. त्यांच्या शरिरात कोरोनाचा खूप मोठा संसर्ग झाल्याने अत्यवस्थ स्थितीत त्यांना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल. सुरूवातीला आजोबांची प्रकृती खूप चिंताजनक होती. त्यात त्यांचं वय जास्त असल्याने घरच्यांना सगळ्यांना चिंता लागुन होती. मुलाला तर खूप काळजी वाटत होती. कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. कोरोना पेशंटचे रूग्ण खूप दगावत होते. तर गावातील लोक म्हटले की आजोबांच वय खूप जास्त आहे, हाॅस्पिटलला नेऊन तरी काय फायदा होणार आहे?  तरूण मुलांना कोरोनाची बाधा झालेले पण जातात. तर आजोबांच तिथे काय खर अस सगळे बोलत होते. पण त्यांच्या मुलाने सतिशने लोकांच्या बोलण्याचा विचार नाही केला. त्यांनी आपल्या वडीलांना दाखल केल.    


हाॅस्पिटलमध्ये मनोहर आजोबांना दाखल केल्यावर त्यांच्यावर ट्रिटमेंट सुरू होती. मुलगा त्यांना दररोज भेटायला जायचा. खिडकीतुन बघायचा. त्यांना पाॅझिटीव्ह विचार सांगायचे. पण आजोबाही फोनवर आपल्या मुलाला सांगायचे... " मी तर मनाने खंबीर आहे सतिश, पण अरे या वार्डमधील खूप पेशंट माझ्या डोळ्यादेखत गेले. " सतिशला हे ऐकून खुप वाईट वाटायच. पण त्यांच्या वडीलांना त्यांना अस खचलेल बघायच नव्हत... तेव्हा सतिश त्यांना सांगायचा. " तुम्ही मनाने खंबीर आहात ना मग झालत, व्यवस्थित जेवण आणि औषध घ्या... आपले डाॅक्टर खूप चांगले आहेत तुम्ही लवकर बरे होणार बघा.... " मुलाच्या आणि डाॅक्टर, नर्स सर्वांच्या शब्दांनी त्यांना धीर आला. हरलेल्या मनाला आणि जगण्याची नवी उमेद मिळाली. मनाने ते पाॅझिटीव्ह राहायचे. इतक वय झाल होत पण त्यांना सगळ कळत होत. सुरूवातीला त्यांना जेवण जात नव्हत, तर हळूहळू जायला लागल. डाॅक्टरही त्यांना रोज सकारात्मक विचारा सांगायचे. आजोबांनी उपचाराला प्रतिसाद दिला. हळूहळू प्रकृतीत सुधारणा होत होती. आठ दिवसांत ते ठीक झाले. त्यांच्या मुलाला आणि घरच्यांना खूप आनंद झाला.      


मनोहर आजोबांना जेव्हा ते बरे झाले हे कळल तेव्हा त्यांनी डाॅक्टर आणि नर्सचे आभार मानले. जगण्याची आस आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला. आपल मन खंबीर ठेवल. भीतीमुळे रूग्णांची प्रकृती खालावते. कोरोनाच्या महामारीशी झुंज देताना अनेक तरूणांचा लढा अपयशी ठरल्याच आपण बघितल. पण मन खंबीर ठेवत आजोबांनी कोरनाला चितपट केल. कोण काय बोलतय याचा विचार न करता आपल्या स्वतःला खंबीर ठेवत ते या कोरोनाशी दोन हात करत होते. या कोरोनाशी त्यांनी लढा दिला... तो जिंकलाही आणि धोबीपछाड दिला. मनोहर आजोबा बर झाल्यावर हाॅस्पिटलमधुन त्यांना डीस्जार्ज मिळाला, तेव्हा डाॅक्टरांनी त्यांना गुलाबपुष्प देत त्यांना निरोगी आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. ते घरी आल्यावर घरच्यांना सर्वांना खूप आनंद झाला.     


कोरोना झाल्यावर कोण काय बोलतय याचा विचार करण्यापेक्षा डाॅक्टरांचा सल्ला व योग्य ते उपचार वेळेवर घेतले तर कोरोना बरा होता. यासाठी हे आजोबांच उदाहरण घेता येईल. कोरोनाशी लढा दिला आणि तो जिंकलाही. त्यांनी मनाला खंबीर ठेवलं. आजाराला खचून न जाता धैर्याने सामोर गेलं तर कुठलाही आजार हा त्यापुढे कमीच असतो.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational