Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Shobha Wagle

Tragedy


4.5  

Shobha Wagle

Tragedy


दुःख आई गमावल्याचे

दुःख आई गमावल्याचे

2 mins 960 2 mins 960

कुटुंबाचे सगळेच जण आपले असतात. पण त्यात ही आपली अत्यंत प्रिय अशी एक व्यक्ती असते. तिच्या शिवाय आपलं मुळीच करमेना अशी जिवा भावाची व्यक्ती म्हणजे माझी आई. जन्मताच मला फोडा प्रमाणे सांभाळुन सतत प्रेमाचा वर्षाव करणारी माझी आई.


माझ्या आईचे वय काही जास्त नव्हते. साठीच उलटलेली असेल पण अचानक काही ही आजारपण न येता अचानक तिर्व हृदयाचा झटका येऊन भाऊबिजेच्या दिवशी आम्हा सर्वाना सोडून गेली.

आईच अचानक असे जाणे किती दुःखद!!

 भाऊबिजेच्या दिवशी सर्व भाऊची एकत्र भाऊबीज माझ्याकडे करायची ठरवलेले होते. आईने मी येते तुला मदत करायला असं सांगणारी आई त्याच दिवशी स्वतः यमाकडे गेली. देवा देवा नको रे असे दुःख कुणाला देऊ. तो दिवस ती वेळ मी मरे पर्यंत विसरू शकणार नाही.


जो पर्यंत आईचा सहवास लाभतो तो पर्यंत प्रत्येक मुलाला मग कितीही मोठं असलं तरी 

त्याला स्वतः ला आपण लहान असल्याची भावना एक सुखद असते. आई गेल्यावर मात्र ते छत्र आपल्याकडून हिरावून घेतलं जातं. पोरकं असाह्य आधारा शिवाय जगायचं म्हणून एक भयंकर पोकळी निर्माण होते. प्रत्येक क्षणा क्षणाला ती जाणीव होऊन मन खूप दुःखी होतं.

मुलीच तर माहेरच नष्ट होतं.भाऊ वहिनी असले किती ही चांगलं वागवत असले तरी आई असताना माहेर हे खरंच माहेर. त्या माहेरावर अधिकार आधार वाटायचा. आता माहेरी गेलो तरी आईची उणीव र्तीवतेने जाणवते. वहिनी कितीही प्रेमळ असली तरी ती आई होऊ शकत नाही. आई ती आईच. ज्या मन मोकळ्या आईशी गप्पा मारत होतो. आईच्या डोळ्यांत जो मायेचा ओलावा ,मुलीची काळजी असायची तशी दिसणे अशक्यच. 


अगदी मी लहान असताना ,आई आजारी असायची आणी आईला त्रास होऊ नये म्हणून मी मला जमेल तशी तिचे कामे करायची. तिच्या बरोबर मी कष्ट उपसले म्हणून आई नेहमी मला सुखात आरामात बघण्याची स्वप्ने बघत होती. आणि कधी मुंबईला आली की मला तिची थोडी मदत व्हावी म्हणून माझ्याकडे यायची. आम्ही दोघी माय लेक एकमेकाला त्रास होऊ नये म्हणून घरातल्या कामात आमची चढाओढ असायची. माझ्या आईला मी खूप आरामात ठेवायचा विचार करत होते. तिला सगळी प्रेक्षणीय स्थळांना घेऊन जायचे होते. पण देवजीच्या मनात नव्हते आणि माझ्या नशिबात नव्हते. 


आई आई म्हणून हाक मारू आता कुणा??

आई तुझ्या शिवाय जिवनात रस नाही आता.

स्वामी तिन्ही जगाचा तुझ्या विना भिकारी

मज तूच एक होती जगता सर्व श्रेष्ठ माता.Rate this content
Log in

More marathi story from Shobha Wagle

Similar marathi story from Tragedy