Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

दो दिल एक जान - भाग सहा

दो दिल एक जान - भाग सहा

5 mins
283


          निल आणि सृष्टीची मैत्री आता हळूहळू फुलायला लागली होती. दोघांच्याही मनात वाढत चाललेली ही मैत्रीची वेल कधी असंख्य अश्या प्रेमाच्या नाजूक फुलांनी बहरून , दरवळू लागली हे दोघांनाही कळलंच नाही..! ते एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. आता तर एकमेकांना फोन नंबर देखील देऊन झाले होते. जेव्हाही दोघांना निवांत मिळायची. तेव्हा कधी मेसेज किंवा कधी कॉल करून त्यांच बोलणं व्हायचं. आणि रोज सकाळी पार्क मधे तर दोघेही न चुकता जायचेच ... कारण तेव्हा त्यांना एकमेकांना बघता यायच...😊...

               दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम फुलत होत पण दोघेही एकमेकांना सांगू शकत नव्हते. शब्द ओठांवर यायचे पण बाहेर पडत नव्हते. एकमेकांना बघितल्या शिवाय दोघांनाही करमत नव्हतं. एकमेकांशी बोलल्या शिवाय त्यांच्या दिवसचं जात नव्हता. कधी कामाच्या गरड्यात वेळ मिळाला नाही तर दोघेही अस्वस्थ व्हायचे. दोघांना काही तरी एकमेकांच्या खूप जवळ घेऊन येत होत..! काय होत..?? ते त्यांचं त्यांनाही कळत नव्हतं. दोघेही एकमेकांना सगळयाच गोष्टी सांगत. मात्र दोघांनी ही एकमेकांपासून एक गोष्टी जाणीवपूर्वक लपवून ठेवली होती ती म्हणजे.., त्यांना पडणारी स्वप्ने..!! ठरवून देखील ते ही गोष्ट एकमेकांशी बोलू शकत नव्हते.

                  एक दिवस निल त्याचं काम संपवून बसला असतो. तितक्यात विन्या येऊन त्याच्याशी बोलू लागतो.....,

विन्या : " काय मग... काय म्हणते तुझी कविता..?? प्रपोज करायचा विचार आहे की नाही?? की फक्त कागदावरच उतरवत बसायचं आहे तिला..?? एखादा कोणी दुसरा शायर येऊन तिला शायरी बनवून घेऊन जाईल अशाने!! जे काय आहे..? लवकर बोलून मोकळा हो!!"

निल : " गप ना रे!! अजून मी नाही रे बोलू शकलो तिला. तिच्या मनात काय चाललंय हे ही नाही माहिती मला. आमची मैत्री खूप छान घट्ट झाली आता. पण मनात भीती वाटते... तिने नाही म्हटलं तर...!! नको..!! "

विन्या : " अरे वेडा की खुळा तू?? ती तुला नाही का म्हणेल?? तुला कुठलीही मुलगी नाही म्हणूच शकत नाही..! तू हँडसम आहेस , कर्तृत्ववान आहेस.., शिवाय एक मित्र म्हणून तर तू तिला आवडतोसच.. लाईफपार्टनर म्हणूनही तिला नक्कीच आवडशील...!! त्यामुळे जराही वेळ न घालवता विचार तिला..!"

निल : " हो यार विन्या, तू बरोबर बोलतोस खरा! पण मी असं कॉल वर कसा बोलू तिला..?? सकाळी पार्क मधेही बरेच लोक असतात...!!! असा कसा बोलू मी तिच्याशी??? "

विन्या : " अरे वेड्या, कवी आहेस ना!! एखादा रोमँटिक विचार कर ना!! काय तू पण?? 😂 तिला कुठेतरी बाहेर ने डेट वर!😊 एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी... असं सुंदर वातावरण असलं की मनातले शब्द ओठांवर यायला वेळ नाही लागणार..?? बाकी तू हुशार आहेसच 😊.. लाव तिला कॉल.. उद्या सुट्टी आहे दोघांनाही.. जाऊन ये कुठेतरी.. हवं तर माझी बाईक ने!!😊.. कार पेक्षा बाईक वर जास्त रोमँटिक वाटत.. 😊"

          विन्या आणि निल हसायला लागतात. नीलला त्याचं बोलणं पटत. तो लगेच सृष्टी ला कॉल करतो.

सृष्टी : " हॅलो..!! बोल निल..? काय म्हणतोस?? "

निल : " हॅलो..!! कशी आहेस?? उद्या फ्री आहेस का?? "

सृष्टी : " मी ओके आहे रे 😊!! उद्या फ्री आहे.. काय झाल?? काही काम होत का?? "

निल : " नाही काम म्हणून नाही.. सहजच... उद्या कुठे बाहेर जाव म्हणतोय..! तुला वेळ असेल तर?? नाही तर असं काही नाही..!!!"

सृष्टी : " हो चालेल ना! खरच मी ही बोर झाले होते रे.. बरेच दिवस झालेत.. कुठे भटकायला गेलेच नाही.. एखाद्या शांत.. निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडेल मला..!"

