Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF
Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF

Swapnil Kamble

Tragedy


1  

Swapnil Kamble

Tragedy


दिवाळी बोनस:-2

दिवाळी बोनस:-2

3 mins 3.7K 3 mins 3.7K

8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदि जाहिर केली गेली होती.त्यावेळी दिवाळीला एक हप्ता होता.जुन्या नोटा बंद करण्यात आल्या.लोकांकडे पैसे नव्हते.नविन व्यवहार करण्यासाठी , नविन खबरदरी करण्यासाठी.बँकेत पगार आला होता पण, हवी तेवढी रक्कम काढु शकत नव्हते.


दिवाळीचा सण तोंडावर आला होता. दिवाळी पुढच्या हप्त्यात आहे. बायकोला भरझारी साडी, मुलांना चांगले कपडे, ऑफिस, एक चांगल्या हॉटेलमध्ये जेवण. मुलीला एक सायकल… असे अनेक खर्च तसेच भाड्याचे पैसे, उधारी फेडून टाकू, बायकोला सोन्याचे कानातले, नाहीतर एखादा छानसा स्मार्टफोन. अशा स्वप्ननगरीतून व गर्दीतून मी प्लॅटफॉर्मवर चडतो. मी अनपेक्षितपणे भलीमोठी स्वप्न पाहत होतो.व त्या स्वप्नात मी माझा खर्चाची हिशोब मारीत असतो. मी दिवाळीच्या बोनसचा विचार करीत होतो ,आणि स्वप्न पाहत होतो. पुढील हप्त्यात माझ्या बँकेमध्ये जमा केले जानार.पण या वर्षी बोनसची अपेक्षा नको करायला.या वर्षी उमरखाडी रहिवाशी संघाची" घर जितो,कार जितो"लाँटरीच तिकीट जिंकले तर किती बरं होईल असे वाटत होते. मी खर्च मोजत होतो, खर्च कसा करावा आणि कुठे खर्च करावे ... आवश्यक खर्चाची कुठे कमी करायचा "केव्हा आपला लाँटरी ओपन होईल"! ....झ्या बायकोने माझी मस्करी केली. "तर लवकरच काळजी करू नको"... मी उत्तर दिले. "सर्व गोष्टींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे बोनस या दिवाळीसाठी पुरेशी नाही" बायको बोलली. पत्नीने मला चिंताग्रस्त केले .कुटुंब खर्च आणि बाजारभाव आणि खाण्यायोग्य आहारातील संकटामुळे महागाई झाली. मला निराशा आणि दुःखदपणात ढकलले गेले. पत्नीने माझ्यासमोर कौटुंबिक समस्या टाकली. मी निरुपयोगी अपेक्षांवर इतके स्वप्न चित्रित करत होतो. दिवसभरापूर्वीच मला सुपर जादूची अपेक्षा होती. कौटुंबिक खर्चामुळे मी निराश झालो. मी खिन्न उदास झालो .मी माझ्या घराच्या छतावर पैशांचा पाऊस पाऊस पाडण्याची इच्छा करीत होतो. माझ्या बायकोने माझ्या कुटुंब खर्चाची जबाबदारी टाकली आणि ती मला आठवण करून द्यायची. " केवळ 14000 रुपये बोनस वित्तीय संकटांमध्ये पुरेसे नाही."बायको म्हनाली ".. किंमती कशी आभाळाला स्पर्श तरी आहेत."ती म्हणाली ".... आपल्याला आणखी पैसे कमवावे लागतील ..त्यासाठी तुम्ही हव तर बँक सुटा कर्ज काढा किंवा ... किंवा काहीही करा ... परंतु ... आपल्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत ... आपल्यामुलांनी सनासुदिच्या दिवशी दुसर् याची घरची पायरी ओंलाडता पाहनार नाही...दुसर्याच्या घरात डोकावल नाही पाहीजे . जेव्हा दिवाळी मागणी वाढते आणि उत्पन्न कमी होते ... "मी माझ्या मुलाला इतर मुलांपुढे हात पसरविण्यास भाग पाडणार नाही" "जेव्हा ईतर मुले दिवाळीचे फटाके बॉम्ब, आतिशबाजी वाढवतात तेव्हा आपल्यामुलांना ही ईच्छा होत असते हे विसरु नका,ते खेळताना किती आनंदी दिसतात ते ... आम्हाला माहित आहे ... ... बायकोने मनाची व्यथा मांडली.


मला माहित आहे की जेव्हा दिवाळी येते तेव्हा परिस्थितीत माणुस दिवाळखोर असतो." माझ्या वडिलांनी नेहमीच असे म्हटले आहे की: "माणुस कोणतही सोंगघेईल पण पैस्याच सौंग करता येनार नाही.


त्या दिवशी मी लेट रात्रीची ट्रेन पकडली. शेवटची ट्रेन त्या दिवशी. शेवटची गाडी सीएस टर्मिनस जवळ जवळ 1:45. वाजता आली. मध्यरात्री. मी ट्रेनमध्ये शेवटची प्रवासी होतो. शेवटच्या स्टेशनपर्यंत झोप लागली . एका प्रवाशांनी कळवले .ताडकन जागा झालो.माझ लक्ष एका थैलीवर रॅककडे गेले. ती कोणी तरी विसरुन गेला होता.ती एक डफेल बँक होती.मी प्रत्येक कोपराचे निरीक्षण केले आणि मी माझ्या डोळ्याने जे पाहीले.ती पैशाने भरलेली होती .मी बॅग बंद केली.

प्रथम मला वाटले की, रेल्वे पोलिसांना जमा करावे लागेल, पण नंतर त्यांच्या चौकशीची भीती वाटत होती, मग विचार मागे घेतला आणि त्याऐवजी मी घरी घेऊन गेलोे. कोणीही याबद्दलची चौकशी करणार नाही आणि बॅगबद्दल संशयास्पद नाही. मनातील भिती व वासना मेंदूच्या सभोवताली फिरत होतीे. "इतक्या पैशांनी भरलेल्या बॅेगेचे काय करावे?" मी विचार केला. पैसे गुंतवण्याची माझी इच्छा होती की एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे पहायला मिळत होते. माझ्या वासना वाढल्या. माझ्या वासनांनी त्याची तीव्रता वाढविली .जर मी ते घेतले , तर माझ्या गरजा पूर्ण होतील. मी ते माझ्या घरी आणले ... शेवटी निर्णय घेतला. माझ्या पत्नीला मोठ्या डफेल बॅगबद्दल सांगण्याचा.


जेव्हा मी माझ्या पत्नीला पैशाने भरलेल्या पूर्ण बँग दाखवलीे .ती आश्चर्यचकित झाली. ती काही मिनिट बोलू शकली नाही. तिने आपली जीभ तोंडात अडवली होती. "एवढे पैसे" जोरदारपणे ती ओरडली. "ट्रोनमध्ये" "ओरडुन बोलू नको, भिंतीकडे कान आहेत" पत्नी शांतपणे म्हणाली.


मी सकाळी 5:00 वाजता सकाळी उठलो .मला पाण्याचा प्रेशरने जाग झाली.बायकोने पाणी भरले.माझी दिनचर्या केली.आंघोळ पांगोळ केली.देवापुढे अगरबत्ती लावली.व टिव्ही चालु केली पाहतो तर , ब्रेकींग न्यूज खुपच भयानक होती. आजपासु न "ब्रेकिंग न्यूज" चमकत होती की सर्व 500 आणि 1000 नोट्स बंद आणि बंदी जुन्या नोटांचे व्यवहार पुढील दिवशीपासून चलनातून बाद केले जाणार होते.. आज पासुन 500/1000 नोटांवर बंदी घातली जात आहे "

"30 डिसेंबर 2016 पर्यंत बँकेमध्ये सर्व पैसे जमा करा"आशा बातम्या झळकत होत्या.

होत्या आणि विचार केला की, "देवाने पैसे दिले पण ठेवायचा मार्ग बंद केला" पण बचत कशी करावी याचा उपाय सांगतला नाही.बायकोला ही बातमी पाहीली व तिच्या पायाखालची जमीनच सरकली.तिला काहीच सुचत नव्हते.

सरकारने यापुढे असे घोषित केले की,जुन्या नोटमध्ये कोणताही व्यवहार केला जानार नाही यापुढे.आणि "जर माझ्याकड बँग शंभर नोट्सच्या बंडलने भरलेल्या असत्या तर, उपयोगी आल्या असत्या.". ते माझ्यासाठी उपयुक्त होते.पण त्या डफेल बॅगेत पाचशे आणि हजार रुपयांनी भरलेली होती.

बायकोने एक शक्कल लढवली तिने आधी बँगमधुन काही पैसे काढुन बँकमध्ये डिपोझिट करायला लावले.मी ते घेवुन बँकेत गेलो.बँक कँशरने नोटा मशिनमध्ये चेक केल्या तर नोटा नकली निघाल्या.मी काहीतरी कारण सांगुन नोटा. घरी आले.बायकोला सांगितले की, 'घोळ झाला नोटा नकली निघाल्या'

"आपल्याशी देवाने गेम केला"मी म्हटले.

"नशिबच गांडु,तर काय करील पांडु" बायको बरगळी मध्येच.

"देवाला दोष देवुन काय फायदा,जे आपल नाही त्यावर शोक करुन काय फायदा"बायकोने दिलासा दिला.

मी रागानेच बँग उचलली व कचर्याचा पेटीत टाकुन येतो.

दुसर्या दिवशी जेव्हा मी टीव्हीवर बातम्या ऐकल्या

"एका कचरा वेचनारी महिलेला कचरा पेटीत पैसावे भरलेली बँग सापडली.

तिच डफेल बँग जी कचर्यात टाकली होती.

तिने जवळच्या पोलिस चौकी जमा केली

पोलिसांनी ब्लॅक मनी घोषित केली,बाकीचे सरकारी कर कापुन उरलेली रक्कम ईनाम म्हनुन तसेच ईमानदारीचा मोबदला म्हनुन सरकारने तिला उरलेली रक्कम बक्षीस म्हणून दिली.

पोलिसांनी सांगितले की पैशांची तपासणी केली गेली आणि त्याने जाहीर केले की काही नोट बनावट आणि काही असली होत्या . म्हणून प्रथम पोलिसांनी प्रकरणाची छाननी करुन घेतली ... आणि इनाम म्हनुन उरलेली रक्कम त्या कचरा वेचनारी बाईला बहाल करण्यात आली.

तिचं नशिब बळवंत होत,

तिने ईमानदारीने ते पैसे, कोणतीही लालच मनात आनता परत केली.

"आपण पण ती बँग जमा करायला हवी होती"मी म्हणालो.

"पन्नास हजार "रक्कम तिला मिळाली .

"तिची मुलं बालं किती खुश असतिल:

"तिची ह्या वर्षाची दिवाळी आनंदात जाईल"

बरं, झाले ते पैसे गरीबीचा मुकी लागले,

नाहीतर आपण तोंडाचा चोचले पुरे करण्यासाठी खर्च केले असते.

"मुलात:ते पैसे तिचाच नशिबी होते.माणुस नशिबाच्या पुढे व आधी काहीच जास्त कमवित नसतो.जेवढे असते तेवढेच मिळते"बायको शेवट करते.


Rate this content
Log in

More marathi story from Swapnil Kamble

Similar marathi story from Tragedy