दिसते तसे नसते
दिसते तसे नसते
"खुप चांगले लोक भेटलेत गं आपल्या मुलीला, चांगल घर,चांगली माणसं हेच तर पाहिजे होतं ना आपल्या मिनु साठी अजुन काय हवं?? झालं ना तुझ्या मनासारखं?"
मिनुची आजी मिनुच्या आईला विचारत होती.
"हो आई खरंच अगदी चांगल स्थळ शोधुन आणलंत तुम्ही..मुलगा सुद्धा खुप चांगला वाटला मला."
"अगं चांगला वाटला काय??चांगलाच आहे तो, शांत आणि संस्कारी दिसतोय आपल्या मिनु सारखाच माझी नजर कधी धोका नाही खाऊ शकत.पाहिलयं मी त्याला आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही.अगदी अदबीने वागत,बोलत होता तो सर्वांशी."
घरात एकुणच आनंदी आनंद होता. घरातली थोरली लेक मिनाक्षीचे लग्न ठरले होते. बि.ए.च्या शेवटच्या वर्षाला होती मिनु तिची परीक्षा झाल्यानंतर म्हणजे तीन महिन्यानंतरची लग्नाची तारीख काढली होती. घरात हळूहळू लग्नाची तयारी सुरू झाली होती. मिनुचा अभ्यास ही चालु होता. नवीन घराची,संसाराची स्वप्ने मिनु आता रंगवुन लागली होती. मिनुचा होणारा नवरा विजय चे आता वरचेवर फोन करणे चालु झाले होते.आधी चारपाच दिवसांनी फोन करणार विजय आता रोज मिनुशी फोनवर बोलु लागला. नवीन नवीन मिनूलाही त्याच्याशी बोलायची ओढ असायची.तिच्या आवाजाने ती मोहरुन जायची. एक वेगळाच आनंद जणु तिच्या आयुष्यात आला होता. हळुहळु दोघेही एकमेकांशी फोनवर तासनतास बोलु लागले. काही दिवसांनंतर हळूहळू मिनु समोर विजयचा खरा स्वभाव येत होता. कधी कधी ती फक्त बोलतोय असा की, खरोखरच हा असा आहे? याच विचारात असायची. कधी मिनु लवकर फोनवर आली नाही तर "
काय करत होती तु? कुणाशी बोलत होतीस? माझ्या पेक्षा तुला तुझ्या मैत्रिणी जास्त महत्वाच्या आहेत का? "असे काहीबाही प्रश्न विचारून भंडावून सोडायचा.
सुरवातीला मिनुने लक्ष दिले नाही पण हळूहळू त्याचे हे वागणे बोलणे वाढु लागले. फायनल एक्साम नंतर आता सर्व मैत्रिणी एकमेकींपासुन दुर जाणार होत्या. सर्वांच्या वाटा वेगळ्या होणार होत्या. परत कुणी भेटते की, नाही म्हणून परीक्षेच्या आधी सर्व वर्गाने एक छोटी पार्टी अरेंज केली होती. त्या दिवशी विजयचा फोन आला .मिनुच्य लहान बहिणीने फोन घेतला.
"हॅलो जिजु मिनु ताईच्या कॉलेज मध्ये आज पार्टी आहे म्हणून ती उशिरा येणार आहे आज.. तुम्ही रात्री फोन कराल का?".
विजयने बरोबर सायंकाळी सात वाजेला फोन केला.
" काय मिनु कशी झाली पार्टी? केव्हा आलीस तु घरी?"
मिनु- "हे काय आत्ताच आलीये.तेवढ्यात तुमचा फोन आला."
विजय -"एवढ्या उशीरा पर्यंत तु एकटी घराबाहेर होतीस?"
मिनु-"उशीर कुठे सातच तर वाजलेत अजुन आणि एकटी नाही आमच्या पुर्ण क्लास चे स्टुडंट्स होते."
विजय -"अच्छा म्हणजे मुलं पण होते का पार्टी मध्ये?"
मिनु "अफकोर्स मुलं पण आहेत ना क्लास मध्ये मग ते तर असणारच ना?"
विजय -"मग तु नको जायला पाहिजे होतं पार्टी ला."
मिनु-"का? असं का बोलताय तुम्ही?"
विजय -"नाही सहजच विचारतोय,तु चुकीचं समजु नकोस हा? तुझा कुणी बॉयफ्रेंड?? म्हणजे त्याच्यासाठी तु एवढा वेळ पार्टी थांबली असेल, म्हणजे माझा फोन येणार हे माहित असुनही तु घरी लवकर परत आली नाही. म्हणजे माझ्या पेक्षा तुझ्या आयुष्यात महत्वाचा दुसरा कुणी व्य....." विजयचे वाक्य पुर्ण करण्याआधीच मिनु जोरात ओरडते.
"काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हांला तुम्ही तुमच्या होणाऱ्या बायकोशी बोलत आहात." मिनुने रागातच फोनवर रिसीव्हर जोरात आदळला.
मीनुचा आवाज ऐकून आई ,बाबा,आजी तिच्या जवळ येऊन उभे आहेत याचे तिला भानही नव्हते.
आईच्या काळजात तर धस्स झाले होते.बाबा बोलले "काय झालं एवढं काय बोलत होते विजयराव."
मिनुने झालेला सर्व प्रकार सांगितला आजीने डोक्याला हात मारून घेतला.
मिनु- "आजी चांगले चांगले म्हणून असे निघालेत ते लोकं बघ दिसत तसं नसतं आजी. जो माणूस अजुन मी त्याची बायको झाली नाही तरी असा वागतोय.तो लग्नानंतर कसा वागेल याचा विचारही करवत नाही मला. नाही.. नाही ..अशा संशयी वृत्तीच्या माणसाशी मी लग्न नाही करु शकत. माझ्या पुर्ण आयुष्याचा विध्वंस होईल बाबा..मी बाऱ्याच दिवसांपासून त्यांच्या या विचित्र स्वभावाचा अनुभव घेतला आहे."
आजी -"किती शांत आणि चांगला वाटत होता तो. खरच सांगतेय मिनु तु जसं दिसतं तसं नसतं..जे डोळ्याला चांगल दिसलं कींवा समोरच्या व्यक्तीने सर्व चांगले असण्याचे आपल्याला भासवले तर ते चांगलेच असते असे कधीच मानु नये. बरं झालं लग्नाआधी हे आपल्या लक्षात आले.अशा माणसाशी आपल्या मुलीचे लग्न लावू शकत नाही आपण..आजच त्यांच्याकडे जाऊन कळवा त्यांना. हे लग्न मोडले म्हणून आणि त्याच्या आईवडिलांना कारणही सांगा तसं."
(वरील कथा आणि कथेतील पात्रे पुर्णपणे काल्पनिक आहेत तरी कुणाच्या आयुष्याशी मिळता जुळता प्रसंग असेल तर केवळ योगायोग समजावा कथा आवडल्यास एक लाइक करा कमेंट करा अजुन नवनवीन कथा वाचण्यासाठी नक्कीच फॉलो करा)
