दर्द ए दिल
दर्द ए दिल


टेकडी वर मस्त थंड हवा होती, सूर्य अस्ताला निघाला होता. दूरवर नजर जाईल तिकडे सूर्याचा केशरी रंग आभाळभर पसरला होता, बरीच लोक टेकडी वर वॉक साठी आले होते कोणी ग्रुप करून गप्पा मारत बसले होते. खूप प्रसन्न असे ते संध्याकाळ चे वातावरण होते.
मीरा आणि देवांश तिथे बराच वेळ शांत बसले होते. ते दोघे एकाच ऑफिस मध्ये काम करत होते. दोघां मध्ये मैत्री कधी झाली,ते बेस्ट फ्रेंड कधी बनले हे त्यांनी ही कळले नव्हते.आणि आता ते दोघ एका हळुवार,नाजूक नात्यात गुंतत चालले होते. देवांश पेक्षा मीरा जास्तच इमोशनली त्याच्यात गुंतत चालली होती.
ते त्याला माहित होत आणि जाणवत सुद्धा होत पण एकमेकांना सगळ्या गोष्टी शेयर करणारे , मनातलं सगळं बोलणारे या विषयावर मात्र काहीच बोलत नव्हते.एकमेकांची काळजी,आपलेपणा,जिव्हाळा हे सगळं त्यांना वाटत होतं,तसे ते वागत ही होते. देव च्या मनात खुपदा आले होते , हो देवांश ला सगळे ऑफिस मध्ये देवच म्हणायचे. तो अगदी वेडा झाला होता मीरा च्या प्रेमात पण तिला सांगू शकत नव्हता. बीकॉज शी वॉज मॅरिड अँड हँव अ चाईल्ड. पण आज मीरा ने त्याला ऑफिस मध्ये सांगितले की ती हा जॉब सोडून जाणार आहे सो तो तिला घेऊन टेकडीवर आला होता.त्याला तिच्या शी बोलायचे होते. मीरा दूरवर शून्यात नजर लावून बसली होती. तिचे हे मौन त्याला असहाय होत होते. तो म्हणाला, मीरा बोल काहीतरी, असं अचानक का तू जॉब सोडून चाललीस? काही प्रॉब्लेम झाला आहे का? सांग ना.
देव प्रॉब्लेम हाच आहे की आय एम स्टारटेड लाइकिंग यू अँन्ड आय कान्ट फरगेट यू देव.
मीरा यात प्रॉब्लेम काय आहे मग? मी सुद्धा तुला लाईक करतोच ना ? आणि हे आपल्या दोघांना पण माहित आहे फक्त यावर आपण काही बोललो नाही इतकंच.
देव, मी तुझ्यात नको इतकी गुंतत चाललीय आणि हे ठीक नाही रे. आपण खूप पुढे वाहवत जाण्या आधी इथेच थांबलेले बरे आहे. देव ने तिचा हात आपल्या हातात घेतला म्हणाला, मीरा इतकं सोपं नाहीय ग, तुझ्या पासून दूर राहणं,मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर.
हेच तर नको आहे मला देव , तू कितीही माझ्यात गुंतलास तरी तू हे कसे काय विसरू शकतोस कि आय एम माँरिड वूमन ! मीरा मला माहित आहे सगळं ,पण तुझा स्वभाव , तुझा आपलेपणा, माझी काळजी घेणं, हे कुठेतरी सुखावत गेल मला. तू खूप चांगली आहेस. पण तुझ्या नवऱ्याला मात्र तुझी कदर नाही हेच दुर्देव !
पण म्हणून मी तुझा गैरफायदा घेतोय असं काहीही मनात आणू नकोस. देव मी ओळखते तुला, तू कधीच कोणाकडे कसली अपेक्षा करत नाहीस सगळ्यांच्या मदतीला धावून जातोस. सगळयांना आपलं म्हणतोस, तू कधीच गैर वागू शकणार नाहीस. आय ट्रस्ट यू.
मग तरीही का जातेस माझ्या पासून दूर? निदान माझा तरी विचार कर ना प्लिज.
देव मला मान्य आहे, मी हि माझ्या नकळत तुज्यात गुंतत गेले, माझ्या नवऱ्याच्या स्वभावा ला कंटाळून , त्याच्या ड्रिंक्स पार्ट्या,त्याची अरेरावी,संशयी स्वभाव या सगळ्यात माझी होणारी अवहेलना,माझी तगमग यातून बाहेर पडण्या साठी मी तुझ्या मैत्रिची सावली शोधली, माझं मन तुझ्या जवळ हलकं केलं, नेहमी अश्रू ढाळायला तुझाच तर खांदा होता मला. पण या सगळ्यात आपण काही चुकीचे वागतोय हे जाणवलंच नाही रे. तुझं प्रेम,तुझा सहवास माझ्या मनाला शांत करायचा. मी स्वार्थी बनले होते देव. नवऱ्या कडून न मिळणारी आपले पणाची भूक, संवादाची भूक तुझ्या कडून पूर्ण करून घेत राहिले. पण मी हे कसे काय विसरले कि माझ्या मुळे तुझे आयुष्य भरकटू शकते. तू हुशार आणि स्मार्ट आहेस. कोणीही तुझ्या वयाची मुलगी तुझ्या प्रेमात पडू शकते देव, नॉट मि,,!! इतकं बोलून मीरा रडू लागली. देव चे ही डोळे भरून आलेले. त्याने तिच्या हातावर थोपटले, तो म्हणाला मीरा मला माहित आहे तू कोणत्या परिस्थितीत जगतेस, तुझा नवरा तुला कशी वागणूक देतो. आय नो एव्हरी थिंग. अशा परिस्थितीत कोणीही मायेचा, जिव्हाळ्याचा ओलावा एखादया दुसऱ्या व्यक्ती मध्ये शोधनारच हा निसर्ग नियम आहे यात तुझी काही ही चूक नाही ग. तू स्वत:ला दोष देऊ नकोस. आणि मी कसलीही अपेक्षा करत नाहीये तुझ्या कडून, मी तितका स्वार्थी नाही. मीरा परत विचार कर, हा जॉब नको सोडू ,दुसरा जॉब तुला कधी मिळणार? तो पर्यंत त्या नालायक माणसाचा त्रास तू सहन करत घरात बसणार आहेस का ? नाही देव, मी पूर्ण विचार केला आहे, मिळेल मला दुसरा जॉब. मीरा ला हे बोलताना देव बद्दल खूप वाईट वाटत होत, पण त्याच्या भविष्य साठी तिला त्याच्या मार्गातून बाजूला होणे गरजेचे होते.
देव अतिशय सरळ, शांत समंजस असा 28 वर्षाचा तरुण तर मीरा एका मुलाची आई. आणि हे नातं कोणालाच पचनी पडले नसते. सगळी कडे दोघांची बदनामी झाली असती. म्हणूनच मीरा ने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. देव ने त्याच्या बॅग मधून कॅडबरी काढली, दोघांना हि खूप आवडायची कॅडबरी ,एकमेकांना सोडून कधी हि एकट्याने त्यांनी कॅडबरी खाल्ली नव्हती. तिच्या समोर त्याने चॉकलेट धरले, म्हणाला, माज्या आयुष्यातली तू चॉकलेट आहेस, जिने आयुष्यात खूप गोडवा आणला. तसे ती हसून म्हणाली, मॅड इंजिनियर होण्या पेक्षा रायटर का नाही झालास? तसा देव म्हणाला, तसाच विचार आहे,हा जॉब सोडून तुझ्यावर कविता करत राहावी.... कारण तुज्याबद्दल किती ही लिहिले तरी शब्द कमीच पडतील मीरा.
कॅडबरी अर्धी तिला देत पुन्हा देव म्हणाला,ही माझी शेवटची कॅडबरी असेल,तुझ्या शिवाय ती खाण मला कधीच जमनार नाही. तसे मीरा ने त्याचा हात आपल्या हातात घेतला म्हणाली, देव काही लोक आपल्या आयुष्यात काही क्षणासाठी येतात, अगदी कमी वेळात खूप काही देऊन जातात. तुम्हाला समजून घेतात,कधी हसवतात तर कधी रडवतात देखील. पण त्यांचा थोड्याशा सहवासाने संपूर्ण आयुष्य जगल्याचा आनंद देऊन जातात, मी काय आणि तू काय असेच आहोत रे, वळवाच्या पावसा सारखं एक घटका येणार धो धो कोसळणार आणि दुसऱ्या क्षणात गायब. पण त्याच्या मुळे मनाला मिळणार गारवा कुठेतरी आतपर्यंत झिरपत राहतो कायमचाच! देव तू ही कुठेतरी मनाच्या खूप आत पर्यंत पोहचला आहेस रे, तिथे तू कायम असशील,जेव्हा तुझी मला आठवण येईल ना तेव्हा तो तुझ्या प्रेमाचा गारवा मला पुन्हा जगण्याची नवी उमेद देईल.
पण मीरा आपण मित्र म्हणून तरी राहू शकतो ना एकत्र?
नाही देव खूप उशीर होण्या पेक्षा आधीच मागे फिरलेले कधी ही चांगलेच. अधून मधून मी फोन करेन तुला. पण तू ही जास्त कॉल मेसेजेस करायचे नाहीत. देव मुळातच खूप सेंटी होता, आणि मीरा चे हे बोलणे ऐकून तो आतून तुटत होता,तो भावूक होऊन म्हणाला, इट्स नॉट फेयर मीरा, आता तू स्वार्थी बनते आहेस,थोडा माझा विचार कर, अँटलिस्ट बोलणं तरी राहूदे ना आपल्यात!
नको देव या मोहात मी अडकुन पडले तर बाहेर पडणं अवघड जाईल.
मीरा मग काय वाईट आहे त्यात,मी कायम साथ देईन तुला. मी लोकांची पर्वा कधीच नाही करत अँन्ड अवर ऐज डिफ्रन्स वॉज नो मॅटर इन अवर रिलेशन.आय जस्ट लव्ह यू मीरा .
देव मला हे पटत नाही, अँन्ड इफ आय डन अ मिसटेक देन प्लिज फरगिव मि. म्हणत तिने आपले हात त्याच्या समोर जोडले. तसा पटकन तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत देव म्हणाला आर यू मॅड मीरा,हे काय करतेस? तुझी काय चूक यात? चूक असेल तर माझी आहे , आय से सॉरी.
देव यात चूक कोणाची असेल तर ती माझ्या परिस्थितीची आहे. मला सगळं समजत होत,तरी मी तुज्यात गुंतत चालले होते,खूप एकटी पडले होते सो मला मानसिक आधार हवा होता. एक सच्चा जवळचा मित्र हवा होता. तू आमच्या ऑफिस मध्ये जॉईन झालास अन आपली मैत्री झाली पण आता मागे फिरण्यातच आपलं भलं आहे.
मग मीरा आपल्यात नेमकं नातं तरी कोणतं आहे सांग ना?
देव काही नाती अशी असतात ना त्यांना कुठल्याच लेबलची गरज नसते, आपण ती नाती फक्त अनुभवायची असतात मनापासून. हृदयात खोलवर जपून ठेवायची असतात,त्यांना एक विशिष्ठ नाव देऊन एका चौकटीत ती बंदिस्त नाही करता येत. खरंच आपल्यात पण असच नातं आहे खूप सुंदर ना प्रेम ना मैत्री पण या दोन्ही मधला मध्य बिंदू म्हणता येईल असं. पण जे आहे ते छान आहे, सुंदर आहे आणि ते तसच राहू दे,त्याला नावाची गरजच नाही. आता टेकडी वर बरीच गर्दी कमी झाली होती,संध्याकाळ संपून सूर्य पूर्ण मावळला होता अंधार पडू लागला होता, तशी मीरा म्हणाली, देव आता घरी जाऊयात आपण, उशीर होईल. तो जड अंतकरणाने उठला,पुन्हा एकदा तिचा हात हातात घेत म्हणाला, मीरा आय रियली मिस यू,डोन्ट डु धिस,,! त्याच्या डोळ्यात पाणी जमू लागले होते, कोणत्या ही क्षणी त्याचे अश्रू ओघळले असते इतका तो सेंटी झाला होता.
ती म्हणाली, इतक हळवं बनून राहू नकोस देव हे जग खूप वेगळं आहे,प्रॅक्टिकल आहे. मी कायम तुझी मैत्रीण असणार आहे. तिच्या ही डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली होती, तिला ही त्याला विसरणं, त्याच्या पासून दूर राहणं सहन होणार नव्हत. पण.... हे आयुष्यातले "पण च" माणसाला त्याच्या पुढे हताश ,हतबल करत असतात. देव ने तिच्या गाला वरचे अश्रू अलगद पुसले आणि पटकन तिला मिठी मारली, त्याला वाटलं हा काळ, हा क्षण इथेच थांबावा कायमचाच. हा अनुभव पुन्हा मिळणार नाही. ती ही मूक पणे त्याच्या मिठीत अश्रू ढाळत राहिली. काहीच न बोलता दोघ टेकडी उतरून खाली आली. देव म्हणाला, मीरा जिथं असशील तिथे आनंदी रहा, जास्त टेन्शन नको घेऊ, बी अ ब्रेव वूमन .. कारण सगळी कडेच देव नसणार ग, त्या मुळे सांभाळून रहा. ती काहीच बोलली नाही, दोघांनी बाय म्हणत शेकहॅन्ड केला,ती म्हणाली देव स्वताची काळजी घे, आणि तिच्या स्कुटी वरून ती निघून गेली. तिच्या जाणाऱ्या रस्त्या कडे पहात बराच वेळ देव तिथे थांबला,ती नजरे आड होई पर्यंत. मीरा घरी आली, सरळ बेडरूम मध्ये जाऊन ती बेड वर पडून खूप ओक्साबोक्सी रडली,देव चा चेहरा तिच्या नजरे समोरून जात नहवता ,तिला त्याचे अश्रू आठवत होते खूप रडली ती आणि रडत रडत म्हणू लागली, देव आय रियली लव्ह यू, आय मिस यू, स्टूपिड आय कान्ट लिव्ह विदाऊट यू . तिचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्ह ते आणि दूर वरून कुठेतरी गाण्याचे बोल मीरा ला ऐकू येत होत,, " देख लेना तेरे होठोपे हमेशा, मैं हसता हीं रहुंगा देख लेना, " देख लेना,भिगी जो 'तेरी आंखे,आंखोसे मैं बहुंगा ,देख लेना !!",,,
कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या आधीन आहेत,