निल: " हो.. हो.. नक्कीच..!! मलाही तेच आवडतं... मी तुला पिकअप करतो सायंकाळी..!"

              

                 असं म्हणून नील फोन ठेवतो. आणि विन्याला थँक्यू म्हणतो. 😊 कारण विन्यानेच त्यांच्या थांबालेल्या गाडीला धक्का देण्याचं काम केल होत. दुसऱ्या दिवशी निल कधी चार वाजतील याचीच वाट बघू लागला. तिकडे सृष्टी च्या मनाची ही अवस्था काही अशीच झाली होती. सकाळी उठल्या उठल्या तिने रेडिओ ऑन केला....

            चाँद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना

               तू भी सून बेखबर.. प्यार कर..

                      हो हो हो.. प्यार कर

                   हातात तिचा टेडी घेऊन ती नाचायला लागली.. 💃 तिचे आई बाबा आश्चर्याने बघू लागेल..

आई : " सृष्टी.., काय ग... बरी आहेस ना!! काय झाल?? रिझल्ट आलाय का तुझा कुठल्या परीक्षेचा?? "

बाबा : " कुठली परीक्षा..?? अरे तू सांगितलं नाहीस आम्हाला?? काय ग?? कधी झाली?? "

सृष्टी :" काय ग आई 🙄?? मी अशी ही खुश होऊ शकते ना ग?? अहो बाबा.. नाही झाली कुठलीच परीक्षा वगैरे.. मी अशीच खुश आहे..' आज दिल शायराना शायराना लगता हैं '🥰"

माई : " अरे काय तुम्ही दोघेही?? कुठे परीक्षेच्या गोष्टी घेऊन बसलात?? लेक मोठी झाली तुमची..! प्रेमात पडली आहे ती.. 😊.. माझ्या म्हातारी ला कळलं आणि तुम्ही आई वडील असून नाही का ओळखू शकले..?? 😊"

सृष्टी : " काय ग माई हे...!!☺️ ( जरा लाजत ) असं काहीही नाही हं!! आम्ही फक्त मित्र आहोत..!

बाबा :" हो बाळा...! पण जर मुलगा, फॅमिली चांगली असेल तर हरकत काय आहे?? विचारून टाक त्याला..!!😊"

सृष्टी : " काय हो बाबा!! असं कस विचारणार ना!! त्याच्या मनात काय चाललंय हे कुठे माहिती आहे मला.. तो जर मला फक्त मैत्रीण समजत असेल तर?? असं कस विचारणार ना डायरेक्ट?? "

आई :" अग पण हरकत काय?? तू विचारून तर बघ? तो हो म्हणेल किंवा नाही, तो नंतर चा विषय आहे ना!! त्याला ही जर तू आवडतं असशील तर आम्ही त्याच्या घरच्यांशी बोलू तुमच्या लग्ना विषयी... काय हो!! तुम्हाला काय वाटत?? "

बाबा : " हो तू योग्य तेच बोलत आहे. सृष्टी तू कॉल करून विचार त्याला.. आम्ही बोलू का हवं तर ( गमतीने ) "

सृष्टी : " काय हो बाबा...?? नको..., तुम्ही नका बोलू...! मीच बोलेल त्याला...!! आज सायंकाळी चाललोय आम्ही बाहेर.. जमलं तर बोलेल त्याच्याशी... 😊"

                     सृष्टी निल ला भेटायला, त्याच्याशी बोलायला खूप उत्सुक झाली होती. तिला त्याला भेटून तिच्या मनातलं सांगायचं होत.. तिच्या प्रेमाची कबुली द्यायची होती. त्याला काय वाटत तिच्या बद्दल हे जाणून घ्यायचं होत. ती आज खूप आनंदाने तयारी करत होती. आरश्या पुढे उभी राहून स्वतःशीच बोलत होती, हसत होती... मधेच गुणगुणत होती...

                  सजना है मुझे सजना के लिए

                  सजना है मुझे सजना के लिए

                     ज़रा उलझी लटें संवार दूं

                     हर अंग का रंग निखार लू

                 के सजना है मुझे सजना के लिए

                   सजना है मुझे सजना के लिए

            तिकडे निल च्या मनाची ही अवस्था अशीच काहीशी झालेली होती. " कुठलं शर्ट घालू...!!!🤔 , ब्लॅक..., ब्लू..., की रेड...?? नको!! टी शर्ट घालू का नाहीतर??? पॅन्ट घालू की जीन्स....?? 🤔🤔" आज त्याने पूर्ण कपाटच रिकामं केल होत. मधेच मोठं मोठ्याने गात होता...

               "आज उनसे पहली मुलाक़ात होगी,

                   फिर आमने सामने बात होगी

              फिर होगा क्या, क्या पता क्या खबर "

         दोघांच्याही मनाची अवस्था अगदीच सारखी....!😊 बोलतील का हे दोघे एकमेकांशी?? देतील का आपल्या प्रेमाची कबुली??? कोण कोणाला आधी प्रपोज करेल?? हे कळण्या साठी पुढील भाग नक्की वाचा..... 😊


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance